मेक्सिकोची फातिमा बॉश ही मिस युनिव्हर्स २०२५ या मुकुटाची मानकरी ठरली आहे. फातिमानं अगदी सुरुवातीपासून हे मिस युनिव्हर्सचे स्टेज गाजवले होते, ते तिच्या सौंदर्यानं आणि तिच्या संघर्षानेही. कारण स्पर्धेची सुरुवात झाली, तेव्हाच फातिमाचा उल्लेख मुर्ख असा करण्यात आला होता. थायलंडचे दिग्दर्शिक नवाट इत्साग्रिसिलने स्टेजवरच फातिमाला मूर्ख म्हणून संबोधल्यावर मनस्वी अशा फातिमानं क्षणात ही स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. (Fátima Bosch)

फातिमाच्या या निर्णयामुळे प्रचंड गोंधळ उडाला. आयोजकांनी फातिमाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर या स्पर्धेतील अन्य स्पर्धक सुंदरींनीही फातिमाला आपला पाठिंबा जाहीर केला. यावर दिग्दर्शक नवाट यांनी फातिमाची माफी मागितली आणि फातिमानं आपला निर्णय़ मागे घेतला. आता याच फातिमा बॉशला तिच्या सौंदर्यानं आणि बुद्धिमत्तेमुळे मिस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट देण्यात आला आहे. (International News)
फातिमा बॉश मिस युनिव्हर्स झाल्यावर तिच्या या संघर्षाची चर्चा सर्वत्र होत आहे. फातिमा शाळेपासूनच अशा संघर्षाला सामोरी गेली आहे. मिस युनिव्हर्स फातिमा बॉशचा जन्म १९ मे २००० रोजी झाला. मेक्सिकोच्या टेपा, टबास्को येथे जन्मलेली फातिमा बॉश ही एक मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यापूर्वी तिने फॅशन आणि पोशाख डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला असून स्पर्धेतील पोशाखही ती स्वतः डिझाईन करीत आहे. २०२५ चा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वी, फातिमा बॉशने मिस युनिव्हर्स मेक्सिको २०२५ आणि फ्लोर टॅबास्को २०१८ ही पदवी देखील जिंकली आहे. त्यापैकी फ्लोर टॅबास्को ही स्पर्धा तिच्या गावात झाली होती. या स्पर्धेत सहज म्हणून फातिमा सहभागी झाली, आणि स्पर्धची विजेतीही झाली. (Fátima Bosch)
त्यामुळेच आपण पुढच्या सौंदर्य स्पर्धांमध्येही यश मिळवू शकतो, असा तिला विश्वास वाटत होता. असे असले तरी, फातिमाचे शालेय आय़ुष्य संघर्षाचे होते. फातिमा बॉशने एका जाहीर मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की, तिला लहानपणी एडीएचडी आणि डिस्लेक्सियाचा त्रास होत होता. त्यामुळे शाळेत तिला बोलण्यास त्रास होत होता. तिला फारशे मित्र-मैत्रिणी नव्हत्या. शाळेत असतांना ती ब-याचवेळा एकटीच बसलेली असायची. तिला शाळा आवडत नव्हती. या सर्वांमुळे तिचे शाळेचे सोबती तिची टर उडवायचे. पण नंतर तिच्यात आत्मविश्वास आला. या सर्वांवर मात करुन ती शाळेतील एक हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचित झाली. तिनं मेहनतीनं आपली वकृत्वकला विकसीत केली. (International News)
आता २५ वर्षाची मिस युनिव्हर्स २०२५ फातिमा बॉश फर्नांडिज, ही एक प्रसिद्ध मेक्सिकन मॉडेल आणि ब्युटी क्वीन आहे. फातिमा बॉश महिला सक्षमीकरणासाठी काम करते आणि रूढीवादी कल्पनांना आव्हान देते. मिस युनिव्हर्सच्या तिच्या प्रवासातच ती आव्हानांचा कसा सक्षमपणे सामना करु शकते, हे सिद्ध केले आहे. फातिमा या यशामुळे आनंदीत झाली आहे. तिच्यासाठी मिस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट जिंकणे हे तिच्या चिकाटी आणि प्रतिभेची साक्ष देणारी घटना ठरली आहे. तिचा विजय हा तिच्या देशासाठी, मेक्सिकोसाठीही आनंदाचा क्षण ठरला आहे. इथे लक्षात घेतले पाहिजे की, फातिमा ही मॉडेल असली तरी ती उच्चविद्याविभूषीत आहे. (Fatima Bosch)

फातिमा बॉशने मेक्सिकोच्या सर्वोच्च विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिडॅड इबेरोअमेरिकामधून कपडे आणि फॅशन डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने इटलीतील मिलान येथील नुओवा अकादमिया डी बेले आर्टी आणि अमेरिकेतील व्हरमाँट येथील लिंडन या मान्यवर इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आहे. फातिमा फक्त सामाजिक कार्य करत नाही, तर ती जे कपडे तयार करते, ते कपडेही पर्यावरणासाठी पूरक असतील, याची काळजी घेते. तिने डिझाईन केलेल्या कपड्यांमधून पर्यावरण समतोलाचा संदेश दिला जातो. (International News)
========
Trip : यंदाच्या हिवाळ्यात ‘या’ हिल्स स्टेशनला भेट देऊन लुटा थंडीचा पुरेपूर आनंद
========
७४ वा मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकणा-या फातिमा बॉशने, १०० हून अधिक स्पर्धकांना मागे टाकत आहे. २०२० मध्ये मेक्सिकोच्या आंद्रिया मेझा नंतर पाच वर्षानंतर या देशाला मिस युनिर्व्हसचा मान मिळाला आहे. बिझनेस अपटर्नच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये फातिमाची एकूण संपत्ती १ दशलक्ष ते ५ दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे. या उत्पन्नात मॉडेलिंग, ब्रँड डील आणि प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न समाविष्ट आहे. आता मिस युनिर्व्हस झाल्यावर तिच्या संपत्तीमध्ये आणखी वाढ होणार आहे. शिवाय अनेक मान्यवर ब्रॅण्ड तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. (Fátima Bosch)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
