Home » खेळाडूंना दिली जाणारी पदकं ही खरंच सोन्या-चांदीची असतात? जाणून घ्या अधिक

खेळाडूंना दिली जाणारी पदकं ही खरंच सोन्या-चांदीची असतात? जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
Medals design
Share

कॉमनवेल्थ गेम्सची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारताने या खेळामध्ये गोल्ड, सिल्वर आणि ब्रांन्ज अशा तिन्ही प्रकारची पदकं पटाकवली आहेत. भारताचे या खेळामध्ये सहभागी झालेले खेळाडू हे फार मेहनत करुन भारताची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत खेळाडूंच्या संघर्षाच्या कथा सुद्धा या दरम्यान समोर येत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का या खेळाडूंना दिले जाणारे गोल्ड, सिल्वर पदकं हे कशा प्रकारे तयार केले जाते? काही लोकांच्या मनात असा ही प्रश्न उपस्थितीत राहतो की, खरंच खेळाडूंना दिली जाणारी ही पदकं सोन्या-चांदीची असतात का? जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.(Medals design)

खेळाडूंना दिली जाणारी पदकं कोण डिझान करतात?
कॉमनवेल्थ गेम्समध्ये दिली जाणारी पदकं ही बर्मिंगघम स्कूल ऑफ ज्वेलरीच्या तीन विद्यार्थ्यांनी डिझाइन केली आहेत. त्यांची नावे Amber Alys, Francesca Wilcox आणि Catarina Rodrigues Caeiro आहे. यासाठी शाळेतून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि एका टीमच्या आधारावर विजय मिळवला. या विद्यार्थ्यांनी पदकांव्यतिरिक्त बॉक्स आणि रिबिन सुद्धा डिझाइन केले आहेत.

हे देखील वाचा- वयाच्या ९४ व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत कशी मिळवली पदकं? वाचा आजींबद्दल अधिक

Medals design
Medals design

कसे आहे कॉमनवेल्थ पदकाचे डिझाइन?
ही पदकं तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचे डिझाइन ठरवताना एका एथलीटच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास आणि त्याचे लक्ष्य लक्षात ठेवत त्यावर काम केले. या व्यतिरिक्त या पदकांवर बर्मिंघममध्ये जेथे खेळाचे आयोजन केले आहे तेथील नकाशा सुद्धा अएम्बॉस केला आहे. त्यांना अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की, अंध खेळाडू सुद्धा त्याचे डिझाइन आपल्या हातांनी ओळखू शकतो. मेडलची रिबिन सुद्धा अॅडजेस्टेबल असल्याने ती आपल्या कंम्फर्टनुसार घालता येते. पदकं ठेवण्यासाठी विजेत्यांना एक बॉक्स सुद्धा दिला जातो.(Medals design)

किती मेडल्स डिझाइन करण्यात आलेत?
रिपोर्ट्सनुसार, विजेत्या खेळाडूला मिळणारे गोल्डचे पदकं हे पूर्णपणे सोन्याचे नसते. यावर फक्त सोन्याचे पाणी लावले जाते. पण सिल्वर आणि ब्रॉंन्ज ही पदकं चांदी आणि तांब्यापासून तयार करण्यात आलेली असतात. सन १९१२ मध्ये स्टॉकहोम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलम्पिंक गेम्समध्ये गोल्ड पदकं ही पूर्णपणे सोन्याची होती. पण आताची पदकं त्या प्रकारची बनवण्यात आलेली नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.