असं बोलतात लकी लोकानाच जीवनदान मिळतं, तुम्ही इनस्टावर रीलस स्क्रोल करताना तुम्हाला सुद्धा तसे व्हिडिओ आले असतील ज्यामध्ये लिहिलेलं असतं लकीयेस्ट पर्सन ऑन अर्थ ज्यामध्ये लोकं अॅक्सिडेंट होताना किंचितशा फरकाने वाचत असतात. पण एखाद्या माणसाला सतत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो सतत वाचत राहिला तर, तर तो असेल Luckiest पर्सन ऑन अर्थ, पण सोबतच तो असले Unluckiest पर्सन ऑन अर्थ. कारण त्याला जीवे मारण्याचे प्रयत्न होतं आहेत. ही गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याला मारण्याचे ९ वेळा भयानक प्रयत्न केले गेले. पण तो प्रत्येक वेळेस वाचला. थोडक्यात त्या ९ जीवनदान होते, असं आपण म्हणूया. कोण आहे हा माणूस त्याला मारण्याचे ९ वेळा प्रयत्न का झाले? आणि महत्त्वाचं म्हणजे तो वाचला कसा हे जाणून घेऊया. (Mike Malloy)
१९३३ साल सुरू होतं, जगभरात मंदी होती. त्याचा फटका अमेरिकेला सुद्धा बसला होता. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. या काळाला द ग्रेट डिप्रेशन सुद्धा म्हटलं जातं. काम रोजगार उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेकांना दारूच व्यसन लागलं होतं. थंडीचे दिवस होते, माइक मेलॉय एका दारूच्या गुत्यावर दारू पित बसला होता. ३५-४० वर्षांचा मॅलोय एक बेघर माणूस होता. त्याचं जगात कोणही नव्हतं. असं नव्हतं की तो आधीपासूनच असा होता. एकेकाळी तो न्यूयॉर्कमध्ये स्टेशन इंजिनियर होता, पण ग्रेट डिप्रेशनच्या काळात त्याची नोकरी गेली. तुम्ही म्हणाल नोकरी नाही, पैसे नाही मग दारू कशी? तर हा बार त्याच्याच मित्राचा होता. जो एक वर्षाआधीच त्याचा मित्र झाला होता टॉनी. टॉनी आणि त्याचे पाच मित्र मेलॉय ला भरपूर दारू पाजत होते. वर्षभरापासूनच ते त्याला दारू पाजत होते. मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू पाजतय म्हणून टॉनी आणि त्याचे चार मित्र मेलॉयचे सुद्धा मित्र झाले होते. मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू पाजतय याने मेलॉय खुश होता. पण त्याला प्रश्न पडला नव्हता की, मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू का पाजतय? आणि या प्रशांचं उत्तरच या गोष्टीची सुरुवात आहे. (International News)
तर वर्षभरा आधी बारचा मालाक टॉनी आपल्या मित्रांसोबत पैशे कमावण्यासाठी काहीतरी तिकडम करण्याच्या योजना आखत होता. मंदीचा काळ चालू होता पैसे कमवण्यासाठी काहीही करण्यासाठी हे लोकं तयार होते. विचारांची बरीच घौड-दौड केल्यानंतर असं लक्षात आलं की कुणाच्या विम्यापासून पैसे कमावता येऊ शकतात. पण त्यासाठी त्या विमा असणाऱ्या व्यक्तीला मरणं गरजेच आहे. पण मरणार कोण? पाच मित्रांमध्ये कोणीही तयार नव्हतं. आता मरणार कोण हे फिक्स नव्हतं पण त्यांनी प्लॅनला सुरुवात केली. ५ मित्रांपैकी, जोसफने जो टॉनीच्या बारमध्ये बारटेंडर होता त्याने, आपल्या भावाच्या, निकोलसच्या नावावर तीन विमा पॉलिसी घेतल्या. निकोलस नावाचा माणूस अस्तित्वात नव्हता. पण विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी निकोलसचा मृत्यू होण आवश्यक होतं. कारण निकोलसच्या मृत्यूनंतर, ४० लाख रुपये मिळणार होते. पण निकोलस बनेल कोण? हा प्रश्न होता. (Mike Malloy)
तेव्हा या पाचही जणांची नजर मेलॉयवर पडली. त्याचं जगात कोणीच नव्हतं, तो मेला तर कोणी विचारणार सुद्धा नव्हतं की, तो कसा मेला? त्याला निकोलस बनवलं जाऊ शकत होतं. कारण तो डिप्रेशनचा काळ होता, लोक दारू पिऊन जीव देत होते. मेलॉयला भरपूर दारू पाजली गेली, दिवस-रात्र. तो रोज दारु पियून लवकर मरेल असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांचाच खर्च वाढत होता. तो जितकं पित होता, तितकी त्याची तहान वाढत होती. मग त्यांनी एक प्लॅन बनवला. ते मेलॉयला दारूमध्ये मिथेनॉल मिक्स करून पाजू लागले. मिथेनॉल खूप विषारी असतं. मिथेनॉलने भरलेला एक पेग प्यायल्यानंतर त्या सर्व मित्रांना वाटलं की आता मेलॉय काय जीवंत राहत नाही. पण मेलॉय मिथेनॉल प्यायल्यानंतर तो आणखी एक पेग मागू लागला. तो न मेल्यामुळे हताश झालेल्या मित्रांनी त्याला सडलेल्या माशांचं सॅंडविच ज्यामध्ये बारीक खिळे, काचेचे तुकडे मिक्स करून त्याला खायला घातलं. (International News)
पण ते खाल्यानंतरसुद्धा त्याने आणखी एक सॅंडविच मागीतलं. आता हा मित्रांच्या संयमाचा अंत होता. त्यांनी त्याला दारुत काहीही मिसळून देऊ लागले, की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे तो मरेलच. पण मैलॉयला साधी चक्कर सुद्धा आली नाही. थंडीचे दिवस होते. त्या पाच जणांनी ठरवलं की मेलॉयला भरपूर दारू पाजून रस्त्यावर टाकून द्यायच आणि त्याच्या अंगावर थंड पाणी टाकायचं. त्यांनी तसं केलंही भरपूर दारू पाजून त्याला एका मोकळ्या जागेत टाकलं तेव्हा तापमान – २६ डिग्री सेल्सियस होतं. त्याचे कपडे फाडून त्याच्या वर अनेक लीटर थंड पाणी ओतलं गेलं. मग ते त्याला तिथेच सोडून तिथून निघून गेले. या परिस्थित कोणीही सहज दगावलं असतं. (Mike Malloy)
पण दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळं मित्र टोनीच्या बारमध्ये बसून मेलॉयच्या निधनाच्या बातमीची वाट पाहत बसले होते. पण तिथे मेलॉयने येऊन दारूचा आणखी एक पेग मागितला. आता सगळे त्याला मारण्याचे इतके प्रयत्न करून थकले होते. म्हणून त्यांनी एका नव्या माणसाला मेलॉयची सुपारी दिली. ज्याचं नाव होतं ग्रीन तो एक टॅक्सी ड्रायवर ड्रायव्हर होता. ग्रीनने मेलॉयला टॅक्सीने धडक मारली आणि तो पळून गेला. त्यानंतर बरेच दिवस मेलॉय त्या पाच मित्रांना दिसला नाही. म्हणून त्यांनी त्याला म्हणजेच त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मॉर्चरीमध्ये सुद्धा त्याचा शोध घेतला. न्यूजपेपरमध्ये कुठे अॅक्सिडेंटची बातमी आलीये का हे सुद्धा बघितलं, पण मेलॉयचा पत्ता लागला नाही. मग एका आठवड्यानंतर मेलॉय बारमध्ये येऊन दारू पित होता. (International News)
ते पाच मित्र आता त्याला मारण्याचा प्रयत्न करून थकले होते. पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता त्यांनी विम्याचे ४० लाख रुपये मिळवण्यासाठी २० लाख गुंतवले होते. मग त्यांनी आणखी एकाला सुपारी देऊन मेलॉयला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने सुद्धा मेलॉयला गाडीने धडक मारली या प्रयत्नात मेलॉय गंभीर जखमी झाला. पण मेला नाही. आता हे पाच मित्र त्याला असं तिकडम करून मारण्यात वैतागले होते. त्यांनी आता संगल्यानी एकत्र मिळून मारण्याचं ठरवलं. २२ फेब्रुवारी १९३३ त्या रात्री मेलॉय खूप दारू प्यायला नाही नेहमी प्रमाणे त्याला पाजली गेली. नंतर त्याला एका खोलीत नेऊन या मित्रांनी त्याच्या तोंडात गॅसचा पाइप कोंबला आणि तो तोपर्यंत ठेवला जोपर्यंत त्याचा गुदमरून जीव गेला नाही. डॉक्टरांनी सुद्धा मेलॉयच्या मृतदेहाची तपासणी केली नाही. त्याच्या मृत्यूच कारण निमोनिया आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. (Mike Malloy)
======
हे देखील वाचा : अणुबॉम्बची स्पर्धा आणि जगाची चिंता !
====
त्या पाच जणांना इंश्योरेंसचे पैसे मिळाले. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी इंश्योरेंस एजेंटला लाज दिली. मैलॉयचा मृतदेह कोणतही पोर्स मार्टम चेक अप न करता पुरण्यात आला. या गोष्टीमुळेच ते पाचही जण अडकले. पुढे टोनीच्या बारमध्ये एका माणसाचा खून झाला. त्या संदर्भातल्या चौकशी दरम्यान हे कळालं की हे लोक इन्श्योरन्सचे बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी आहेत. त्यामुळे पोलिसांनी मैलॉयचा मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढला. तेव्हा लगेचच हे समोर आलं की त्याचा मृत्यूच कारण कार्बन मोनो ओक्साइड होतं. जे त्याच्या नसांमध्ये फुफ्फुसांमध्ये भरलं होतं. या प्रकरणात पाच मित्रांपैकी चौघांना १९३४ साली फाशीची शिक्षा झाली. असा हा माइक मेलॉय ९ वेळा प्रयत्न होऊन सुद्धा तो जीवंत राहिला. त्याचा खून झाल्यानंतर तो मेला पण त्याची या ९ जीवनदानाची स्टोरी अमर झाली. (International News)