Home » मेघालयातील ‘या’ ठिकाणांचे नाव जरी घेतले तरी लोक घाबरतात… पण का?

मेघालयातील ‘या’ ठिकाणांचे नाव जरी घेतले तरी लोक घाबरतात… पण का?

by Team Gajawaja
0 comment
Meghalaya Haunted Places
Share

नॉर्थ-ईस्ट मेघालय आपल्या लोक-संस्कृती आणि परंपरेमुळे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे एक असे राज्य आहे जेथे प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. या राज्याचे सौंदर्य आणि मनमोहक ठिकाणांचे फोटो ही ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. तर मेघालयातील काही राज्ये फिरण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे येथील काही अशी ही ठिकाणं आहेत जी लोकांना माहिती आहेत पण तेथे जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. तर पाहूयात मेघालयातील हॉंन्टेड ठिकाणं कोणती आहेत. (Meghalaya Haunted Places)

-बालपक्रम नॅशनल पार्क
मेघालयातील बालपक्रम नॅशनल पार्क हे एक पर्यटन स्थळ आहेत. मात्र येथील काही भुताटकी कथा लोकांचा थरकाप उडवतात. असे मानले जाते की, बालपक्रम हे मृत आत्मांचे घर आहे. येथे संध्याकाळ झाल्यानंतर रडण्याचा-गाण्याचा किंवा हसण्याचे आवाज येऊ लागतात. बहुतांश लोक या ठिकाणाला आत्मांची भूमी असे ही म्हणतात.

स्थानिक लोकांचे सुद्धा असे मानणे आहे की, पार्कमध्ये एकदम आतमध्ये काही रहस्यमी ठिकाणं आहेत. त्यामुळे जर पर्यटक या जंगलात फिरण्यासाठी जात असतील तर त्यांना या बद्दल सुचना दिली जाते.

Meghalaya Haunted Places
Meghalaya Haunted Places

-कॅथलिक कब्रस्थान
हे खरं आहे की, भारतातील अन्य राज्यांमध्ये काही कब्रस्थान आहेत आणि तेथील सुद्धा भुताटकी कथा आहेत. मात्र मेघालयातील राजधानीत असलेल्या Laitumkhrah हे कॅथलिक कब्रस्थान नॉर्थ-ईस्ट मधील सर्वाधिक भुताटकी ठिकाणांपैकी एक आहे.

या ठिकाणाबद्दल असे सांगितले जाते की, येथे मृत आत्मा फिरत राहतात. तसेच रात्रीच्या वेळी येथे अचानक दिवे पेटतात. काही विचित्र आवाज ही येऊ लागतात. (Meghalaya Haunted Places)

-नोहककिलाई वॉटरफॉल
भारतातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या धबधब्यांपैकी हा एक आहे. परंतु त्याला हॉन्टेंड ठिकाणांपैकी एक मानले गेले आहे. या ठिकाणाबद्दल असे सांगितले जाते की, येथे एक परिवार राहत होता. त्या परिवारात एक मुलगी होती. एक दिवस ती मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली आणि जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा ती या धबधब्यात मृत अवस्थेत आढळली. त्यामुळे या धबधब्याजवळ कोणीही एकटे जाण्याची हिंमत करत नाहीत.

हे देखील वाचा- जापानच्या सैन्यातील ‘या’ युनिट मध्ये व्यक्तीवर केल्या जायच्या भयंकर चाचण्या

-स्वीट फॉल
शिलाँगमध्ये असलेला हा स्वीट फॉल ९६ किमी उंचीवर आहे. तो सर्वाधिक सुंदर धबधबा आहेच पण त्याला अत्यंत धोकादायक ही म्हटले जाते. पर्यटकांना येथे जाण्यासाठी बहुतांश वेळा बंदी घातली जाते. कारण येथे जाण्यासाठी पक्का मार्ग नाही. धबधब्याच्या आजूबाजूचा नारळाची उंचच उंच झाडं आहेत. येथील स्थानिक लोक या ठिकाणाला भुताटकी ठिकाण असे मानतात. कारण जो कोणीही येथे असमान नंबरमध्ये जातात ते येताना समान क्रमांकामध्ये असतात. ऐवढेच नव्हे तर बहुतांश जणांनी येथे आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.