Home » मिलिंद गवळी यांची स्वयंपाकाशी संबंधित ‘ती’ पोस्ट व्हायरल

मिलिंद गवळी यांची स्वयंपाकाशी संबंधित ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Milind Gawali Post
Share

आई कुठे काय करते? या मालिकेने लोकप्रियतेचे विविध रेकॉर्ड रचले आणि मालिकाविश्वात ऑल तिने हिट मालिका म्ह्णून स्थान पटकावले. या मालिकेने तर लोकप्रियता मिळवली सोबतच मालिकेत काम करणाऱ्या कलाकरांना देखील प्रसिद्धी मिळवून दिली. ही मालिका आता दुपारी प्रसारित होऊनही तिची लोकप्रियता टिकून आहे. (Milind Gawali Cooking Post )

अशातच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे मिलिंद गवळी देखील त्यांच्या अभिनयामुळे, विविध भूमिकांमुळे आणि त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. मिलिंद गवळी हे मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सध्या मिलिंद हे आई कुठे काय करते? या मालिकेत अनिरुद्ध या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत अरुंधती-मिहीर, अनिरुद्ध- संजना यांनी एका कुकिंग शो मध्ये सहभाग घेतला आहे. या शो मध्ये या दोन्ही जोड्या एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहे. या शोच्या निमित्ताने अनिरुद्ध देखील कधी नव्हे ते स्वयंपाक करताना प्रेक्षकांना दिसत आहे.

याच निमित्ताने मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं…
काल शूटिंग मध्ये मला कांदे कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, जी sceneची गरज होती,मी म्हणजे अनिरुद्ध पहिल्यांदा कांदा कापतो आणि, त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं, त्याला काही दिसत नाही आणि तो वैतागतो, आणि म्हणतो “काय कटकट आहे ही” “काय फालतुगिरी आहे कशाला आलोय मी इथे?” आणि नंतर त्याला जाणीव होते की स्वयंपाक करणं काय साधी गोष्ट नाहीय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


पुढे मिलिंद यांनी लिहिले, “पूर्वी त्याला असं वाटायचं की स्वयंपाक करणाऱ्या बायका काय फार मोठं काम करत नाहीत, स्वयंपाक करणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. कोणीही करू शकतं, अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळेला त्याला ही जाणीव झाली की हे काय फार सोपं नाहीये.”

पुढे मिलिंद म्हणतात, “आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किती लोकांना ही जाणीव असते?, की जी माऊली स्वयंपाक करते (आजकालच्या जमान्यात फक्त माउल्या स्वयंपाक करत नाही तर बरेचसे पुरुष ही स्वयंपाक करतात) पण खरंच किती लोकांना ती जाणीव आहे की जो स्वयंपाक करतो, त्याचे किती कष्ट असतात ते अन्न तयार करण्यामध्ये. पण हल्ली अनेकांना मी बघतो की खाताना तोंडं वाकडी करतात, चवच आली नाही असं म्हणतात किंवा आपण काहीतरी बाहेरून मागू या, घरी बनवलेलं बेचव आहे आणि हल्ली तर काय स्विगी, झोमॅटो अशा असंख्य ॲप्स आले आहेतच, ज्याच्याने आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला हवं ते मागवू शकतो आणि आजकालची मुलं सर्रास बाहेरून अन्न मागवतात.”

“दीडशे दोनशे अडीचशे मध्ये तुम्हाला ते तुमच्या घरपोच मिळतं, पण त्या अन्नाला घरच्या अन्नाची सर येईल का? किंवा ते तितकं हायजिनिक असतं का? कुठल्या प्रकारचं तेल वापरलं असत? Palm oil ? किती स्वच्छता पाळली असेल? घेऊन येणारा कशा पद्धतीने घेऊन येत असेल? हे सगळं रामभरोसेचं आहे. जसजसं आपण ऍडव्हान्स होत जातो तसतसे आपण परावलंबी होत जातोय किंवा सोप्प करायचं प्रयत्न करतो आणि आपल्या तब्येतीची वाट लावून घेतोय, आपल्या शरीराची वाट लावून घेतोय.”

======

हे देखील वाचा : पीएम मोदी ठरले सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते

=======

“असं नाहीये की मी कधी बाहेरच अन्न खात नाही पण give an a choice जर एखाद्या माऊलीने तीच्या घरात बनवलेलं अन्न असेल आणि बाहेरचं जनरल अन्न असेल, तर मी घरचं केलेलेच अन्न खातो, मग ती माऊली कोणीही असो. आज मला कोणी नाही पण कांद्याने मात्र मला रडवलं” पण त्या अश्रूंबरोबर माझे पुन्हा एकदा डोळे उघडले प्रत्येक अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचं मनापासून आभार मानायला हवेत,त्यांच्या कष्टाची कदर करायला हवी,थोडं कमी जास्त झालं असेल तरीसुद्धा मनापासून त्यांचं ग्रहण केलं तर आपली कायम तब्येत चांगली राहील.”

दरम्यान मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ते जेवढे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या फिटनेससाठी देखील चर्चेत असतात. पन्नाशी ओलांडूनही मिलिंद यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्समध्ये खूपच कौतुक होत असते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.