हवाई बेटावर तब्बल ४० वर्षानंतर जगातील सर्वाधिक मोठ्या ज्वालामुखी मौना लोआचा (Mauna Loa Erupts) उद्रेक सुरु झाला आहे. चार दशकांपर्यंत थंड पडलेल्या या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक होण्यास सुरुवात झाली. उद्रेकानंतर संपूर्ण आकाश हे लालबुंद झाले आणि ज्वालामुखीतून निघणारा लावा आजूबाजूला जमा होण्यास सुरुवात झाली. अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्वेनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने संपूर्ण परिसरात आपत्कालीन क्रू ला अलर्ट करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या उद्रेकानंतर निघालेला लावा हा दूरवर गेलेला नाही.
जिओलॉजिकल सर्वेने लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात मौना लोआच्या उद्रेकाचा अद्भूत नजारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, ज्वालामुखीच्या तोंडातून कशा पद्धतीने लांबलचक लावा बाहेर पडत आहेत आणि तो कशा पद्धतीने आजूबाजूला पसरला गेला. याच्या उद्रेकानंतर निघालेला लावा आणि दुसरा लावा हा केवळ मर्यादित ठिकाणापूर्ताच राहिला. यामधून निघालेला पदार्थ अत्यंत दूरवरील परिसरातून सुद्धा पाहिला गेला आहे. यामधून अद्याप हानिकारक गॅस बाहेर आलेला नाही. पण तेथील नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे की, ज्वालामुखीमधून निघत असलेल्या लावामुळे त्याच्या मार्गापासून दूरच रहावे.
हवाई बेटावर एकूण ६ अॅक्टिव्ह ज्वालामुखी
हवाई आयलँन्डवर ६ अॅक्टिव्ह ज्वालामुखी आहेत. ज्यामध्ये मौना लोआ हा जगातील सर्वाधिक मोठा ज्वालामुखी असल्याचे मानले जाते. जो गेल्या चार दशकांपासून शांत होता. मात्र याच्या आजूबाजूला भुंकपाचे झटके आल्याने असा अनुमान लावला जात आहे की, त्याचा कधी ही उद्रेक होऊ शकतो.
तर मौना लोआ हा १३,६७९ फूट उंचीच्या डोंगरावर आहे. येथे ज्वालामुखींची एक रांगच लागली आहे. मौना लोआचा अखेर १९८४ मध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा लावा वाहून ८.०५ मीटर दूरवर असलेल्या हिलो शहरापर्यंत पोहचला होता. तर हवाई आपत्कालीन मॅनेजमेंट अथॉरिटीने असे म्हटले की, त्यांनी दोन शेल्टर सुरु केले आहेत जर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास ज्वालामुखीच्या येथे राहणाऱ्या लोकांना तेथे सुरक्षित रुपात पोहचवावे.(Mauna Loa Erupts)
हे देखील वाचा- आपल्या शरिरात सुद्धा असते का घड्याळ? जे आपल्याला वेळ सांगत राहते
मौना लोआच्या इतिहासात एक आश्चर्य म्हणून राहिला आहे. याचे अर्ध्याहून अधिक उद्रेक हे वरतीच संपतात. त्याच्या खालच्या बाजूला कोणताही त्रास होत नाही. तर या ज्वालामुखीचा उद्रेक हा आंतराळातून सुद्धा पाहिला गेला. नॅशनल ओशियानोग्राफिक अॅन्ड एटमॉस्फियरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या सॅटेलाइटने याचा उद्रेकाचे फोटो टिपले आहेत. GOES West सॅटेलाईट सातत्याने त्याच्यावर नजर ठेवून आहे. जेणेकरुन एखादी समस्या उद्भवल्यास त्याची बातमी प्रथम नागरिकांना दिली जाईल.