इंदौरपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या ओखलेश्वर हनुमान मंदिरामध्ये गेल्या शनिवारी असं काही घडलं की, सर्वत्र या मंदिराची चर्चा सुरु झाली. खरगोन जिल्ह्यातील अखिलेश्वर मठ हा खूप प्रसिद्ध आहे. येथील शिवमंदिर द्वापार युगातील असल्याचे सांगण्यात येते. तशीच महिमा येथील हनुमान मंदिराची आहे. या हनुमानाच्या मुर्तीची हनुमान जयंती वगळता वर्षातून 13 वेळा सजावट करण्यात येते. हा मोठा समारंभ असतो. यावेळी हनुमानाचे हजारो भक्त उपस्थित असतात. (Akhileshwar Dham Hanuman Mandir)
ओखलेश्वर धाम हनुमान मंदिर (Akhileshwar Dham Hanuman Mandir) हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक ऋषींचे आश्रम होते. अत्यंत पावन अशा या स्थानाचे महात्म्य दिवसेंदिवस वाढत जात आहे. हे मंदिर इंदौरपासून 45 किलोमिटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये आहे. येथे अखिलेश्वर मठही आहे. हे मंदिर हे खास समजले जाते कारण हे रुद्रावतार हुनमान मंदिर आहे. या मंदिरामधील हनुमानाची प्रतिमा दुर्लभ आहे कारण या मुर्तीच्या एका हातात शिवलिंग आहे. बहुतांशी हमनुमानाच्या मुर्ती किंवा फोटोमध्ये त्याच्या हातात द्रोणागिरी पर्वत असल्याचे दाखवले आहे. मात्र येथील मुर्तीच्या हातात शिवलिंग आहे. त्यामागे एक कथा येथील पुजारी सांगतात.
राम आणि रावणामध्ये जे युद्ध झाले त्याआगोदर रामेश्वरममध्ये श्रीरामांना शिवलिंगावर अभिषेक आणि पूजा करायची होती. शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी शिवलिंग आणण्याची जबाबदारी हनुमानावर देण्यात आली. त्यावेळी हनुमानजी नर्मदेच्या काठावरील सहस्त्रधारा धावडी घाटावरुन शिवलिंग घेऊन येत होते. येथेच महर्षि वाल्मिकी यांचा आश्रम आहे. त्या आश्रमात श्री हनुमान थोडा वेळ थांबले. या सर्वांदरम्यान रामेश्वरमध्ये ते उशीरानं पोहचले. त्यादरम्यान पुजेला उशिर नको म्हणून श्रीरामांनी तिथे अन्य शिवलिंगाची स्थापना करुन पूजा केली. त्यामुळे हे शिवलिंग हनुमानाच्या हातातच राहिले. तिच श्री हनुमानाची प्रतिमा या ओखलेश्वर धाम हनुमान मंदिरात (Akhileshwar Dham Hanuman Mandir)असल्याचे स्थानिक सांगतात.
=========
हे देखील वाचा : मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध
=========
या मठात एक शिवमंदिरही आहे. या शिवलिंगाची स्थापना भगवान श्रीकृष्णानं केल्याचे येथील पंडीत सांगतात. हे मंदिर द्वापार युगातील असल्याचे सांगितले जाते. इथे तीन शिलालेख आहेत. आता त्यावर लिहिलेली लिपी वाचता येत नाही. मात्र मंदिर राजा श्रियाल यांच्या कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या परिसरात त्याकाळात अनेक महर्षींचे मठ होते. त्यात महर्षी वाल्मिकी आणि महर्षी विश्वामित्र यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अखंड रामायण पाठ होत आहे. येथे शिवरात्री, कार्तिकी पौर्णिमा, वैकुंठ चतुदर्शी आणि हनुमान जयंतीला मोठा उत्सव साजरा होतो. चैत्र नवरात्रीला येथे मोठा यज्ञही होतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री हनुमानाच्या प्रतिमेमवर रोहिणी नक्षत्राच्यावेळी खास पूजा केली जाते. हा सोहळा बघण्यासाठी हजारो हनुमानभक्त उपस्थित असतात.
ओखलेश्वर धाममध्ये हनुमान जयंतीसह (Akhileshwar Dham Hanuman Mandir)एका वर्षात 13 वेळा हनुमानजींची ही विशेष पूजा केली जाते. हजारो भाविक परमेश्वराच्या दर्शनासाठी येतात. तशीच पूजा गेल्या आठवड्यात झाली. यावेळी हजारो भक्त हा सोहळा आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टीपत असताना भगवान हनुमानाच्या मूर्तीने पापण्यांची उघडझाप केल्याचे काही भक्तांनी पाहिले. बघता बघता ही घटना सर्वमुखी झाली आणि श्री हनुमानांनी डोळ्यांची उघडझाप केल्याची चर्चा सुरु झाली.
हे मंदिर अत्यंत जागृत असल्याची माहिती स्थानिक आणि भक्त देतात. या मंदिरात श्री हनुमानाचे दर्शन घेतल्यानं संकटे दूर होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अशा जागृत स्थानी देवानंच आशीर्वाद दिल्याचा विश्वास उपस्थित भक्तांनी व्यक्त केला. त्यामुळे या मंदिरात भक्तांची गर्दी वाढली आणि श्री हनुमानाचा जयजयकार सुरु झाला. मंदिरात या सोहळ्यावेळी मोठा भंडारा होतो. यावेळच्या भंडाऱ्यालाही त्यामुळे भक्तांनी मोठी गर्दी केली. (Akhileshwar Dham Hanuman Mandir)
मंदिराचे पुजारी सुभाषप्रसाद पुरोहित यांनी हे मंदिर पुरातन असून अत्यंत जागृत असल्याचे सांगितले आहे. हनुमानाच्या भक्तांमध्ये नी या घटनेमुळे हा देवाचा आशीर्वाद असल्याची चर्चा रंगली आहे.
– सई बने