लहानपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ अशा आयुष्याच्या तीन टप्प्यातून प्रत्येकाला जावेच लागते. स्वत: ला फिट ठेवणे आणि कमी वयाचे दिसणे हे सर्वकाही प्रत्येकाच्या हातातच असते. नियमितपणे योगा, व्यायाम, हेल्थी खाणंपिण याच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. जसे महिला असो किंवा पुरुष, प्रत्येकाला तरुण दिसायचे असते. मात्र तुम्ही नेहमी पाहिले असेल की, महिला नेहमीच आपल्या नवऱ्याला तुम्ही म्हातारे झालात अशी तक्रार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ही बाब खरी आहे ते? (Men vs Women Age)
महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळी लवकर वृद्ध होतात. सर्वाधिक आनंदीत राहणारा देश फिनलँन्डच्या युनिव्हर्सिटी ऑफ जिवास्कायला यांनी नुकत्याच केलेल्या आपल्या रिसर्चमध्ये असे समोर आले की, पुरुष मंडळी जैविक रुपात महिलांपेक्षा अधिक वृद्ध होतात. म्हणजेच व्यक्तींमध्ये वृद्धापकाळ हा लिंगाच्या आधारावर असतो. तर जाणून घेऊयात लिंगाच्या आधारावर वाढत्या वयाच्यासंदर्भात करण्यात आलेल्या या अभ्यासाबद्दल अधिक.
वयाच्या पंन्नाशीत ५४ वयाचे दिसतात पुरुष
तज्ञांनी दावा केला आहे की, वयाच्या ५० व्या वर्षातच पुरुष जैविक रुपात महिलांच्या तुलनेत चार वर्षांनी मोठे असतात. म्हणजेच चार वर्ष मोठे दिसतात. शोधानुसार याचे कारण आहे की, पुरुषांच्या गरजेनुसार अधिक धुम्रपान करणे. त्याचसोबत पुरुषांच्या शरिराची रचना अशी असते की, ज्यामुळे ते अधिक वयाचे दिसतात. अधिक मोठे शरिर असणे सुद्धा याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
एपीजेनेटिक घड्याळ्यांचा वापर
लिंगाच्या आधारावर वाढत्या वयावर अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी एपीजेनेटिक घड्याळाचा वापर केला. या घड्याळ्याच्या माध्यमातून रक्ताचे नमूने घेत डीएनए मिथाइलेसन लेवलचा वापर करुन व्यक्तीच्या जैविक वयाचा अनुमान लावला जातो. एजीजेनेटिक क्लॉक आपली एल्गोरिदम पॉवरच्या मदतीने असे सांगते की, एक निश्चित वयात एखाद्या व्यक्तीचे जैविक वय किती आहे. म्हणजेच तो कोणत्या वयाचा दिसत आहे.
लहान वयातच दिसून येऊ शकते अंतर
जेरोन्टोलॉजी रिसर्च सेंटर अॅन्ड द फॅकल्टी ऑफ स्पोर्ट अॅन्ड हेल्थ सायन्सचे डॉक्टरेट शोधकर्ता अन्ना कंकानपा अशा सांगतात की, पुरुष जैविक रुपात महिलांच्या तुलनेत मोठे अशतात. जेव्हा एखादा पुरुष ५० वर्षाचा होतो तेव्हा त्याची वय महिलेच्या तुलनेत चार जैविक वर्षाने मोठे असते. हे अंतर फार कमी वयात दिसण्यास सुरुवात होते. मजेशीर गोष्ट अशी की, जर लक्ष दिल्यास पुरुषांमध्ये २० वर्षाच्या वयात हे अंतर दिसून येऊ शकते. (Men vs Women Age)
हे देखील वाचा- जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक
जुळ्या भावंडांमध्ये सुद्धा अंतर
लिंगादरम्यान, जैविक वयातील अंतर समजण्यासाठी वैज्ञानिकांना जुळी भावंडांमधील अभ्यास केला. यामध्ये त्यांना काही अशा प्रकारचे अंतर दिसून आले. या प्रकरणात सुद्धा भाऊ हा आपल्या जुळ्या बहिणीच्या तुलनेत जैविक रुपात एका वर्षापेक्षा मोठा दिसून येत होता. वैज्ञानिकांनी याचे कारण सांगत असे म्हटले की, कारण जुळ्या भावंडांचे अर्धे जीन्स समान असतात आणि ते एकाच वातावरणात मोठे होतात. यामुळे जुळे बहिण-भाऊ सुद्धा लिंगाच्या आधारावर जोविक वयात अधिक अंतराने असल्याचे दिसून येतात.