Home » लॅबमध्ये तयार करण्यात आले मानवी डोळे, जाणून घ्या कशा पद्धतीने करणार काम

लॅबमध्ये तयार करण्यात आले मानवी डोळे, जाणून घ्या कशा पद्धतीने करणार काम

by Team Gajawaja
0 comment
Mini Eyes
Share

लॅबमध्ये हृदय आणि रक्त तयार केल्यानंतर आता डोळे सुद्धा बनवण्यात आले आहेत. त्यांना मिनी आय (Mini Eyes) असे नाव दिले गेले आहे. असे पहिल्यांदाच वैज्ञानिकांनी करत 3D मिनि आय बनवले आहेत. ज्याला रेटिनल ऑर्गेनॉयड्स असे म्हटले गेले आहे. ते बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी मानवी त्वचेचा वापर केला आहे. मिनि आयला युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी बनवले आहे. असे डोळे असलेला एक पुतळा सुद्धा आहे आणि रेटिना मध्ये आढळून येणारे त्यात पिगमेंट ही आहेत. तर जाणून घ्या मानवासाठी कशा पद्धतीने ते काम करु शकतात.

स्टेम सेल रिपोर्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट्नुसार, मिनि आयमध्ये असलेले रॉड सेल्स सारखेच तयार करण्यात आले आहेत. जसे व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये असलेल्या रेटिनाप्रमाणे आहे. या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये रॉड सेल्स डोळ्यांच्या मागे आढळून येतात. व्यक्ती ज्या गोष्टी पाहू शकतात त्याचे व्हिजन तयार करण्यासाठी या कोशिका मदत करतात. ते इमेजची प्रोसेसिंग करतात ज्यामुळे पाहणे अगदी सोप्पे होते. लॅब मध्ये तयार करण्यात आलेले डोळ्यांची ही खासियत असणार आहे.

Mini Eyes
Mini Eyes

व्यक्तींना कसा होणार फायदा?
वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, ही एक मोठी संधी आहे. कारण यापूर्वी जनावरांच्या कोशिकांवर रिसर्च करण्यात आला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे त्याचे परिणाम दिसून येत नव्हते. आता व्यक्तीची त्वचा वापरुन मिन आयच्या मदतीने काही गोष्टी समजण्यास मदत होणार आहे. जसे व्यक्तीला दिसणे का बंद होते. अशर सिंड्रोम म्हणजे काय ज्यामधअये व्यक्तीला ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता ही प्रभावित होते. या व्यतिरिक्त डोळ्यांसंदर्भात जेनेटिक आजार सुद्धा समजले जाऊ शकतात. त्यावरुन त्यांच्यावरील उपचार करण्याचा मार्ग सोप्पा होऊ शकतो.

या डोळ्यांवर करण्यात येणाऱ्या रिसर्चमुळे वयाच्या ५० वर्षानंतर होणारे मॅकुलर डिजेनेरेशनवर उपचार शोधण्यास मदत होणार आहे. ज्यामध्ये वेळेसह डोळ्यांना दिसणे कमी कमी होत जाते.(Mini Eyes)

हे देखील वाचा- महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळी लवकर वृद्ध होतात, पहा काय सांगतो रिपोर्ट

कशा पद्धतीने तयार करण्यात आले मिनि आय?
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, मिनि आय तयार करण्यासाठी संशोधकांनी अशर सिंड्रोमशी पीडित असलेल्या एका तरुणच्या स्किन सेल्सचा वापर केला. यामुळे स्टेम कोशिका तयार केल्या. त्यानंतर लॅबमध्ये डोळे विकसित करण्याची प्रक्रिया सुरु झाली. ते बनवण्याची प्रक्रिया अशी होती जशी पोटात ९ महिन्याचे भ्रुण सांभाळले जाते. वैज्ञानिकांनी हळूहळू ७ प्रकारच्या कोशिका तयार केल्या. डोळ्यांमध्ये असलेला पातळ थर उजेड ओळखू शकतात.

वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, नव्या डोळ्यांचा आकार १ मिलीमीटर आहे. त्याच्या माध्यमातून अशा औषधांचा शोध घेतला जाऊ शकतो जे आजारांची कारण ब्लॉक करु शकतात. या रिसर्चच्या मदतीने डोळ्यासंदर्भातील आजारांवर कायमस्वरुपी उपचार शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.