जगातील विविध देशात असे काही नियमत आहेत ते ऐकून आपलं डोक फिरतं. असे नियम ऐकल्यानंतर आपण स्वत:लाच प्रश्न विचारु लागतो की, खरंच असे काही नियम अस्तित्वात असतात का? अशातच नॉर्थ कोरियातील नियम तर आपल्याला माहिती आहेतच. पण जगातील असा एक देश आहे जेथे तुम्ही लठ्ठ असल्याचे म्हटले आणि तुम्हाला शिक्षा दिली जात असल्याचे बोलले तर आपल्याला रागच येणार. पण हे खरं आहे. जापान मधील लोक तुम्ही पाहिली असतील ही नेहमीच सडपातळ आणि उंच बांध्याची असतात. या देशात आपल्याला लोक जाड, लठ्ठ का नाही दिसत? यामागील कारण असे की, जापानमध्ये त्या संदर्भात नियम आहे. जापान मध्ये शरिरापेक्षा अधिक वजन असणे म्हणजेच लठ्ठ असणे हे बेकायदेशीर असल्याचे तेथे मानले जाते. (Metabo Law)
जापान मधील या विचित्र कायद्यामुळे जगातील सर्वाधिक कमी लठ्ठपणाचा दर हा तेथेच दिसून येतो. कायद्याव्यतिरिक्त जापान मधील लोकांचे डाएट आणि तेथील ट्रांन्सपोर्ट सिस्टिम सुद्धा लोकांना स्लिम ठेवण्यासाठी भुमिका निभावतात. येथील लोक आपल्या डाएटमध्ये मासे, भाज्या आणि भाताचा वापर करतात. तर सार्वजनिक ट्रांन्सपोर्टसाठी दूरवर चालत जाणे किंवा पायी चालत जाण्याचे येथे कल्चर असल्याने येथील लोक अधिक जाड नसतात. तर जाणून घेऊयात जापानच्या कायद्याबद्दल अधिक.
लठ्ठपणासंदर्भात काय सांगतो कायदा?
जापानमध्ये लठ्ठपणासंदर्भातील कायद्याला Metabo Law असे म्हटले जाते. तो २००८ मध्ये जापानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयाद्वारे आणण्यात आला होता. या कायद्याअंतर्दत ४० ते ७४ वर्षातील पुरुष आणि महिलांच्या कमरेचे वर्षावर्षाला माप घेतले जाते. महिलांच्या कंबरेची साइज ३३.५ इंच आणि पुरुषांसाठी ३५.४ इंच आहे.
जापानमध्ये हा कायदा का आणण्यात आला?
मेटाबो लॉ अशा कारणास्तव लागू करण्यात आला कारण येथील मोठ्या संख्येने वृद्धांचा वर्ग आहे. या सर्वांवर उपचार करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. अशातच सरकारला नकोय ही, कोणीही लठ्ठपणाचे शिकार होऊन मधुमेहासारख्या आजारपणाशी लढावे. जर असे झाल्यास उपचारासाठी खुप खर्च होतो. त्यामुळेच असा कायदा आणण्यात आला. (Metabo Law)
हे देखील वाचा- ‘वॉर्सा मम्मी प्रकल्प’ ठरतोय जगभरात कौतुकाचा विषय…
लठ्ठ झाल्यास काय होते शिक्षा?
अधिकृतरुपात जापानमध्ये लठ्ठ झाल्यास शिक्षा दिली जाईल असा नियम तर नाही. पण या व्यतिरिक्त अन्य काही गोष्टी आहेत, ज्यामुळे लोक सडपातळ होऊ शकतात. जर एखादा लठ्ठ असेल तर त्याला व्यायाम, डाएट करण्यास भाग पाडले जाते. बारीक करण्यासाठी काही क्लासेस ही घेतले जाता. या क्लासचे आयोजन इंन्शुरन्स कंपनीकडून केले जाते.