Home » करोडपती भिकारी जे कमावतात सामान्यांपेक्षा जास्त!

करोडपती भिकारी जे कमावतात सामान्यांपेक्षा जास्त!

by Team Gajawaja
0 comment
Millionaire beggars
Share

उपर वाले के नाम पे देदे, दोन दिवस उपाशी आहे, काहीच जेवलो नाहीये, आई आजारी आहे. किंवा एखाद गाण गाऊन किंवा काहीच न बोलता सुद्धा अनेक जणांंनी तुमच्याकडेही भीक मागितली असेलच. तुम्हीही सहानभूती म्हणून तुमच्याकडे असलेली खाण्याची वस्तु किंवा पाच दहा रुपये त्या मागणाऱ्या लोकांना दिले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, असंही असू शकतं की तुम्ही ज्यांना भीक देत आहात, ते करोडपती असू शकतात. पण भीक देताना आपण एवढ्या खोलात जाऊन विचार करत नाही. आपण भीक देऊन टाकतो. पण ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही भीक देताना विचार कराल. कारण आपण अशा भिकाऱ्यांची माहिती घेणार आहोत, जे रस्त्यावर भीक मागतात पण ते करोडपती सुद्धा आहेत. अशाच करोडपती भिकाऱ्यांबद्दल आपण जाणून घ्या…. (Millionaire beggars)

भारतातील सर्वात फेमस आणि जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणजे भारत जैन, ज्याची अंदाजे संपत्ती ही ७ – ८ कोटीच्या घरात आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना भीक मागावी लागली. सुरुवातीला राहायला घर आणि अन्न नसलेल्या भरत जैन यांच्या कडे आज मुंबईत दोन फ्लॅट्स आणि ठाण्यात दोन दुकान आहेत. भारत जैन हे गेली ४० वर्ष एक रुटीन फॉलो करतात ज्यामध्ये दिवसाला १० ते १२ तास ते भीक मागतात. त्यामुळे ते दिवसाला २ हजार ते अडीच हजार कमवतात. त्यांची मूलं मुंबईच्या कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत, आणि आता ते कुटुंबाच्या व्यवसायात मदत करतात. जैन कुटुंब एक स्टेशनरी दुकान चालवतं, जे जैन कुटुंबाच्या उत्पन्नात आणखी भर घालतं. एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा ते भीक का मागतात? असा प्रश्न विचारल्यावर, मला भीक मागण्याची आवड आहे. असं उत्तर भरत जैन यांनी दिलं होतं. फक्त भरत जैनच नाही तर भारतात असे अनेक भिकारी आहेत. ज्यांचा net worth एका सामान्य नोकरी करणाऱ्या माणसापेक्षा जास्त आहे. (Top Stories)

भरत जैन यांच्या सारखाच एक करोडपती भिकारी म्हणजे पप्पू कुमार जो पटनाच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागतो. तो एक अपंग भिकारी आहे आणि त्याच्याकडे चार बँक अकाउंट्स आहेत. एक वेळेस तो इंजिनिअरिंगची तयारी करत होता. एका ॲक्सिडेंटमुळे अपंगत्व आल्यानंतर त्याने भीक मागायला सुरुवात केली. त्याला एकदा आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तपासलं तेव्हा काळालं की त्याकडे चार एटीएम कार्डस आहेत. तो स्थानिक लोकांना लोन सुद्धा देत असतो. स्वत:वर उपचार करण्याचा सल्ला एका आरपीफ अधिकाऱ्याने दिल्यावर त्यावर तो म्हणाला की बरा झालो. तर मला भीक कोण देईल असं तो म्हणाला होता. त्यानंतर एक महिला भिकारी आहे, सार्वितीया देवी ज्यांनी भीख मागून स्वत:च्या मुलीच लग्न लावलं आहे. शिवाय त्या ३६ हजार रुपयांचं एलआयसीचा हफ्ता सुद्धा त्या भरतात. त्यांच्या बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते भारतातील तीर्थ स्थळ फिरल्या आहेत. आणि एक फोरेन ट्रीप सुद्धा त्यांनी मारली आहे. (Millionaire beggars)

आता काही महिन्यांंपूर्वी एक न्यूज सुद्धा वायरल होत होती. ज्यामध्ये भिकाऱ्यांचं मासिक उत्पन्न हे ९० हजार ते १ लाख रुपयापर्यंत असल्याची माहिती होती. खनऊमध्ये भिकाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यासंदर्भात समाज कल्याण विभाग आणि यांनी एक सर्वेक्षण केलं. मध्ये ५३१२ भिकारी आढळले ज्यांची कमाई कष्टकरी लोकांपेक्षा जास्त आहे. लहान मुलांना हातात घेऊन भीक मागणाऱ्या गर्भवती महिलांची रोजची कमाई प्रत्येकी ३,००० रुपयांपर्यंत आहे. तर लहान मुलं दिवसाला भीक मागून ९०० रुपयांपर्यंत कमवतात. (Top Stories)

म्हणूनच इंदौर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या नव्या वर्षापासून भिक मागणाऱ्यांवर थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर भिक देणाऱ्यांवर सुद्धा फआयआर दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या आधीसुद्धा बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ बेगिंग या कायद्यानुसार भीक मागण्याला अपराध मानलं गेलं आहे. या कायद्यांतर्गत, सामाजिक कल्याण विभागाचे अधिकारी पोलिसांच्या सहाय्याने भिकाऱ्यांना धरून त्यांना विशेष न्यायालयात नेतात. जर त्यांना दोषी ठरवले गेले तर त्यांना ‘भिक्षुक घर’ किंवा ‘सेवा कुटीर’ नावाच्या संस्थांमध्ये एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ठेवले जातं. दिल्ली सरकारने सुद्धा भीक मागण्याला आणि देण्याला सुद्धा गुन्हा ठरवलं होतं. आश्रय अधिकार अभियान’ आणि ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थांनी या कायद्याला विरोध केला. २०१८ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ बेगिंग ॲक्टला असंवैधानिक ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाने भिक्षावृत्तीवर बंदी घालण्यास नकार दिला आणि तिला एक सामाजिक आणि आर्थिक समस्या म्हणून मान्य केलं. (Millionaire beggars)

===============

हे देखील वाचा :

Ambedkar-Congress Connection : जो काँग्रेस आज बाबासाहेबांचा गौरव करतोय, त्यानेच त्यांचा अपमान केला होता !

Lovely Khatoon : बांगलादेशी लवली भारतात झाली सरपंच !

===============

मुळात भीक मागण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली? या प्रश्नांकडे पहिलं तर आपल्याला अनेक उत्तर मिळतात. भारतात फक्त हालकीची परिस्थिती असल्यामुळेच भीक मागितली जात नाही तर त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टींची जोड आहे. पूर्वी ऋषी-मुनी आणि साधू यांच्या जीवन शैलीत भिक्षा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रामायणात तर रावणाने साधू बनून भिक्षा मागण्याच्या कारणानेच सीतेच हरण केलं होतं. सूफी संत, बौद्ध भिक्षूंनी आपल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करताना भिक्षावृत्तीला महत्व दिले. बौद्ध धर्मात, गौतम बुद्धाने भिक्षावृत्तीला पवित्र मानलं, पूर्वी आणि आजही अनेक धर्मात दान देण हे पुण्याचं काम मानलं जातं. नंतर शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे एखाद्या धार्मिक स्थळाबाहेर, रस्त्यांवर भिकारी भीक मागतान दिसू लागले. त्यामुळे आता ही एक सामाजिक समस्या बनली आहे आणि त्यावर बंधन घालण्याचा प्रयत्नही होतं आहेत. करोडपती भिकारी सोडले तर खरंच एखाद्या गरजूला मदत करण चुकीच आहे का? भीक देण्यावर आणि भीक मागण्यावर बंदी घातली गेली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.