Home » Garba : ‘या’ ठिकाणी चक्क पुरुष साड्या नेसून करतात गरबा

Garba : ‘या’ ठिकाणी चक्क पुरुष साड्या नेसून करतात गरबा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Garba
Share

नुकताच नवरात्रीचा उत्सव समाप्त झाला. नऊ दिवस आदिमाया, आदिशक्तीचा जागर साजरा झाला. नवरात्र म्हणजे देवीची आराधना आणि गरबा आणि दांडियाचा रास. गरबा, दांडियाशिवाय नवरात्र कायम अपूर्णच असते. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा दांडीया करतात. नवरात्र आणि गरब्याचा मोठा उत्साह गुजरातमध्ये जास्त पाहायला मिळतो. देवी समोर रात्री गरबा करणे म्हणजे तिची उपासना आणि भक्ती करण्याची एक पद्धतच आहे. स्त्री, पुरुष दोघेही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गरबा करतात.  (Todays Marathi Headline)

या उत्साहात महिलांचा सहभाग जास्त असतो. गरबा खेळायला जाताना महिला, पुरुष दोघेही छान तयार होऊन जातात. गरबा खेळण्यासाठी स्त्रिया चनियाचोली तर पुरुष विविध प्रकारचे जॅकेट्स आणि कपडे घालतात. मात्र अहमदाबाद येथे एक असा समुदाय आहे ज्यातील पुरूष साडी नेसून गरबा खेळण्यासाठी येतात. ही जवळपास २०० वर्षांपूर्वीची परंपरा आहे. जाणून घेऊया याच अनोख्या परंपरेबद्दल. (Top Marathi News)

अहमदाबाद शहरात एक ठिकाणी ही अनोखी प्रथा पाळली जाते. सदू माता नी पोळ परिसरातील पुरुष दरवर्षी साड्या नेसून गरबा करतात. हा केवळ गरबा नाही, तर २०० वर्षांची जुनी परंपरा आहे. या गरब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला, त्यामुळेच हा गरबा कमालीचा चर्चेत आला. सदू माता नी पोळ मध्ये दरवर्षी नवरात्रीच्या आठव्या दिवशी ही २०० वर्षे जुनी प्रथा येथे पाळली जाते. या दिवशी बोराट समाजातील पुरुष साडी नेसतात आणि गरबा खेळतात. असे म्हटले जाते की, पूर्वी या समाजाला एक शाप मिळाला होता. आणि त्या शापामुळे ही प्रथा पाळली जाते. (Latest Marathi News)

Garba

या अनोख्या गरब्याला ‘शेरी गरबा’ म्हणून ओळखले जाते. या गरब्याबद्दल एक आख्ययिका सांगितली जाते. एका प्रचलित आख्यायिकेनुसार, २०० वर्षांपूर्वी साडूबेन नावाच्या एका महिलेवर मोठं संकट आले. एका मुघल व्यक्तीची वाईट नजर या महिलेवर पडली. आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी साडूबेन यांनी बारोत समुदायाच्या लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र, साडूबेनचे रक्षण करण्यात या बारोट समुदायातील लोकांना अपयश आले. या संकटात साडूबेन यांच्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हे पाहून साडूबेन यांचा राग अनावर झाला. याच रागात त्यांनी या बारोट समाजातील पुरुषांना शाप दिला. (Top Trending News)

========

Dussehra : दसरा स्पेशल-रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे

========

त्या म्हणाल्या, या समुदायाच्या पुढच्या पिढ्या कधीही धैर्याने, हिमतीने जगू शकणार नाहीत. हा शाप दिल्यानंतर त्यांनी आत्मदहन केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या याच शापातून मुक्तता मिळण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी आणि सदुबेनच्या त्यागाचा आदर राखण्यातही बारोट समुदायाचे पुरुष दरवर्षी साड्या परिधान करून गरबा करतात. हा विधी ‘सदूमा ना गरबा’ या नावाने ओळखला जातो आणि नवरात्रीच्या आठव्या रात्री तो केला जातो. एवढेच नाही तर सदू मातेच्या नावाने एक मंदिर बांधण्यात आले आहे, जिथे साडी नेसलेले पुरुष गरबा करतात, प्रार्थना करतात आणि देवीची क्षमा मागतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.