Home » Maya Emperor : माया सम्राटाची कबर आणि दडलेला खजिना !

Maya Emperor : माया सम्राटाची कबर आणि दडलेला खजिना !

by Team Gajawaja
0 comment
Maya Emperor | Latest Marathi News
Share

दक्षिण अमेरिकन देश बेलीझच्या घनदाट जंगलात हजार वर्षापूर्वीचे थडगे सापडले आहे. साधारण 1600 पूर्वीच्या हे थडगे सामान्य नाही. आकारानं चांगलेच मोठे असलेले हे थडगे राजा किंवा त्याच्या खास सरदाराचे आहे, याची खात्री संशोधकांना झाली. मात्र या थडग्याचे आणि त्याच्या परिसरातील भागाचे उत्खनन केल्यावर संशोधकांना जबर धक्का बसला आहे. कारण हे सर्व थडगे सोन्याची नाणी, मुकुट, माणिकाचे दागिने आणि अन्य अमुल्य अशा संपत्तीनं भरलेलं होतं. बेलीझमधील काराकोल येथे सापडलेले हे थडगे माया सम्राटाचे असल्याचे स्पष्ट झाले. 1600 वर्षापूर्वी या संपूर्ण भागात माया साम्राज्याचे जाळे होते. त्यामुळे या थडग्यात सापडलेल्या मुखवटे, रंगवलेली भांडी आणि धार्मिक अवशेषांमधून माया संस्कृतीची रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. बेलीझच्या काराकोल शहरात सापडलेले हे थडगे पूर्णपणे मौल्यवान वस्तूंनी भरलेले असल्यामुळे, अशाच प्रकारची थडगी या भागात अन्य आहेत, का असा शोध सुरु झाला आहे. (Maya Emperor)

दक्षिण अमेरिकन देश बेलीझमध्ये माया संस्कृतीच्या खुणा पुन्हा एकदा मिळाल्या आहेत. माया संस्कृती सुमारे 1500 ईसापूर्व सध्याच्या बेलीझच्या परिसरात पसरली आणि सुमारे 900 ईसापूर्व पर्यंत भरभराटीला आली. माया संस्कृतीमध्ये अनेक संपन्न अशा वास्तु उभारल्या गेल्या. त्यात पिरॅमिड आणि अनेक मंदिरांचाही समावेश आहे. चुनखडीचा वापर करत माया संस्कृतीच्या काळात अनेक इमारती उभ्या राहिल्या. शिवाय त्यावरील कोरीव कामही लक्षवेधक होतं. माया संस्कृतीमध्ये चित्रलिपीही विकसित झाली. प्राचीन अमेरिकेतील सर्वात विकसित लेखन प्रणालींपैकी एक म्हणून या चित्रलिपीचा उल्लेख होतो. यासोबतच माया लोक हे गणिक आणि खगोलशास्त्रात पारंगत होते. सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचालींचा मागोवा घेणारी एक जटिल कॅलेंडर प्रणाली त्यांनी विकसित केली. याबाबत अद्यापही संशोधन सुरु आहे. (Latest News)

माया संस्कृतीमध्ये चित्रकला, शिल्पकला, कोरीवकाम, मातीकाम या सर्वांचाच विकास झाला. माया लोकांनीच मका, बीन्सची लागवड अमेरिकेमध्ये केल्याची माहिती आहे. माया नागरिक हे व्यापारी म्हणूनही ओळखले जात असत. मात्र ही संपन्न अशी माया संस्कृती जशी विकसित झाली, तशी ती अचानक काळाच्या ओघात गाडली गेली. माया संस्कृतीचा लोप कसा झाला, याबाबत अद्यापही अनेक शोध सुरु आहेत. तसेच शोध दक्षिण अमेरिकन देश बेलीझमध्ये होत आहे. या शोधाला मोठे यश आले असून माया संस्कृतीमधील एका सम्राटाचे थडगेच संशोधकांच्या हाती लागले आहे. या थडग्यामध्ये तत्कालीन दागिने आणि मातीची, धातुची भांडीही सापडली आहेत. शिवाय काही धार्मिक पुस्तकेही सापडली आहेत. यामुळे माया संस्कृतीबाबत अनेक खुलासे होणार आहेत. बेलीझमधील घनदाट जंगलात या संदर्भात गेले अनेक महिने पुरातत्वशास्त्रज्ञ शोध घेत होते. या शास्त्रज्ञांना प्राचीन माया शहर काराकोलच्या पहिल्या शासकाचे भव्य थडगे सापडले आहे. (Maya Emperor)

ही माया संस्कृतीच्या संशोधनातील सर्वात अमुल्य गोष्ट ठरली आहे. कारण याच सम्राटानं 1600 वर्षांपूर्वी काराकोल या प्राचीन शहराचा रचला घातला होता. ते काब चाक नावाच्या या सम्राटानं माया संस्कृतीचा प्रचारही जगभर केला होता. माया संस्कृतीमध्ये ते काब चाक या नावाचा ‘झाडाच्या फांद्या असलेला पावसाचा देव’ असा होतो. ज्या भागात हे थडगे सापडले तो भाग घनादाट झाडांनी व्यापलेला आहे. हजारो वर्षापूवी तर या भागात सूर्याची किरणेही पडत नव्हती, एवढी घनदाट झाडी होती. त्या भागात या सम्राटानं माया संस्कृतीची शहरे उभारली, मंदिरे बांधली. त्यामुळेच त्याला झाडांच्या फांद्या असलेला पावसाचा देव, अशी उपमा देण्यात आली होती. आता या सम्राटाबद्दल अधिक माहिती शोधण्यासाठी ह्यूस्टन विद्यापीठाची मोठी टीम काम करीत आहे. ह्यूस्टन विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ डायन चेस आणि आर्लीन चेस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 वर्षापासून या भागात माया संस्कृतीबात उत्खनन सुरु आहे. (Latest News)

=============

हे ही वाचा : Dubai : जेव्हा अख्खं दुबई भारतातून operate व्हायचं!

==========

यापूर्वी या भागात माया संस्कृतीमधील अनेक इमारती सापडल्या आहेत. तसेच दगडाचे मणी, भांडी, दागिनेही सापडले आहेत. पण आता पहिल्या माया सम्राटाचेच थडगे सापडल्यामुळे या संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. माया सम्राट ते काब चाक हे इ.स. 331 मध्ये काराकोलच्या सिंहासनावर बसले. त्यांनी व्यापार आणि शेतीमध्येही मोठे काम केले. या राजाचा मृत्यू 350 मध्ये झाला. आता त्याच्या थडग्यामध्ये ज्या वस्तू सापडल्या आहेत, त्यावरुन त्याचे जीवन हे अतिशय शाही होते, हे स्पष्ट होत आहे. माया संस्कृतीमध्ये काराकोल शहर हे मुख्य केंद्र मानले जात होते. या शहराची 100000 एवढी लोकसंख्या होती. या शहरात मोठे रस्ते आणि भव्य इमारती होत्या. मात्र इसवी सन 900 नंतर हे शहर आणि माया संस्कृती ही एका रहस्यासारखी गायब झाली. याचाच शोध आता बेलीझच्या कायो जिल्ह्यातील पर्वतीय जंगलात घेण्यात येत आहे. (Maya Emperor)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.