Home » कामाख्या देवीच्या अंबुबाची मेळ्यातील चमत्कारिक गोष्टी

कामाख्या देवीच्या अंबुबाची मेळ्यातील चमत्कारिक गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
Kamakhya Devi
Share

आसामची राजधानी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिराबाबत अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात.  त्यापैकीच एक म्हणजे, या मंदिरात होणारा अंबुबाची मेळा.  हा अंबुबाची मेळा स्त्री शक्तीचे प्रतिक मानला जोता.  पाच दिवसांच्या या मेळ्यात जगभरातील देवीचे भक्त आणि तांत्रिक मोठ्या संख्येने यातात.  कामाख्या देवीला येणा-या वार्षिक पाळीचा हा उत्सव महिलांसाठी मोठा महत्त्वाचा असतो.  कामाख्या मंदिर हे तंत्रिक पूजेसाठी सर्वात महत्त्वाचे मंदिर मानले जाते.  तांत्रिकांची देवी म्हणूनही देवीची ख्याती आहे.  आता याच देवीचा २२ जून पासून अंबुबाची मेळा भरत आहे.  यासाठी कामाख्या मंदिर परिसरात आत्तापासूनच देशभरातील देवीच्या भक्तांनी गर्दी केली आहे. (Kamakhya Devi) 

आसामामधील कामाख्या मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या मंदिरात देवीची पूजा केली जाते.  दरवर्षी पावसाळ्यात या देवीची प्रतिष्ठापना केली जाते. हा मेळा दरवर्षी महावारीच्या वेळी आयोजित केला जातो. या जत्रेत दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. जत्रेनंतर भाविकांना प्रसाद म्हणून ओले कापड दिले जाते. हा आईच्या मासिक पाळीचा प्रसाद मानला जाते. 

अंबुबाची मेळा हा ईशान्य भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरातील नीलाचल टेकडीवर साजरा होतो. अंबुबाची मेळा पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेतील आषाढ महिन्यात साजरा होणारा उत्सव आहे.   या सणाचा उद्देश हा पृथ्वी मातेच्या सुपीक समृद्धीचा सन्मान करणे हा आहे.  याच महिन्यात धान्याची पेरणी केली जाते.  जमिनीतून उगवणा-या याच धान्यबिजांतून नंतर कितीतरी पट धान्य तयार होते.  हाच उद्देश या अंबुबाची मेळ्यामागे आहे.  यावर्षी अंबुबाची मेळा २२ जून ते  २६ जून दरम्यान होईल.  या काळात मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा देवीच्या भोवतीचे कपडे लाल रंगाने ओले झालेले असतात.  तेव्हा देवीच्या नावानं मोठा जयजयकार करण्यात येतो.  हे कपडे पवित्र मानून देवीच्या भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात.  (Kamakhya Devi)

अंबुबाची जत्रा भरते त्यावेळी माता कामाख्या मासिक पाळीत असते. यावेळी मातेच्या गर्भाचे दार बंद केले जाते. त्यानंतर तीन दिवसांनी मातेची मासिक पाळी संपली की,  आईची विशेष पूजा केली जाते. चौथ्या दिवशी स्नानानंतर देवीला सजवून सर्व भक्तांना देवीचे दर्शन देण्यासाठी मंदिराचे द्वार उघडले जाते.   उत्सवादरम्यान, देवीच्या मासिक पाळीनिमित्त कामाख्या मंदिर २२ जून ते २५ जून या कालावधीत बंद राहणार आहे. या दिवसांमध्ये भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.  मात्र अनेक भक्त मंदिराच्या परिसरातून देवीला वंदन करण्यासाठी येतात.  मंदिराचे दरवाजे २५ जून रोजी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी उघडण्यात येणार आहेत.  यावेळी देवीच्या लाखो भक्तांची उपस्थिती असणार आहे.  त्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.   

सनातन परंपरेत अंबुबाची जत्रेला विशेष महत्त्व आहे. ही जत्रा पूर्व भारतातील सर्वात मोठी जत्रा आहे. या काळात अनेक चमत्कार होतात.  ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी आपोआप लाल होते. काही वेळाने पाण्याचा रंग आपोआप सामान्य होतो. हा मेळा स्त्री शक्तीचे प्रतीकही मानली जातो.  देवीच्या भोवती गुंडाळलेला कपडा हा हजारो मिटर असतो, तो आपोआप लाल होतो, हाही एक चमत्कार मानला जातो. (Kamakhya Devi)

===============

हे देखील वाचा : चक्क हत्तीणीनं दिला जुळ्या बाळांना जन्म

===============

याशिवाय या कामाख्या मंदिराच्या आसपास या दिवसात अनेक तांत्रिक गर्दी करतात.  या तांत्रिकांना बघण्यासाठीही भक्तांची गर्दी असते.  गुवाहाटीपासून सुमारे किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. नीलाचल हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.  खासीजमातीचे बलिदान स्थळ म्हणूनही या स्थानाची ओळख आहे.  भगवान शंकर आणि दहा महाविद्यांसह अनेक महत्त्वाची मंदिरे डोंगरावर आहेत.  त्यातील कामाख्या देवी मंदिर हे सर्वात पूजनीय आहे. (Kamakhya Devi)

देवीपुराणानुसार, सतीच्या शरीराचे हे एकावन्न अंग पृथ्वीवर एकावन्न वेगवेगळ्या ठिकाणी पडले.  त्यातील प्रमुख शक्तीपीठ म्हणूनही कामाख्या माता मंदिराची ओळख आहे.  कामाख्या देवीशी संबंधित इतर अनेक आख्यायिका आहेत. कालिका पुराणानुसार, देवीला  काली मातेचा अवतार देखील मानले जाते. शिवाय, कामाख्या देवी ही दहा महाविद्यांचा अवतार मानली जाते.  याच देवीची हा अंबुबाची मेळा होत असून त्यासाठी मंदिर परिसरात मोठी सजावट करण्यात आली आहे. 

सई बने…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.