Home » ‘या’ समाजात लग्नानंतर पती जातो सासरी, तर मुलांना मिळते आईचे आडनाव

‘या’ समाजात लग्नानंतर पती जातो सासरी, तर मुलांना मिळते आईचे आडनाव

0 comment
Share

भारतात अनेक धर्म, जाती आणि समाजाचे लोक राहतात, ज्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. पण सर्व धर्माच्या लोकांमध्ये एक समानता दिसून येते आणि ती म्हणजे वधूची विदाई. भारत हा सुरुवातीपासूनच पुरुषप्रधान देश असून, लग्नानंतर नववधूंना निरोप देण्याची प्रथा येथे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात अशी एक जमात आहे, ज्या समाजात महिलांचे वर्चस्व आहे. इथे लग्न झाल्यानंतर वधू वराच्या घरी जात नाही, तर वर वधूच्या घरी थांबतो. (Khasi Society)

मेघालयातील खासी जमातीत ही प्रथा सुरू आहे. या जमातीत कुटुंबाचा भार पुरुषांऐवजी महिलांच्या खांद्यावर असतो. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. हे भारतातील इतर समाजापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या समाजात घरातील महिलाच निर्णय घेतात. बाजारात आणि दुकानात फक्त महिलाच काम करतात. मुलांच्या नावापुढे देखील आईचे आडनाव लावले जाते. (Khasi Society)

हे देखील वाचा: ‘या’ मंदिरात प्रसादात पेढे नव्हे, तर मिळतात ब्राउनी, बर्गर आणि सँडविच

आईनंतर कुटुंबाची मालमत्ता येथे मुलींच्या नावावर केली जाते. कुटुंबातील सर्वात लहान मुलीची जबाबदारी सर्वात जास्त असते. तिला तिचे आई-वडील, अविवाहित भावंडे आणि मालमत्तेचीही काळजी घ्यावी लागते. तीच घराच्या मालमत्तेची मालकीण असते. विशेष म्हणजे, येथे मुलगी झाल्याचा आनंद साजरा केला जातो. मुलगा आणि मुलगी यांना लग्नासाठी जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. (Khasi Society)

या समाजाची खास गोष्ट म्हणजे या समाजात कोणत्याही प्रकारचा हुंडा देण्याची व्यवस्था नाही. या समाजातील लोक हुंडा पद्धतीच्या विरोधात आहेत. हे भारतातील इतर समाजापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून इथल्या पुरुषांनीही येथील चालीरीती बदलण्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ते म्हणतात की, त्यांना समानता हवी आहे. (Khasi Society)

परंतु, या जमातीत महिला प्रधान समाज असूनही राजकारणात महिलांची उपस्थिती नगण्य आहे. खासी समाजाच्या पारंपारिक सभा, ज्याला दरबार म्हणतात, त्यात महिला उपस्थित नसतात. यामध्ये केवळ पुरुष सदस्य आहेत, जे समाजाशी संबंधित राजकीय विषयांवर चर्चा करतात आणि आवश्यक निर्णय घेतात. मेघालय व्यतिरिक्त आसाम, मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्येही खासी समाजाचे लोक राहतात. तर पूर्वी ही जात म्यानमारमध्ये राहात होती. शेती करून हा समाज आपला उदरनिर्वाह करतो. (Khasi Society)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.