Mental Health : तुम्ही बहुतांशजणांनी असा अनुभव घेतला असेल की, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुम्ही तणावाखाली जाता. आजच्या काळात महागाई सातत्याने वाढत चालली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही होतो. वर्ष 2022 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, अमेरिकेतील 90 टक्के लोक महागाईमुळे एंग्जायटीचे शिकार होत आहेत.
हैराण करणारी गोष्ट अशी की, कोविडच्या काळात लोकांना जेवढा ताण आला नसेल त्यापेक्षा अधिक ताण महागाईमुळे आला. जाणकरांच्या मते, महागाईच्या कारणास्तव केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातील लोकांमध्ये तणावाची स्थिती वाढत आहे. आरोग्यासाठी महागाई अत्यंत धोकादायक ठरू शकते.

Mental Health
अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशनने महागाईसंदर्भात एक सर्व्हे केला होता. यामध्ये काही हैराण करणाऱ्या गोष्टींबद्दल खुलासा झाला होता. या सर्व्हेच्या रिपोर्ट्सनुसार, महागाईच्या कारणास्तव 90 टक्के लोक तणाव आणि एंग्जायटीचे शिकार होत आहेत. सातत्याने ही समस्या वाढत चालली आहे. चिंतेची बाब अशी की, लोकांनी कोविडमध्ये जेवढा तणावाचा सामना केला नसेल त्यापेक्षाही अधिक तणावाचा सामना महागाईमुळे करत आहेत. संयुक्त राज्य अमेरिकेत 90 टक्के लोक महागाईमुळे एंग्जायटीच्या समस्येचा सामना करत आहेत. पगार कपात झाल्याने लोकांमध्ये तणाव वाढू लागला आहे.
आतापर्यंत करण्यात आलेल्या काही रिसर्चनुसार, उत्पन्न आणि मानसिक आरोग्याचा एकमेकांशी थेट संबंध असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैशांची कमतरता असते तेव्हा तो तणावाखाली जातो. दीर्घकाळापर्यंत ही समस्या राहिल्यास व्यक्ती एंग्जायटी किंवा डिप्रेशनचा शिकार होतो. (Mental Health)
अमेरिकेतील सर्व्हेनुसार, वाढत्या महागाई आणि कमी झालेले उत्पन्न याचा मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट पद्धतीने प्रभाव पडत आहे. दीर्घकाळापर्यंत तणावाखाली असणे मानसिक आरोग्यासंबंधित आजार निर्माण करू शकतात. आर्थिक तंगी निराशेचे करण ठरू शकते.