Home » Island : जगातील असे बेट जिथे पुरुषांना जाण्यास आहे मनाई

Island : जगातील असे बेट जिथे पुरुषांना जाण्यास आहे मनाई

by Jyotsna Kulkarni
0 comment
Island
Share

या जगामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, जे कायम आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. जगात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल बरीच रहस्यं सांगितली जातात किंवा या ठिकाणांना पाहून खरंच दैवी चमत्करच असल्याच्या भावना निर्माण होतात. मात्र यासोबतच अशी देखील काही ठिकाणं आहेत, जिथे मनुष्याला परवानगी नाही. तर काही ठिकाणी पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. काही ठिकाणी महिलांना जाण्यास बंदी आहे. आता पुरुषांना बंदी आणि महिलांना बंदी अशी ठिकाणं म्हणजे मंदिरं. भारतातील खासकरून दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या काही प्रथा पाळल्या जातात. मात्र या जगात भारताबाहेर एक असे ठिकाण आहे, जिथे पुरुषांना जाण्यास परवानगी नाही. तिथे फक्त महिलांनाच जायला मिळते. (Island)

या जगात एक असे बेट आहे, जिथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे. या बेटावर फक्त महिला जातात. आता जगात असे अनेक बेटं आहेत, जिथे डोळे दिपवणारे सौंदर्य, कमालीची शांतात आणि निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळते. यातलेच एक बेटं म्हणजे, ‘सुपरशी आयलंड’. फिनलँडच्या किनाऱ्याजवळ, समुद्रांच्या लाटा आणि शांत,दाट जंगलांच्या मध्ये लपलेले हे बेट खूप खास आहे. यामागचे कारण म्हणजे, ही जागा त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना काही काळासाठी जगाच्या अपेक्षांपासून मोकळं होऊन फक्त स्वतःसोबत राहायचं आहे. या रहस्यमय बेटाला सुपरशी आयलंड म्हणतात. फिनलंडच्या बाल्टिक समुद्रात वसलेले हे बेट घनदाट जंगलांनी आणि शांत समुद्रांनी वेढलेले आहे. येथे पारंपारिक फिनिश सौना सुविधा देखील आहेत. बेटाचे तारांकित रात्रीचे आकाश, गर्दीपासून पूर्णपणे दूर, एक स्वर्ग आहे. (Marathi)

Island

‘सुपरशी आयलंड’ असं या बेटाचे नाव आहे. ८.४ एकरचे बेट म्हणजे शांततेचा महासागर आहे. हेलसिंकिपासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. बेटावर गेल्यास खडकाळ किनारे, उंच झाडं आणि मोकळं आकाश असं निसर्गाचं अद्भूत सौंदर्य पाहायला मिळेल. महिलांसाठी हे सर्वात सुरक्षित बेट आहे. मुख्य म्हणजे या आयलंडवर पुरुषांना प्रवेश नाही. या बंदी मागे पुरुषांप्रती कोणत्याही प्रकारचं राग, द्वेष किंवा मत्सर नसून केवळ महिलांना धावपळीच्या आयुष्यातून ब्रेक मिळावा यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. (Latest Marathi Headline)

सामाजिक दबाव, पुरुषांची मक्तेदारी, जजींज या गोष्टींपासून दूर राहून महिलांना मनसोक्त जगता यावं, त्यांनीही आयुष्याचा आनंद घ्यावा. या बेटावर महिलांना कोणाला प्रभावित करण्याची धडपड नसते किंवा कोणाच्या नजरेचे दडपण नसते. इथे संवाद सहज होतो आणि शांतता अधिक सुखावह वाटते.यासाठी हा आयलंड उत्तम आहे. विशेष म्हणजे प्रायव्हसी मिळावी म्हणून येथे फक्त आठ महिलानांच प्रवेश देण्यात येतो. तसेच इथे लाकडापासून बनवलेले सुंदर केबिन आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला लग्जरी विला आहे. (Top Stories)

=========

Panda Diplomacy : पांडा मागचे राजकारण

=========

या अनोख्या आयलंडची निर्मिती एका मोठ्या टेक कंपनीच्या माजी सीईओ क्रिस्टिना रॉथ यांनी केली आहे. आयुष्यातील स्त्रीच्या कामाची, धावपळीची दखल घेत स्त्रियांनाही शांतता हवी या हेतूतूनच वुमन ओन्ली आयलंडचा जन्म झाला आहे, असे सांगण्यात येत. SuperShe आयलँडच्या संकेतस्थळानुसार हा आयलँड पूर्व अमेरिकन क्रिस्टीन रोथ यांनी २०१८ साली खरेदी केला होता. त्यांनीच महिलांना मुक्तपणे जगता यावे यासाठी नो मेन अलाऊड हे धोरण ठरवले होते. पुढे २०२३ साली सुपरशी या आयलँडला देयान मिहोव यांनी साधारण १० कोटी रुपयांना खरेदी केले. देयान मिहोन यांनीदेखील पुरुषांना बंदी असलेले हे धोरण कायम चालू ठेवले. या आयलँडवर घनदाट जंगल आहे, पाणी आहे, आलिशान वुडन व्हिला आहे. महिला येथे योगा, मेडिटेशन करायच्या. सागराच्या किनाऱ्यावर फिरण्याचीही तेथे संधी होती. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.