सर्वत्र फक्त मेट गालाचीच चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर मेट गाला या इव्हेंटमधील सेलिब्रिटीजचे फोटो कमालीचे व्हायरल होत आहे. फॅशन इंडस्ट्रीमधील अतिशय मोठा प्रतिष्ठेचा आणि ग्लॅमरस इव्हेंट म्हणून मेट गाला या शो ला ओळखले जाते. मेट गालाची दुसरी ओळख म्हणजे या शो मध्ये दिसणारी अतिशय विचित्र फॅशन. हो या शो मध्ये सेलिब्रिटीज विविध अंतरंगी फॅशनचे कपडे परिधान करून रेड कार्पेटवर चालतात. (Met Gala)
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा सोहळा न्यूयॉर्कमध्ये संपन्न होतो. यावर्षी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री कियारा अडवाणी, पंजाबी गायक संगीतकार दिलजीत दोसांझ यांनी पहिल्यांदाच या इव्हेंटमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. यासोबतच ईशा अंबानी आणि प्रियांका चोप्रा देखील नवरा निकसोबत या इव्हेंटमध्ये स्पॉट झाली. या सर्व भारतीय सेलिब्रिटींनी आपल्या लुक्सने कमालीची वाहवा मिळवली. (Met Gala 2025)
मेट गाला (Met Gala) हा दरवर्षी न्यू यॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जाणारा एक प्रसिद्ध फॅशन शो आहे. १९४८ मध्ये या इव्हेंटला सुरुवात झाली. दरवर्षी या शो साठी विविध थीम ठेवल्या जातात आणि त्याच थीमला अनुसरून सेलिब्रिटी आपला लूक तयार करतात. यंदा २०२५ सालासाठी मेट गालाची थीम ‘सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल’आहे. (Marathi Top News)
दरवर्षी ‘व्होग’ मासिकाकडून वेगवेगळी थीम जाहीर केली जाते. दरवर्षी मेट गालाची थीम वेगळी असते. ही थीम कधी निसर्गाशी संबंधित असते, तर कधी काल्पनिक कथांशी संबंधित असते. पण आता काही काळापासून फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेट गालाची थीम ठेवली जात आहे. हा शो खूपच प्रसिद्ध आणि मानाचा समजला जातो. मात्र असे असूनही या शो साठी खूपच कठीण आणि हटके नियम, अटी ठेवण्यात आल्या आहे. त्याची पूर्तता झाली नाही तर मोठं मोठ्या सेलिब्रिटीजला देखील माघार घ्यावी लागते. मग या इव्हेंटच्या नक्को कोणत्या अटी / नियम आहेत चला जाणून घेऊया. (Marathi Latest News)
=======
हे देखील वाचा : Met Gala : अंतरंगी फॅशन अशी ओळख असलेला ‘मेट गाला इव्हेंट’
=======
१. मोबाईल नाही, सेल्फी नाही
मेट गालामध्ये मोबाईल सेल्फी काढण्याची परवानगी नसते. या शोमध्ये सामील झालेल्या सेलेब्रिटींना मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. खाजगी दौरे, जेवणाचे कार्यक्रम आणि परफॉर्मन्स पूर्णपणे शूट केले जात नाहीत. हा कार्यक्रम लोकांना दाखवला जात नाहीत. सेलिब्रिटीज अनेकदा त्यांचे या इव्हेंटमध्ये चोरून सेल्फी काढतात. बहुतेक सेल्फी विशेषतः बाथरूममध्ये क्लिक केले जातात. (Top Trending News)
२. औषधी वनस्पती, कांदा-लसूणवर बंदी
अॅना विंटूर मेट गाला या वर्षातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी फॅशन नाईट असेल याची दक्षता घेतात. पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. तोंडाची दुर्गंधी आणि वाईट फोटो टाळण्यासाठी मेट गाला डिनर मेनूमधून काही खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. जेवणात कांदा, लसूण किंवा ओवा नसतो, जेणेकरून कोणाच्याही तोंडातून कांद्याचा वास येऊ नये किंवा फोटो काढताना हिरव्या वनस्पती दातांमध्ये अडकू नयेत. (Marathi Top News)
३. धूम्रपानावर बंदी
मेट गाला कार्यक्रमात कितीही मोठा सेलेब्रिटी असला तरी त्याला धुम्रपानाची सक्ती करण्यात आली आहे. शोमध्ये घालण्यात आलेल्या कपड्यांचे कलेक्शन खराब होऊ शकते किंवा त्यातून धुराचा वास येऊ शकतो, म्हणून मेट गालामध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे. शिवाय या कपड्यांवर ठिणग्या पडू नयेत आणि वातावरण धूरयुक्त होऊ नये म्हणून हा नियम कडकपणे पाळला जात आहे. (Social News Marathi)
४. एन्ट्री तिकीट
मेट गाला हा जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट आहे. या इव्हेंटला कोणत्याही सेलिब्रिटीला आमंत्रणाशिवाय एन्ट्री मिळत नाही. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांची यादी व्होगच्या मुख्य संपादकांनी निवडलेली असते. प्रत्येक सेलिब्रिटीला येथे स्वतःच्या जागेसाठी पैसे मोजावे लागतात. प्रत्येक सीट आणि टेबलसाठी निश्चित शुल्क असते. मेट गाला हा एक फंडरेजिंग कार्यक्रम आहे. येथे जमा होणारा सर्व पैसा सात दशकं जुने फॅशन कलेक्शन जतन करण्यासाठी वापरला जातो. एका सीटसाठी ६३ लाख १४ हजार ९८५ आणि संपूर्ण टेबल सीटची किंमत २ कोटी ९४ लाख ६६ हजार, ७१० इतकी आहे. ज्या फॅशन हाऊसेसचे कपडे सेलिब्रिटी परिधान करतात ते रेड कार्पेटवर त्यांचे काम दाखवण्याच्या बदल्यात सीटची किंमत भरावी लागते. (Fashion News Marathi)
५. बसण्याची व्यवस्था
इथे जरी तुम्ही तुमच्या सीटसाठी पैसे दिले असले तरी तुम्ही तुमची सीट निवडू शकत नाही. कोण कुठे आणि कोणासोबत बसेल याचा खूप विचार केला जातो. मेट गालामध्ये कोणता स्टार कोणत्या स्टारच्या शेजारी बसेल याची संपूर्ण योजना तयार केली जाते. या कार्यक्रमात पती-पत्नी एकत्र बसू शकत नाहीत. मेट गालामध्ये, लोकांना एकमेकांशी नातं जोडण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. लोकांना एकमेकांमध्ये मिसळण्यास त्यांना प्रोत्साहित केले जाते. डिसेंबरच्या सुरुवातीलाच आयोजकांनी बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले जाते. (Top Stories)
६. पोशाखासाठी पूर्व मंजुरी
मेट गालामध्ये सहभागी होताना तुमचा ड्रेस त्यावर्षाच्या थीमला अनुसरूनच असावा. शिवाय हा पोशाख घालण्याआधी त्याला व्होगच्या मुख्य संपादकांची आगाऊ मान्यता असणं अत्यावश्यक आहे. व्होगच्या एडिटर एना विंटूर स्वतः या पोशाखांना मान्यता देतात. या पद्धतीला AWOK म्हणतात म्हणजेच ‘अॅना विंटूर ओके’ असा त्याचा अर्थ असतो. (International news in Marathi)
=======
हे देखील वाचा :WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit
=======
मेट गालाचे गेस्ट कोण असते?
मेट गालासाठी पाहुण्यांची यादी Vogue संपादक अॅना आणि त्यांच्या टीमने निवडली आहे. दरवर्षी ६०० जणांची यादी तयार केली जाते. यामध्ये, ज्या सेलेब्सना निमंत्रण पाठवले जाते ते एकतर मेट म्युझियम किंवा वोगसाठी आधीच मोठे देणगीदार आहेत किंवा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब व्हायचे आहे. एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला देखील आमंत्रित केले जाते. अशा सेलिब्रिटींना देखील आमंत्रित केले जाते जे हा प्रोग्राम स्पॉन्सर करतात.