लहानपणी आपल्याला मेडुसा हिची कथा कोणी ना कोणीतरी सांगितली असेल. पण आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटायचे की, अखेर असे कसे होऊ शकते की, केवळ पाहिल्यानंतर एखादा दगडात रुपांतरित होईल. तिच्याबद्दल असे म्हटले जायचे की, तिने एखाद्याला पाहिल्यानंतर तो दगडाचा व्हायचा. काही हॉलिवूड मधील सिनेमांमध्ये सुद्धा तिच्या नावाची भुमिका दाखवली गेली आहे.तर या झऱ्याचे नाव ग्रीक माइथॉलजी मधील एक महिला कॅरेक्टर मेडुसा हिच्यावरुनच ठेवण्यात आले आहे. जी अत्यंत भयंकर दिसते. परंतु जगात अशा काही गोष्टी आहेत त्यावर विश्वास बसणे फार कठीण होऊन जाते.अशातच तुम्ही कधी असे ऐकले आहे का, पाण्यात गेल्यानंतर एखादं जनावर दगडं होऊ शकतो? असे सर्वकाही केवळ सिनेमांमध्ये घडू शकते. पण जगात असा एक झरा आहे तेथे असे घडते. या झऱ्याला ‘मेडुसा लेक’ (Medusa lake) किंवा ‘जॉम्बी लेक’ असे सुद्धा म्हटले जाते. या झऱ्यासंदर्भात काही कथा सुद्धा आहेत.
कुठे आहे हा झरा
हा रहस्यमयी झरा अफ्रिका महाबेटाच्या तंजानिया देशात आहे. या झऱ्याला लोक नॅट्रॉन झरा असे ही म्हणतात. जो अरुषा क्षेत्रातील न्गोरोन्गोरो जिल्ह्यात स्थित आहे. या झऱ्याच्या जवळ गेल्यानंतर तेथे लाल रंगाचा एक विशाल झरा दिसतो. तेथे काही पशुपक्षांच्या मुर्त्या दिसतात. हे दृश्य खुप भीतीदायक वाटते. हेच कारण आहे की, स्थानिक लोक या परिसरात जाण्यास घाबरतात. ही लोक या झऱ्याला शापित झरा असे मानतात.
पशुपक्ष्या मुर्त्या कशा होतात?
अशातच प्रश्न उभा राहतो की, अखेर असे का होते? वैज्ञानिकांनी असे सांगितले की, हे सर्वकाही या झऱ्यातील पाण्याच्या कारणास्तव आहे. खरंतर या झऱ्यातील पाणीचे एल्कलाइन हे सामान्य झऱ्याच्या पाण्यापेक्षा अधिक आहे. याच कारणास्तव या पाण्याचा पीएच स्तर १०.५ पर्यंत मापले गेले आहे. (Medusa lake)
हे देखील वाचा- १० हजार खोल्या असलेले हॉटेल ८० वर्षांपासून बंद, पण का?
या झऱ्यातील पाण्यात वाढल्या जाणाऱ्या एल्कलाइनच्या मागील जे कारण सांगितले जाते की, दोन्याई लेंगाई ज्वालामुखी. हा ज्वालामुखी या झऱ्याजवळ आहे. यामधून निघणारा लावा या झऱ्यात पडतो आणि त्यामुळे पाण्यात एक्ललाइड तयार होते. हा जगतील एकमेव ज्वालामुखी आहे ज्याच्या लावामधून नॅट्रोकार्बोनाइट्स निघतो. या झऱ्याच्या पाण्यात असे काही केमिकल आढळून येतात जे येथे मृत झालेल्या पशुपक्ष्यांच्या शवांच्या सडण्याची प्रक्रिया धिमी करते, हेच कारण आहे त्यांचे शव अगदी मुर्त्यांसारखे दिसतात.