Home » Miss Universe 2023: नेपाळची Jane Dipika ‘या’ कारणास्तव आहे चर्चेत

Miss Universe 2023: नेपाळची Jane Dipika ‘या’ कारणास्तव आहे चर्चेत

यंदाची मिस युनिव्हर्स २०२३ ची स्पर्धा काही दृष्टीकोनातून खास राहिली. खरंतर मिस युनिव्हर्स २०२३ काही वर्षांपासून चालत आलेल्या रूढीवादीला मोडणारी ठरली.

by Team Gajawaja
0 comment
Miss Universe 2023
Share

यंदाची मिस युनिव्हर्स २०२३ ची स्पर्धा काही दृष्टीकोनातून खास राहिली. खरंतर मिस युनिव्हर्स २०२३ काही वर्षांपासून चालत आलेल्या रूढीवादीला मोडणारी ठरली. यंदा ट्रांसजेंडर ते प्लस साइज मॉडेलने इंटरनॅशनल ब्युटी पेजेंट मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये कंटेस्ट म्हणून भाग घेत इतिहासात आपले नाव दाखल केले आहे. तर नेपाळच्या प्लस साइज मॉडेलने सुद्धा मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये भाग घेतला आणि चर्चेत आली. (Miss Universe 2023)

मिस नेपाळ, जेन दीपिका गॅरेट इंटरनॅशनल कंप्टीशनच्या रुपात कंटेस्टेंट म्हणून पोहचणारी पहिली प्लस साइज मॉडेल ठरली. २२ वर्षाच्या गॅरेटने अल साल्वाडोर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिलिमनरी स्पर्धेच्या दरम्यान रनवेवर वॉक केला असता तेव्हा तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे सर्वजण तिचे फॅन झाले. याचसोबत नेपाळने बारीक-लांबसडक दिसणाऱ्या मॉडल्सच्या सर्व रुढी मोडल्या. मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये नेपाळला एक सुंदर आणि आत्मविश्वासाने लबरेज प्लस साइज मॉडेल जेन दीपिका गॅरेट द्वारे रिप्रेजेंट करण्यात आले. मात्र गॅरेटला इंटरनॅशनल पेजेंटमध्ये सहभागी केल्यानंतर हंगामा झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jane Garrett (@jadedipika_)

मिस युनिव्हर्समध्ये प्लस साइज मिस नेपाळ, जेन दीपिका गॅरेटच्या पार्टिसिपेशनने केवळ डायवर्सिटी नव्हेच तर बॉडी पॉझिटिव्हिला प्रोत्साहन दिले. जेन असे मानते की, सर्व सौंदर्यवतींनी साइजची परवाह न करता फॅशन आणि ब्युटी सेक्टरमध्ये रिप्रेजेंट करणे आणि आनंद साजरा करण्याची गरज आहे. (Miss Universe 2023)

जेनेचे वजन हार्मोनल समस्येमुळे वाढले वजन
मिस नेपाळ बनण्यासाठी जेन दीपिका गॅरेटने २० अन्य कंटेस्टेंटला हरवले. जेन मॉडेल असण्यासह नर्स आणि बिझनेस डेव्हलपर आहे. तिने महिलांच्या हार्मोनल आणि मानसिक आरोग्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी काम केले आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनचे वजन हे हार्मोनल समस्यांमुळे वाढले गेले होते. जेन ही नेपाळ मधील काठमांडू येथील असून अमेरिकेत जन्मलेली आहे. तर जगातील सर्वाधिक प्रसिद्ध ब्युटी पेजेंटमध्ये जेनची भागीदारी बॉडीच्या पॉझिटिव्हिटी आणि रिप्रेजेंटेशनचे यश आहे.


हेही वाचा- Miss Universe 2023: मिस युनिव्हर्सचा ताज जिंकलेवी शेन्निस पलासियोस नक्की कोण?

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.