Home » जाणून घ्या मिलिंद गवळींच्या आठवणींचा अमूल्य ठेवा

जाणून घ्या मिलिंद गवळींच्या आठवणींचा अमूल्य ठेवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Milind Gawali
Share

मराठी टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते?. या मालिकेने अनेक कलाकारांना एक नवीन ओळख मिळवून दिली. मराठी सिनेविश्वात ९० चा आणि २००० चा काळ गाजवणारे अनेक कलाकार या मालिकेत अभिनय करताना दिसत आहे. याच कलाकरांना एक नवीन ओळख आता मिळाली आहे. यातलेच एक अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ‘अनिरुद्ध’ या मालिकेतील नावाने ओळखले जाणारे अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात.

मिलिंद यांना या पिढीने आता या मालिकेत जरी बघितले असले तरी, ते मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय दिग्गज आणि जुने अभिनेते आहेत. मिलिंद यांनी ९० आणि २००० च्या दशकात मराठी आणि हिंदीमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांचे अनेक सिनेमे हे तुफान गाजले आहेत. बहुतकरून ग्रामीण भागात तर त्यांचे आजही असंख्य चाहते आहेत.

मिलिंद यांचे सिनेमे ग्रामीण भागात जत्रेत दाखवले जायचे. त्यांचे सिनेमे जत्रेत तुफान चालायचे. त्यांना भेटायला, त्यांची सही घ्यायला, त्यांना पाहायला खूपच गर्दी व्हायची. अगदी रांग लावून सर्व प्रेक्षक त्यांना भेटायचे. मिलिंद यांना लोकांचे अमाप प्रेम मिळाले. नुकतीच मिलिंद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या या जुन्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “अण्णा देशपांडे हे साताऱ्यामध्ये राहणारे, मुंबईला मला भेटायला आले, मला म्हणाले की “मी काही तुमचे सिनेमे कधी पाहिले नाही, पण अनुप जगदाळे जे यात्रेमध्ये टुरिंग टॉकीज चालवतात त्यांनी मला सांगितलं की या मुलाला तुम्ही सिनेमांमध्ये घ्या”, त्यांनी तुमचे ‘सून लाडकी सासरची’ आणि ‘मराठा बटालियन’ हे दोन सिनेमे तुफान चालवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

अण्णा मला म्हणाले की खरंतर या सिनेमांमध्ये मी या भूमिकेसाठी सयाजी शिंदे यांनाच घेणार होतो, पण ते दक्षिण सिनेमांमध्ये बिझी झाल्यामुळे मला दुसरा कलाकार घ्यायचा आहे, मला असं वाटतं तुम्ही हा चित्रपट करावा कारण हा चित्रपट खूप चालणार आहे, म्हटलं तुम्ही इतकं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकता, तर ते म्हणाले हा विषयच असा आहे, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली व्यथा आहे, महाराष्ट्रात भावा-भावांच्या भांडणांमध्ये जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले आहेत, महाराष्ट्रा मध्ये खूप कमी अशी घरं आहेत जिथे भाऊ भाऊ गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यामुळे हा चित्रपट चालेलच, कारण हा प्रत्येक घराची व्यथा सांगतो.

“सख्खा भाऊ पक्का वैरी” इतका चालला की त्यानंतर या सिनेमामुळे मला जवळजवळ 40 एक सिनेमे तरी मिळाले असतील, जी जी राज वासवानी नावाचे सिनेमा वितरक होते, त्यांनी मला हा ग्रामीण भाग दाखवला, माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी , मी त्यांच्या बरोबर महाराष्ट्राची यात्रानीयात्रा पिंजून काढली, ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांनी माझ्या कडून लाखो सह्या घेतल्या असतील, आपल्याला लोकांनी स्वीकारलं आहे याची मला जाणीव झाली, एका कलाकारावर जितकं प्रेम ग्रामीण प्रेक्षक करू शकता तितकं प्रेम शहरी प्रेक्षक करू शकत नाही असं मला वाटतं , कारण शहरी प्रेक्षकांना हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांनी त्यांच्या कलाकारांनी भुरळ घातलेली आहे.

======

हे देखील वाचा : ३६ वर्षांनी पुन्हा दिगज्जांचा ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर डान्स

======

त्या काळामध्ये ग्रामीण महिलांना यात्रेला सिनेमा हेच एक कर्मणुकीचा साधन होतं, बैलगाडीतून यायचं देवदर्शन करायचं आणि एखादा छान अध्यात्मिक सिनेमा बघायचा, लहान मुलांना गोड गोड रेवड्या, मग लक्ष्मण झुल्या मध्ये बसवायचं, आणि मग परत आपल्या गावाकडे निघून जायचं, बघितलेला सिनेमा जर “माहेरच्या साडी” सारखा असेल तर मग त्या सिनेमातल्या अलकाताईंना आयुष्यभर मनामध्ये जागा द्यायची, मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की मला या सिनेमांमध्ये कामं करायला मिळाली, आज “आई कुठे काय करते” ही मालिका करत असताना, ते सगळे प्रेक्षक ज्यांनी माझे ते ग्रामीण सिनेमा बघितलेले होते त्या प्रेक्षकांचं वेगळेच प्रेम माझ्यावर आहे असं मला सतत जाणवत असतं. (बॅकग्राऊंड सॉंग जितेंद्र जोशी ने गायलं “आई तुझा आशिर्वाद”)”

दरम्यान मिलिंद यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत झळकत आहे. शिवाय नुकतेच त्यांनी ठाण्यामध्ये त्याचे घर देखील घेतले असून, या घराचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.