काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी ती खूप खुश होती, पण तेवढ्यात ती ज्या विमानात होती तिच्या आजूबाजूला विजा चमकू लागल्या एक वीज विमानावर कोसळली विमान वादळात अडकलं होतं. ती घाबरली तिच्या बाजूला बसलेली तिची आई तिला समजवत होती सगळं नीट होईल फक्त थोडावेळ… पण तेवढ्यात विमानाचे दोन तुकडे झाले आणि ती सीटसकट विमानातून उडून १०,००० फुटांवरून थेट जमिनीवर कोसळली. पण आश्चर्य म्हणजे ती जिवंत होती. तिच्या आजूबाजूला होतं अमेझोनचं भयानक घनदाट जंगल. ज्यात बुलेट एंट म्हणजे एक अशी मुंगी जी चावली की बंदुकीची गोळी लागल्यासारखा भयंकर वेदनादायी त्रास होतो. अशा प्राण्यांपासून ते भयानक ग्रीन एनाकोंडापर्यंत असे Dangerous छोटे मोठे प्राणी या जंगलात आहेत. पण 10,000 फुटांवरून पडल्यानंतर तरीही ती जिवंत कशी राहिली आणि पुढे तिच्यासोबत काय झालं? हे जाणून घेऊ. (Miracle in the Amazon)
२४ डिसेंबर १९७१ ची संध्याकाळ होती सतरा वर्षांची जुलियाना कोप्के आपल्या आईसोबत विमानातून प्रवास करत ती आपल्या वडिलांना भेटायला चालली होती. तिचे वडील एक झुलोजीस्ट होते आणि अमेझॉनच्या जंगलात संशोधन करत होते. जुलियाना पण अगदी वडिलांसारखच बनायचं स्वप्न पाहत होती. पेरूची राजधानी लिमा इथून जुलियाना आणि तिची आई फ्लाइट नंबर 508 मध्ये बसल्या. विमानात त्यांच्यासह एकूण 86 प्रवासी होते. विमान वेळेवर टेक ऑफ झालं. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. जुलियाना तिच्या आईच्या शेजारी बसली होती, तिची सीट होती 19F Window Seat. पण टेक ऑफनंतर काही तासांनी अचानक जुलियानाला जाणवलं की, तिची सीट हलतेय. तिला काही समजायच्या आतच संपूर्ण विमान हादरायला लागलं. तिनं खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. बाहेर विजा चमकत होत्या, विमानाभोवती काळे ढग होते. विमान वादळात अडकलं होतं. (Top Stories)

आधी विमानाचं इंजिन बंद पडलं, मग विमानाच्या बॉडीला तडा जायला लागला आणि पाहता-पाहता विमान दोन तुकड्यांत तुटलं. सगळ्यांनी सीटबेल्ट घातले होते, त्यामुळे लोक अजूनही आपापल्या जागी चिकटून होते. पण जुलियानाची Seat विमानापासून वर उडाली आणि ती एकटीच १०००० फुटांवरून खाली जमिनीच्या दिशेने कोसळू लागली. तिच्याकडे पॅराशूट नव्हतं, ना कुठली मदत होती. ती अमेझोन जंगलाच्या एका भागात पडली. ती बेशुद्ध झाली होती, तिच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती, पण चमत्कारिकपणे ती वाचली होती. पण आता जगण्यासाठी तिला आणखी धडपडाव लागणार होतं. अमेझॉनचं हे जंगल ७० लाख चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं होतं आणि तिथे भयंकर प्राणी होते. त्याशिवाय मलेरिया किंवा डेंग्युंच्या डासांचा सुद्धा त्रास होताच. अशा जंगलात त्या सतरा वर्षांच्या मुलीला एकटीच रात्र काढायची होती. खायला-प्यायला काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत सामान्य माणूस कदाचित वाचलाच नसता. पण जुलियाना सामान्य नव्हती. (Miracle in the Amazon)
तिचे आई-बाबा दोघेही जंगलप्रेमी होते, जुलियाना लहानपणापासून जंगलात वाढली होती तिला माहिती होतं जंगलात कसं जगायचं. शुद्ध आल्यावर ती आईला शोधू लागली, पण कुणीच नव्हतं. मग तिला एक छोटासा ओढा दिसला. तिला तिच्या बाबांचा शिकवलेला धडा आठवला – ओढा मोठ्या नदीत मिसळतो आणि पाणी नेहमी खाली वाहतं, त्याला फॉलो केलं की कधी ना कधी माणसांची वस्ती सापडते. म्हणून जुलियाना त्या ओढ्याच्या काठाने चालू लागली. पाणी साफ होतं, ते पीता येत होतं, पण खायला काहीच नव्हतं. तरी ती चालत राहिली, कधी पोहत, कधी जंगलाच्या कठीण रस्त्यावरून पायपीट करत.चार दिवस झाले, ती भटकत होती. (Top Stories)
मग एका जागी तिला प्लेनच्या काही सीट्स दिसल्या. तीन मृतदेह तिथे होते. ते अशा प्रकारे विमानातून पडले असावेत की त्यांचे डोकं जमिनीत रुतलं होतं. जुलियानाला वाटलं एक त्यातली तिची आई असेल, पण पाहिलं तर नव्हती. तिची नजर एका पॅकेटवर गेली – त्यात चॉकलेट्स होत्या! थोडं तरी खायला मिळालं. मग ती पुढे चालू लागली. प्लेन क्रॅशची बातमी सगळीकडे पसरली होती, हेलिकॉप्टर्स शोध घेत होते, पण जंगल इतकं घनदाट की जुलियानाला शोधण अशक्य होतं. काही दिवसांनी हेलिकॉप्टर्सचा आवाजही बंद झाला. तिची आशा मावळली होती. तिने हे accept केलं होतं की तिचा याचं जंगलात अशाप्रकारे अंत होणार आहे. (Miracle in the Amazon)
==============
हे देखील वाचा : Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?
==============
नऊ दिवस आणि नऊ रात्री जंगलात भटकून जुलियानाला एक झोपडी दिसली. ती रिकामी होती, तिने तिथे आराम केला. ती इतकी थकली होती की बसताच तिला झोप लागली. तिला वाटलं होतं हि तिची शेवटची झोप ठरेल. पण सकाळी डोळे उघडले तर तिच्या समोर जंगलात राहणारे माणसं होती, ते जुलियानला ‘युजा’ म्हणजे पाण्याची देवी समजत होते. ते घाबरले, तरी त्यांनी तिला मदत केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला जवळच्या हॉस्पिटलला नेलं. १० हजार फुटांवरून पडून ११ दिवस जंगलात एकटी राहून जुलियाना वाचली. तिच्या सांगण्यावरून विमानाचे अवशेष सापडले, पण इतर कुणीच जिवंत नव्हतं जुलियानाची आई सुद्धा. (Top Stories)
जुलियाना वर्षानुवर्षे या घटनेमुळे सद्म्यात होती. ती विमान प्रवासाला घाबरायची, पण पुढे तिने पीएचडी केली ती मोठी बायोलॉजिस्ट झाली. तिच्या अनुभवावर तिने ‘व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि एक डॉक्युमेंटरीही बनली. डॉक्युमेंटरीत तिला विचारलं, “तू एकटीच कशी वाचलीस?” त्यावर ती म्हणते, “माहित नाही, पण हा प्रश्न मला नेहमी त्रास देतो.” ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
