Home » मिस इंडिया सिनी शेट्टी: संघर्षमय आयुष्यातून घडलं आयुष्य 

मिस इंडिया सिनी शेट्टी: संघर्षमय आयुष्यातून घडलं आयुष्य 

by Team Gajawaja
0 comment
Miss India Sini Shetty
Share

भारताच्या फॅशन जगतात आणि चित्रपटसृष्टीमध्ये एका स्पर्धेची आतुरता असते. या स्पर्धेत निवडलेला चेहरा मग या दोन्ही क्षेत्रात आपल्या सौदर्यांची मोहोर उमटवतो. ती स्पर्धा म्हणजे मिस इंडिया. दरवर्षी होणाऱ्या या मिस इंडियाची उत्सुकता तमाम भारतीयांना असतेच. पण फॅशन आणि सिनेक्षेत्रात हा नव्या चेहरा कोण असणार याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते.  आता मात्र ही उत्सुकता कमी झाली आहे. यावर्षीच्या भारतीय सौदर्यवतीचा मान…अर्थात मिस इंडियाचा मान मूळ कर्नाटकच्या असणाऱ्या मुंबईच्या सिनी शेट्टीनं पटकवला आहे. (Miss India Sini Shetty)

पक्की मुंबईकर असलेली सिनी शेट्टी उत्कृष्ट नृत्यांगना आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्याची आवड जोपासणारी सिनी नेमकी कशी आहे, हे जाणून घेऊया. मुंबईच्या ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये हा मिस इंडियाचा सोहळा पार पडला. अंतिम फेरीत निवडलेल्या 31 सौदर्यवतींवर मात करत सिनीनं हा मानाचा मुकुट पटकवला. 

तिच्यापाठोपाठ मिस इंडिया 2022 रनरअपचा किताब राजस्थानच्या रुबल शेखावत हिने  पटकवला.  रुबल ही राजस्थानच्या राजघराण्यातील आहे. रुबलला नृत्य, अभिनय, चित्रकला यात रस असून ती बॅडमिंटची चॅम्पियन आहे. उत्तर प्रदेशची शिनाता चौहान, फेमिना मिस इंडिया 2022 ची सेकंड रनर अप ठरली आहे. २१ वर्षीय शिनाताला भारतीय संगीताची आवड आहे. या तिघीही सौदर्यवती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सौदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. सिनी, रुबल आणि शिनाता या तिघीही अत्यंत हुशार असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यमग्न आहेत. (Miss India Sini Shetty)

यापैकी मानाचा मुकुट मिळवलेली सिनी हिचे बालपण मुंबईत गेले आहे. डॉमिनिक सॅव्हियो विद्यालय, मुंबई, येथे सिनीचे शालेय शिक्षण झाले. एस. के. सोमय्या डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. 21 वर्षीय सिनी सीए आहे. आता ती सीएफएचा (चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट) अभ्यास करत आहे. सिनी प्रॉडक्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते.  याबरोबरच ती डान्सर, अभिनेत्री, आणि मॉडेल म्हणूनही काम करत आहे.  

सिनीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. 14 व्या वर्षी तिचे अरंगेत्रम केले. आता सिनी एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना आहे. सिनी अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचा फॅनफॉलोअरही जबरदस्त आहे.  त्यामुळे या व्हिडिओंना चांगलीच प्रसिद्धी मिळते.  (Miss India Sini Shetty)

मिस इंडिया स्पर्धेतही सिनीने खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. त्याला या स्पर्धेच्या जजनी भरभरून दाद दिली. मिस इंडिया स्पर्धेत, मिस टॅलेंटमध्ये रनर अप राहिलेली सिनी एअरटेलच्या जाहिरातींमधूनही झळकली आहे.  

====

हे देखील वाचा – जागरणात भजनं गायची नेहा कक्कर, आज एका गाण्यासाठी घेते ‘इतकं’ भलंमोठं मानधन

====

सिनीचा या सगळ्या प्रवासात कुटुंबाचा मोठा हातभार असल्याचे ती सांगते. तिला वडिल नसल्यामुळे लहानपणापासून आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला. मध्यमवर्गाय कुटुंबातील तिला प्रथम अपयशचा सामना करावा लागला. यातून अनेकवेळा लोकांची बोलणी खावी लागली. मात्र या सर्व संघर्षात कुटुंब बरोबर होते आणि अपयशात खचून न जाता मिस इंडियाचा टप्पा पार केल्याचे सिनी सांगते.  (Miss India Sini Shetty)

नृत्य करणे हा तिच्या जीवनातला सर्वात आवडता क्षण असतो,असे ती सांगते.  भरतनाट्यममुळे मी भारतीय संस्कृतीबरोबर जोडले गेले आहे. भरलेल्या सभागृहात सलग तीन तास नृत्य करताना जो आनंद मिळतो, तो सर्वोच्च असल्याचे सिनी सांगते. मिस इंडिया स्पर्धेतही जेव्हा तिला अंतिम फेरीत टेन्शन आले होते तेव्हा आपण एका मोठ्या सभागृहात भरतनाट्यम करत आहोत, अशी कल्पना केली. यातून आलेला सर्व ताण तणाव मोकळा झाल्याचे सिनी सांगते.  

नृत्यांगना असलेल्या सिनीला मॉडेलिंगची आवड आहे. या क्षेत्रात ती प्रियांका चोप्राला आपली गुरू मानते.  मिस वर्ल्ड 2000 असलेली प्रियांका चोप्रा तिला कायम प्रेरणा देते. तिच्यासारखेच यश संपादन करण्याचा सिनी प्रयत्न करणार आहे.  (Miss India Sini Shetty)

मिस इंडिया 2022 हा सोहळा अजून एका सौदर्यवतीसाठी खास ठरला, ती म्हजे नेहा धुपिया. नेहा धुपियाने मिस इंडियाचा ताज जिंकून आता 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या सोहळ्यात जज असलेल्या नेहाचा खास सत्कार करण्यात आला. अभिनेत्री मलायका अरोरा, दिनो मोरिया, डिझायनर राहुल खन्ना, रोहित गांधी, कोरिओग्राफर श्यामक दावर आणि क्रिकेटर मिताली राज यांचा मिस इंडियाच्या जज पॅनलमध्ये समावेश होता. 

आता सिनी शेट्टीला फेमिना मिस इंडिया 2022 चा ताज मिळाल्यामुळे मॉडेलिंगच्या जगात भारताला एक नवीन चेहरा मिळाला आहे. ही सिनी सिनेसृष्टीत कधी पदार्पण करेल याचीही उत्सुकता आहे. अर्थातच याआधी सिनी जागतिक पातळीवरील सौदर्यस्पर्धैसाठी तयारी करणार आहे. तिला भरपूर शुभेच्छा!

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.