मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत १०० हून अधिक देश सहभागी होणार असून या देशांतील सुंदरीसाठी थायलंडमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मात्र य़ाच कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेनं अवघ्या जगाचं लक्ष या स्पर्धेकडे वेधलं गेलं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या मिस मेक्सिको, फातिमा बॉशच्या स्वतंत्र बाण्याच्या घटनेनं हा स्टेज स्पर्धेपूर्वीच अधिक गाजत आहे. आयोजक समितीपैकी एका सदस्यानं केलेल्या अपमानस्पद उल्लेखामुळे मिस मेक्सिको फातिमा बॉश स्पर्धा सोडून गेली आहे, आणि तिला येथील सर्वच सुंदरींनी पाठिंबा दिल्यामुळे या मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वीच मोठा पेच निर्माण झाला आहे. (Thailand)

मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या आधीच वाद निर्माण झाला आहे. बँकॉकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, मिस मेक्सिको फातिमा बॉशला थाईला या स्पर्धेच्या आयोजन समितीमधील प्रमुख दिग्दर्शक नवात इत्साग्रिसिल यांनी मूर्ख म्हटले. सर्वांसमोर ऐकवलेल्या या अपमानास्पद शब्दामुळे फातिमा एवढी दुखवली की तिनं थेट स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे या मिस युनिव्हर्स स्टेजवर स्पर्धेआधीच वेगळे नाट्य बघायला मिळाले. थायलंडमध्ये ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या विसर्जन समारंभात आयोजक आणि काही स्पर्धकांमध्ये हा संघर्ष झाला. यामुळे मिस मेक्सिकोसह अनेक स्पर्धक सोहळ्यातून बाहेर पडल्या. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या समारंभात मिस युनिव्हर्स थायलंडचे राष्ट्रीय संचालक नवात इत्साग्रिसिल यांनी एक वादग्रस्त विधान केले. नवात हे मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे कार्यकारी संचालक देखील आहेत. (International News)
लाइव्हस्ट्रीम कार्यक्रमादरम्यान, नवात यांनी प्रायोजकाच्या शूटला अनुपस्थित राहिल्याबद्दल फातिमाला जाब विचारला. यानंतर फातिमा बॉश स्वतःचे स्पष्टीकरण देण्याआधीच, नवात यांनी मध्येच तिला थांबवून, “जर तुम्ही तुमच्या राष्ट्रीय दिग्दर्शकाच्या आदेशाचे पालन केले नाही तर तुम्ही मूर्ख आहात.” असा वादग्रस्त विधान केले. नवात यांच्या या वक्तव्यानं फातिमा कमालीची नाराज झाली. तिनं तिथेच या विधानाचा निषेध करत स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तिच्या या निर्णयामुळे या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. फातिमाला अनेक देशातील सुंदरींनी पाठिंबा दिला. तिच्यासह अनेक स्पर्धकही यावेळे बाहेर पडले. हा गोंधळ झाला तेव्हा तिथे सध्याची मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया कजायर थेलविगनेही उपस्थित होती. तिला मिस मेक्सिको फातिमाची भूमिका योग्य असल्याचे वाटले, आणि तिनंही फातिमिला पाठिंबा देत हा कार्यक्रम सोडत असल्याचे जाहीर केले. (Thailand)

फातिमाने स्पर्धा सोडतांना आपल्याला थायलंड देशाबद्दल प्रचंड आदर आहे. येथे येतांना मला या देशाचा निसर्ग आणि येथील जनतेला भेटायची ओढ होती. ती आत्ताही आहे. मात्र या स्पर्धेत मी सहभागी होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले. फातिमाच्या या रोखठोक भूमिकेमुळे नवात इत्साग्रिसिल यांच्यावर चहूबाजुने टीका सुरु झाली. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियावर माफी मागितली. येथे उपस्थित असलेल्या ७५ मुलींची मी माफी मागतो, म्हणत त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला आहे. या घटनेनंतर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राउल रोचा यांचेही विधान समोर आले आहे. त्यांनी मी महिलांच्या आदर आणि प्रतिष्ठेच्या मूल्यांचे उल्लंघन होऊ देणार नाही, असे सांगून नवात यांच्या विधानावर टीका केली आहे. (International News)
================
हे देखील वाचा : Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !
================
या सर्वांमुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वीच मिस मेक्सिको फातिमा बॉश लोकप्रिय झाली आहे. थायलंडचे प्रसिद्ध दिग्दर्शक नवाट इत्साग्रिसिल यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर, २६ वर्षीय मेक्सिकन स्पर्धक प्रतिष्ठेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनली आहे. फातिमा बॉश ला या वर्षी सप्टेंबरमध्ये मिस युनिव्हर्स मेक्सिको २०२५ चा किताब देण्यात आला. थायलंडमध्ये झालेल्या ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने मेक्सिकोचे प्रतिनिधित्व केले. फातिमा ही एक मॉडेल, सामाजिक कार्यकर्ती आणि प्रभावी वक्ता आहे. तिच्याकडे कम्युनिकेशन्समध्ये पदवी आहे आणि ती लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वंचित तरुणांना मदत करण्यासाठी काम करते. सामाजिक कार्यात सक्रीय असणा-या फातिमानं महिलांसाठी अनेक उपक्रम केले आहेत. आता मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावरही तिनं स्वतःचा आणि महिलांच्या स्वाभिमानाचा लढा दिल्यामुळे तिचे कौतुक होत आहे. (Thailand)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
