Home » मिर्झापूर-3 ची कथा नव्हे या 4 कलाकरांमुळे पहावी वेब सीरिज

मिर्झापूर-3 ची कथा नव्हे या 4 कलाकरांमुळे पहावी वेब सीरिज

प्राइम व्हिडीओवरील प्रसिद्ध वेब सीरिज मिर्झापुरचा तिसरा सीझन अखेर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदाच्या सीझनमधील कथाच नव्हे तर चार महत्वाच्या कलाकारांमुळे वेब सीरिज पाहण्याचा आनंद लुटता येईल.

by Team Gajawaja
0 comment
Mirzapur Season 3
Share

Mirzapur Season 3 : मिर्झापुरच्या सीरिजमधील सर्वाधिक प्रसिद्ध झालेले शब्द म्हणजे भौकाल, रुतबा आणि दहशत. अशातच मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये कथा धमाकेदार आहेच. पण मिर्झापुरचा खरा बाहुबली कोण हे पाहणे सर्वाधिक महत्वाचेही आहे. आधीच्या दोन सीझनपैकी तिसरा सीझनची कथा थोडी स्लो आहे. पण कथेला वेगळेपण आहे. याशिवाय कथेत तीन पात्र फार नेहमीच महत्वाची ठरली आहेत. पण चौथ्या सीझनमध्ये चार असे पात्र आहेत त्यांच्यामुळे सीझन पूर्ण झाल्यासारखा वाटतोय. हीच पात्र कोणती याबद्दल जाणून घेऊया…

गुड्डू पंडितच्या भुमिकेतील अली फजल
मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचा केंद्रबिंदू गुड्डू भैया आहे. यामध्ये अली फजलची जबरदस्त भुमिका दिसून आली आहे. तिसऱ्या सीझनमध्ये गुड्डू भैय्याचे वर्चस्व अधिक वाढलेले दिसून आले आहे. दुसऱ्या सिझनमध्ये कालीन भैय्यांचे वर्चस्व अधिक दिसले. पण तिसऱ्या सीझनमध्ये गुड्डू भैय्यांचे वर्चस्व अधिक दिसले आहे.

कालीन भैय्यांच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी सीरिजचा मुख्य भाग आहे. पण कालीन भैय्यांची एण्ट्री अर्धी कथा संपल्यानंतर होते. पण कालीन भैय्यांच्या एण्ट्रीची उत्सुकता सीरिजच्या खऱ्या हाइप पॉइंटवेळी आहे. पहिल्या दोन सीझनमध्ये कालीन भैय्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आताच्या सिझनलाही प्रेक्षकांना कालीन भैय्यांना पहायचे आहे. या सिझनमध्ये कालीन भैय्यांना जीवनदान मिळाले आहे.

गोलूच्या भूमिकेत श्वेता त्रिपाठी
तिसऱ्या सीझनमध्ये गोलूची भूमिका अधिक उठून दिसली आहे. गोलूची भूमिका अधिक धमाकेदार दाखवण्यात आली आहे. श्वेता त्रिपाठीने गुड्डू भैय्याच्या राइट हँडची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला श्वेता त्रिपाठीने पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. (Mirzapur Season 3)

रमाकांत पंडितच्या भूमिकेतील राजेश तैलंग
रामाकांतच्या भूमिकेत राजेश तैलंग यांनी आपल्या करियरमधील सर्वाधिक भूमिका साकारली आहे. भ्रष्ट व्यवस्थेसमोर आणि बलाढ्य बलवान लोकांसमोर राजेश यांनी ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे ती उद्भूतपूर्ण आहे.


आणखी वाचा :
वडिलांचे सिनेमे फ्लॉप ठरल्याने करण जौहरच्या आईला करावे लागले होते हे काम
‘औरों में कहा दम था’ सिनेमाची या कारणास्तव निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.