फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनी मेटाने (Meta) प्रीमियम वेरिफिकेशन सर्विसची घोषणा केली आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा वेरिफाइड अकाउंट म्हणजेच ब्लू टीकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. वेबसाठी याची किंमत ११.९९ डॉलर आणि आयओएससाठी १४.९९ डॉलर ठरवण्यात आली आहे.
याच आठवड्यात ही सर्विस पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये सुरु केली जाणार आहे. अन्य देशांत ही लवकरच ही सर्विस सुरु करण्यात येणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी याची घोषणा केली आहे. जुकरबर्ग यांनी असे म्हटले की, या आठवड्यात आम्ही मेटा वेरिफाइड सुरु करणार आहोत. ही एक सब्सक्रिप्शन सर्विस आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपले अकाउंट वेरिफाइड करु शकता. युजर्स आपल्या शासकीय आयडीच्या माध्यमातून अकाउंट वेरिफाइड करु शकता.
आता वेरिफिकेशनसाठी मिळतो ब्लू बॅच
क्रिएटर्स, सार्वजनिक व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, कंपन्या, ब्रांन्ड्सच्या पेजला फेसबुक कडून वेरिफिकेशन नंतर एक ब्लू बॅच दिला जातो.
ट्विटरची यापूर्वीच घोषणा
यापूर्वी ट्विटरने पेड सब्सक्रिप्शन सर्विस Twitter Blue लॉन्च केले होते. भारतात ट्विटर युजर्सला आपल्या अकाउंट्ससाठी ब्लू टीकसाठी मोबाईल फोनच्या मासिक प्लॅन प्रमाणेच प्रत्येक महिन्याला ९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने वेबसाठी ट्विटर ब्लूचे दर ६५० रुपये आणि मोबाई अॅप युजर्ससाठी ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. ट्विटरने असे म्हटले की, मंजूरी मिळाल्यानंतर वेरिफिकेशन मोबाईल क्रमांकासह ब्लू ग्राहकांना ब्लू टीक दिले जाईल. प्लॅटफॉर्मने वेब युजर्ससाठी वर्षिक प्लॅन ही लॉन्च केला आहे. त्यासाठी युजर्सला ६८०० रुपये मोजावे लागतील.
काय असणार खास
इंस्टाग्राम आणि फेसबुक पेड सब्सक्रिप्शन मॉडेलमध्ये युजर्सला काही खास सर्विस ऑफर केली जाऊ शकते. त्याचसोबत एचडी व्हिडिओ अपलोड करण्यासह अन्य सर्विस ही दिली जाऊ शकते. आता पर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध लोकांना ब्लू टीक वेरिफिकेशन दिले जात होते. (Meta)
हे देखील वाचा- फोनची स्क्रिन लॅाक असेल तरीही पाहता येतील YouTube चे व्हिडिओ
फेसबुकवर कसे मिळवावे ब्लू टीक
तुम्हाला फेसबुक प्रोफाइलवर ब्लू टीक हवी असेल तर त्यासाठी फेसबुकच्या गाइडलाइन्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला एकदा ब्लूक टीक मिळाल्यानंतर जरी तुमचे नाव कॉपी केले गेले तरीही तुमचे प्रोफाइल वेगळे दिसणार आहे. खरंतर फेसबुककडून सहज अकाउंट वेरिफाइड करत नाही. मात्र एकदा ब्लू टीक मिळाल्यानंतर तुमचे पेज अधिक विश्वसनीय होते.