Home » मेगन मार्कल म्हणजे हुकूमशहा

मेगन मार्कल म्हणजे हुकूमशहा

by Team Gajawaja
0 comment
Meghan Markle
Share

ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल हे जोडपं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ब्रिटीश राजगादीचे वारस असलेल्या या शाही जोडप्यांनी आपला शाही वारसा सोडला आहे. प्रिन्स हॅरीनं मेघन बरोबर लग्न केलं, तेव्हापासून त्याच्यावर टिका होत होती. अमेरिकन असलेली मेघन ही घटस्फोटीत आहे. पण राजकुमार हॅरी याच्या हट्टामुळे राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांचे लग्न थाटात केले. यानंतर या दोघांना राजघराण्यात वेगळी वागणूक मिळत असल्याची माहिती पुढे आली. काही दिवसांनी या दोघांनीही राजघराणं आपल्याला योग्य मान देत नसल्याची ओरड करत शाही जबाबदा-यांमधून माघार घेत अमेरिकेत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक या निर्णयामुळे ब्रिटीश राजघराण्यावर टिकाही करण्यात आली. मेघनची आई कृष्णवर्णीय असल्यामुळे तिला त्रास झाला, असेही सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मेघनचा स्वभावच या सर्वांसाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. नुकत्याच मेघन आणि हॅरीच्या बरोबर काम करणा-यांनी या दोघांचा स्वभावाची माहिती दिली. (Meghan Markle)

विशेषतः मेघन मार्कल ही हुकूमशाही वृत्तीची असल्याची टिका केली. मेघन ही अत्यंत तापट स्वभावाची आहे. ती सतत ओरडत असते, शिवाय तिच्या या स्वभावाचा त्रास हॅरीलाही होत असल्याचे तिच्यासोबत काम करणा-यांनी सांगितले आहे. मेघनच्या याच तापट स्वभावामुळे तिला काम करण्यासाठी कोणीही मदतनीस मिळत नसल्याचीही माहिती पुढे आली आहे. मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी हे सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आपल्या दोन मुलांसह रहात आहेत. प्रिन्स हॅरीनं लिहिलेल्या पुस्तकामुळे तो वादात सापडला होता. ब्रिटीश राजघराण्यावर त्यानं थेट टिका केली. तसेच एका मुलाखतीमध्येही या जोडप्यानं राजघराण्यावर आरोप लावले होते. या सर्वांची सुरुवात झाली ती मेघनला ब्रिटनमधील राजवाड्यात मिळालेल्या वागणुकीमुळे. त्यावेळी मेघननं आपल्या सूचना राजवाड्यातील कर्मचारी ऐकत नाहीत, ते आपल्याला उलट बोलतात, अशी तक्रार केली होती. तेव्हा मेघनच्या चाहत्यांनी वर्णवाद म्हणून राजघराण्यावर टिका केली होती. मात्र आता त्या घटनेमागील सत्या बाहेर येत आहे. (Meghan Markle)

नुकताच प्रिन्स हॅरीचा 40 वा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाला हॅरी आणि मेघन सोबत काम करत असलेल्या एका महिलेची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि या जोडप्याची, विशेषतः मेघनच्या स्वभावाची एक बाजु जगासमोर खुली झाली. मेघनसोबत काम करणा-या या महिलेनं मेघनचे वर्णन, उंच टाचांच्या शूजमध्ये फिरणारी हुकूमशहा असं टोकाचं केलं आहे. तिच्यामते मेघनसोबत काम करणारी प्रत्येक व्यक्ती तिला घाबरते. ती लोकांकडे तुच्छतेने पाहते. ती कोणाचा सल्लाही घेत नाही. आपल्या कर्मचा-याचा मेघन पदोपदी अपमान करते, असा आरोपही संबंधित महिलेने केला आहे. (Meghan Markle)

मेघन मार्कलने आपल्या पतीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येच सोबत काम करणा-या कर्मचा-यांवर मोठी आरडाओरड केली. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मेघननं तिच्या कर्मचाऱ्यांना घाबरवल्याची चर्चा सुरु आहे. मेघन प्रत्येकालाच आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करते. मेघन आपले निर्णय कुठल्याही क्षणी बदलते. यामुळे होणारे घोळ लगेच आवरले नाहीत तर ती सोबतच्या कर्मचा-यांवर सगळा राग काढते. अर्थात मेघनच्या रागाचा फटका प्रिन्स हॅरीलाही अनेक वेळा बसला असल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. प्रिन्स हॅरी हा चांगला माणूस आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे. मात्र मेघन मार्कल अनेकवेळा त्याच्यावरही ओरडत असते. याचा परिणाम म्हणून हॅरीला रडतांना पाहिल्याचा दावाही या कर्मचा-यांनी केला आहे. मेघन अतिशय क्रूर आहे. ती घरभर हुकूमशहासारखी फिरत असते. तिच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर ती तिच्या समोरच्याला रडू येईपर्यंत बोलते असेही या कर्मचा-याचे म्हणणे आहे. (Meghan Markle)

याच स्वभावामुळे गेल्या काही वर्षांपासून या जोडप्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मेघनचे सहाय्यक आणि खाजगी सचिव यांनी 2021 मध्ये राजीनामा दिला. इतकेच नव्हे तर गेल्या महिन्यात तिच्या चीफ ऑफ स्टाफनेही अवघ्या तीन महिन्यांनी नोकरी सोडली. सल्लागार जोश केटलर यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिला. यापूर्वी 2018 मध्ये बकिंगहॅम पॅलेसमध्ये रहात असतांतनाही मेघनवर तिच्या तापट स्वभवाबद्दल टिका करण्यात आली होती. तिने दोन शाही सहाय्यकांसोबत केलेल्या वागणुकीबद्दल चौकशी झाली आणि त्यात मेघन दोषी निघाली होती. मात्र मेघननं तेव्हा हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला बदनाम करण्यासाठीचे हे कारस्थान असल्याचे सांगितले. (Meghan Markle)

======

हे देखील वाचा : इराकच्या हुकूमशाही सरकारचे विधेयक

======

आता मेघन मार्कल स्वतःचा ब्रॅंड लॉन्च करीत आहे. मात्र तिला सहकार्यांची कमतरता जाणवत आहे. तिच्या सीईओनंही ‘सर्वात भयंकर सत्य हे आहे की, हॅरी आणि मेगनसोबत काम करणे खूप कठीण आहे. हे दोघंही लोकांकडून खूप कामाची अपेक्षा करतात आणि ही मागणी पूर्ण करणे कठिण आहे, असे सांगून राजीनामा दिला आहे. त्यामुळेच मेघनच्या ब्रॅंडचे काम मागे पडले आहे. हे सर्व प्रकरण पुढे आल्यावर पुन्हा मेघन आणि हॅरी यांच्यावर ब्रिटनच्या सोशल मिडियामधून टिका करण्यात येत आहे. (Meghan Markle)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.