Home » पिरॅमिड आणि विनाशाची चाहूल

पिरॅमिड आणि विनाशाची चाहूल

by Team Gajawaja
0 comment
Mexico Pyramid
Share

मेक्सिको या देशामध्ये प्राचीन सभ्यतेच्या अनेक खुणा आजही जपण्यात आलेल्या आहेत. त्यात पिरॅमिडच्या समावेश आहे. इजिप्तमध्ये जशी भव्य पिरॅमिड आहेत, तशीच पिरॅमिड मेक्सिकोमध्येही आहेत. त्यातील दहा पिरॅमिड सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातात. ओल्मेक, मिक्सटेक, टोल्टेक, झापोटेक, अझ्टेक आणि माया यांसारख्या प्री-कोलंबियन संस्कृतींनी या प्रभावशाली संरचना बांधल्या आहेत. ही सर्व पिरॅमिड सुमारे ९०० ईसापूर्व ते सुमारे १००० AD पर्यंत बांधले गेले आहेत. मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या पिरॅमिडना बघण्यासाठी अनेक पर्यटक मेक्सिकोमध्ये येतात. मात्र त्यापैकीच दोन महत्त्वाची पिरॅमिड ही कोसळली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मेक्सिकोमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या पिरॅमिडना बसला आहेत. (Mexico Pyramid)

हे पिरॅमिड कोसळल्यामुळे मात्र परिसरात घबराट पसरली आहे. पिरॅमिड ज्या जमातीनं बांधली त्यांच्या वारसदारांकडून त्यांची देखभाल अद्यापही केली जाते. त्यांनी ही पिरॅमिड पडणे म्हणजे एका वादळाची सूचना असल्याचे सांगितले आहे. जगभरात काहीतरी अघटीत होणार आहे, त्याचीच सूचना या पिरमिडच्या पतनाद्वारे मिळाल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. मेस्किकोमध्ये गेल्या काही दिवसापासून तुफान पाऊस सुरु आहे. काही वादळांचाही सामना या देशाला करावा लागला. या वादळात या देशाची ओळख असलेल्या दोन पिरॅमिडना धक्का लागला आहे. पुरेपेचा जमातीच्या पूर्वजांनी उभारलेली दोन पिरॅमिड जमिनदोस्त झाली आहेत. यामुळे पुरेपेचा जमातीमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Mexico Pyramid)

या जमातीच्या नुसार ही भविष्यातील संकटाची चाहूल आहे. जगावर विनाशाची छाया आल्यावरच ही पिरॅमिड कोसळतील, असे आपल्या पूर्वजांनी सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सध्या मेक्सिकोत खळबळ उडाली आहे. त्यामुळे मेक्सिकन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री तर्फे एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. या निवेदनानुसार इहुआत्झेओ भागात पिरॅमिडचा भाग कोसळला आहे. पुरेपेचा तलावाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुरातन अशा या पिरॅमिडचा भाग कोसळला. आधिच ही पिरॅमिड कमकुवत झाली होती. त्यात पावसाच्या फटक्यानं पिरॅमिड कोसळली. त्यामळे त्यासंदर्भात व्यक्त होत असलेल्या शंका या चुकीच्या असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. (Mexico Pyramid)

मेक्सिकोमध्ये माया आणि पुरेपे जमातीच्या चाली रिती मानणारा खूप मोठा जनसमुदाय आहे. त्यांच्यात या पिरॅमिडच्या कोसळण्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इतिहासकारांच्या मते, प्राचीन पुरेपेचा जमातीने त्यांच्या महत्त्वाच्या देवता कुरीकावेरीला मानवी यज्ञ अर्पण करण्यासाठी यकाटा या पिरॅमिडचा वापर केला. याकाता पिरॅमिड मिचोआकन राज्यातील इहुआत्जो येथे आढळतात. अशाच पिरॅमिडचा भाग कोसळला आहे. त्यामुळे देवतांचा कोप झाल्याचा समज आत्ता या जमातीमध्ये झाला आहे. या भागातील स्थानिक निवासी पिरॅमिड कोसळणे म्हणजे, विनाशकारी वादळाचे संकेत आहेत. पुरेपेचा जमातींनी अझ्टेकांचा पराभव केला आणि १५१९ मध्ये स्पॅनिश आक्रमणापूर्वी ४०० वर्षे राज्य केले. यावेळी आपल्या पूर्वजांनी अशा घटनांचे संकेत लिहून ठेवल्याचे पुरेपेचा जमातींच्या वारसांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेक्सिकोमध्ये भरपूर पाऊस पडत आहे. इहुआत्झेओ प्रदेशात, जिथे पिरॅमिड कोसळला त्या भागातील तलावाच्या परिसरात मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे या भागात अधिक भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता मेक्सिकोच्या पुरातन वस्तुंचे जतन करणा-या विभागातर्फे या पिरॅमिडची नव्यानं उभारणी कऱण्याबाबत विचार सुरु आहे. एक पिरॅमिड पूर्णपणे पडला असून दुस-या पिरॅमिडच्या भिंती पडल्या आहेत, या भिंतीही नव्यानं उभारण्यात येणार आहे. (Mexico Pyramid)

====================

हे देखील वाचा : रशियाचं सुद्धा होतं भारत जिकण्याचं स्वप्नं !

===================

मेक्सिकोमध्ये अनेक वर्षापासून रहाणा-या आदिवासी जमातींची संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील पुरेपेचा या आदिवासी जमातीचा इतिहास हा युद्धानं भरलेले आहे. या जमातीच्या लोकांना रक्तपिपासू म्हटले जात असे. त्यांनी ४०० वर्ष राज्य केले आणि या दरम्यान त्यांनी अनेक मनुष्यांचा बळी आपल्या कुरीकेरी देवाली दिल्याचीही माहिती आहे. या पिरॅमिडचा वापरच या सर्वांसाठी होत असे. देवाला अर्पण असणारी ही पिरॅमिड नंतर फक्त पर्यटनासाठी मुख्य आकर्षण ठरली. आता हाच वारसा पडल्यामुळे पुरेपेचा जमातीचे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. (Mexico Pyramid)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.