प्रत्येकालाच आयुष्यात आपण मोठं व्हायचं असे वाटते. त्यासाठी तो स्वप्न ही पाहतो. मात्र नशीबच साथ देत नसेल तर काहीजण निराश होतात. मात्र नशीब पालटण्यास भाग पाडणारी कित्येक मंडळी सुद्धा या जगात आज आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या कोल्हापुरातील कळंबा येथे राहणाऱ्या मिरा बाबर. (Mira Babar) त्या सध्या कळंबा तुरुंगाच्या अधिकारी आहेत. मात्र नाथपंथी डवरी गोसावी समाजातील त्या पहिल्याच तुरुंग अधिकारी झाल्या आहेत. येथवर पोहचण्याचा त्यांचा प्रवास हा नेहमीच खडंतर राहिलेला आहे. या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्सने त्यांच्या वृत्तात सांगितला आहे.
मीरा बाबर या मूळ रुपातील सोलापूराताली सांगोला तालुक्यातील आहेत. त्या जातीनं नाथपंथी डवरी गोसावी समाजातील आहेत. या समाजातील लोक आपल्या पोटापाण्यासाठी भिक्षा मागतात आणि सर्वत्र फिरत राहतात. बाबर या ज्या समाजातील आहेत त्या समाजाला सर्वाधिक मागासलेला समाज असे म्हटले जाते. संपूर्ण आयुष्यभर देशभर भटकंती करत राहत असल्याचे शिक्षण घेणे तर दूरची गोष्ट. याच समाजात मिरा बाबर वाढल्या आहेत.
जन्मानंतर नाळ तोडण्यासाठी ही साधनं नव्हती
मीरा यांच्या जन्माबद्दल सांगायचे झाल्यास अंगावर काटा उभा राहिल. खरंतर दररोजचा पंधरा किमीचा प्रवास व्हायचा आणि त्याचसोबत एक गाढवं ही होती. त्याच दरम्यान, मीरा यांच्या आई नवव्या महिन्यातील बाळंतीण बाई होती. त्यांना कधीही मुलं होऊ शकत होता. तरीही त्यांचा प्रवास सुरुच होता. अशाच एका सकाळी बिऱ्हाड उठले आणि त्यांच्या आईला कळा सुरु झाल्या आणि तिथेच मीरा यांचे बाळंतपण झाले. मात्र जेव्हा त्या आईच्या पोटातून बाहेर आल्या तेव्हा साधी नाळं तोडण्यासाठी सुद्धा साधनं उपलब्ध नव्हती. कशीतरी नाळ तोडली आणि ती कापडात गुंडाळून पुन्हा त्याच पुढच्या वाटेने त्यांनी प्रवास सुरु केला. मीरा बाबर यांना एकूण ८ भावंड आहेत. मात्र या सर्व भावंडांचा जन्म हा विविध राज्यात झालेला आहे.

मीरा बाबर यांचे शिक्षण
मीरा बाबर (Mira Babar) यांना शिक्षण घेण्यासाठी सुद्धा फार अडथळ्यांना समोरे जावे लागले. एकतर आपल्या समाजात भिक्षा मागून पोट भरले जात होते आणि आपले शिक्षण कसे होणार हाच मोठा प्रश्न होता. मात्र तरीही वडिल सुद्धा भिक्षा मागून आणून जे काही मिळेल ते इतरांना देऊन पोट भरायचे. परंतु मीरा बाबर यांच्या वडिलांचे मित्र प्राध्यापक होते आणि त्यांनी बाबर यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. येथूनच मीरा बाबर यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरु झाला होता. त्यांच्या वडिलांनी सुद्धा कधीच शिक्षणासाठी विरोध केला नाही.
तर मीरा बाबर यांचा भाऊ हा सुद्धा १९९३ मध्ये पुणे विद्यापीठात एमपीएससीची तयारी करत होता. तेव्हा भावंडांनी मीरा यांना ही पुण्यात आणले आणि त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषयात पदवी मिळवली.
पुढे जाऊन मीरा बाबर यांचे लग्न शिक्षणाचा प्रवास सुरु असतानाच झाले. तर लग्नानंतरही पतीची मीरा यांचा शिक्षणासंदर्भात मोठी साथ लाभली. त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु ठेवला आणि मुलं पोटात असताना तलाठी पदासाठी परिक्षा सुद्धा दिली. १० दिवसाच्या मुलाला घेऊन २०१० मध्ये त्या तलाठी म्हणून एका खेडेगावात कार्यरत झाल्या. पुढे त्यांनी जेलर पदासाठी परिक्षा दिली आणि त्यात त्यांना यश मिळाले. अशा प्रकारे त्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगाधिकारी झाल्या.
हे देखील वाचा- खाशाबा जाधव यांना ऑलिंपिक स्पर्धेला पाठवण्यासाठी त्यांच्या प्राध्यापकांनी चक्क घर गहाण ठेवलं..
शिक्षणाबद्दल मीरा बाबर यांच मतं
आजही त्यांच्या समाजातील बहुतांश मुलं-मुली हे शिक्षणापासून दूर आहेत. अशातच मीरा त्यांच्या गावी गेल्यानंतर मुलींना शिक्षण मिळावे म्हणून प्रबोधन करतात. मीरा यांना त्यांच्या आयुष्यात वडिलांची आणि भावंडांची शिक्षणासाठी मिळालेली साथच फार मोलाची आहे. तर कष्टाला पर्या नाही मात्र कल्पवृक्ष म्हणजे आपण स्वत:च असतो असे त्या म्हणतात.