प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टी करण्याची किंवा खाण्याची सवय असते. मात्र जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीने विचित्र गोष्टी खाल्ल्याचे ऐकतो तेव्हा आपल्या एकदम कसेतरी होते. अशातच जर एखादा व्यक्ती जर पाल खात असल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही काय कराल? त्याचसोबत बहुतांशजण पाल पाहिली की ओरडतात आणि त्या ठिकाणाहून पळ काढतात. अशातच एक व्यक्ती आहे जो काही दशकांपासून पाल खातो. हे ऐकून किळसवाणे वाटेल पण हे खरं आहे. दररोज पाल खात असल्याने त्या व्यक्तीबद्दल तर चर्चा होतेच. पण आपण खरंच विचार केला तरीही या गोष्टीवर आपल्या कोणाचा ही विश्वास बसणार नाही. हा प्रकार आहे मध्य प्रदेशातील कैलाश नावाच्या व्यक्तीचा. तो खुप वर्षांपासून पाल खात असल्याने त्याचे नाव विम पुरुष असे ठेवण्यात आले आहे. याच्या बद्दल काही तथ्य सुद्धा आहेत त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Men eat Lizard)
पाल खाण्याची आवड
प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड असते. मात्र तुम्ही कधी एखाद्याला पाल खाण्याची आवड असल्याचे ऐकले आहे का? खरंतर कैलाश हा मैना गावात राहतो आणि त्याला पाल खाणे खुप आवडते. त्याला पाल खाण्याची लत लागली असून तो एक दिवस सुद्धा पाल खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही.
रोज पितो पालीचे ज्यूस
कैलाश हा गेल्या दोन दशकांपासून पाल उकळून खातो आणि त्याचे सूप सुद्धा बनवून पितो. हा व्यक्ती उकळलेले पाणी सुद्धा पितो. दररोज कैलाश ३ पालींचे ज्यूस प्यायचा. असे न केल्यास त्याला झोपनच यायची नाही. पालीचे ज्यूस नाही प्यायले तर त्याला बेचैन झाल्यासारखे वाटते. कैलाश हा दररोज १० पाली तरी खातो असे सांगितले जाते. (Men eat Lizard)
हे देखील वाचा- झोपलेल्या महिलेच्या तोंडात घुसला चक्क ४ फूट साप
विषारी किडे सुद्धा खाल्ले आहेत
कैलाश पाली सुद्धा नव्हे तर रांगणारे किडे सुद्धा खाणे पसंद करतो. त्याने आजवर ६० पेक्षा अधिक रेंगाळणारे विषारी किडे खाल्ले आहेत. तुम्ही सुद्धा विचार करुन हैराण व्हाल की, हे सर्व पचवतो कसे? खरंतर कैलाशवर या सर्व गोष्टी खाल्ल्याच्या कोणताही परिणाम होत नाही. गावात जेव्हा एखाद्याला साप चावतो तेव्हा कैलाश त्याचे रक्त पिऊन काढतो आणि जीव वाचवतो.