भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी कायम चर्चेत असतात आणि गाजतात. मात्र यासोबतच भारतातील महत्वाच्या आणि मोठ्या मंदिरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांमध्ये असलेला खजिना. हो…भारतातील मंदिरांमध्ये असलेला खजिना नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. देशातील पद्नाभ स्वामी मंदिर तर याच खजिनामुळे जगभर गाजले. या मंदिरात सापडलेला खजिना डोळे दिपवणारा होता. अनेक बेशकिमती रत्न हिरे, सोनं या खजिन्यामध्ये सापडले होते. हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरानंतर आता अजून एका मंदिराचा खजिना उघडला गेला आहे. (Marathi)
अनेक रहस्य आपल्यामध्ये दडवलेला आणि जवळपास ५४ वर्ष बंद असलेला मथुरेत असलेल्या श्री बांके बिहारी मंदिरातील हा खजिना नुकताच उघडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीच्या आदेशानुसार हा खजिना आता खोलण्यात आला आहे. दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, बांके बिहारी मंदिराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा खजिना उघडण्यात आला. हा खजिना म्हणजे बांके बिहारी मंदिराचा एक मोठा आणि समृद्ध वारसा असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील खजिना ५४ वर्षांपासून बंद करून ठेवला होता. (Shrikrushn Temple Mathura)
१९७१ साली न्यायालयाने एक आदेश दिला होता. या आदेशानुसार हा खजिना सील करण्यात आला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीचीच्या आदेशानुसार हाच खजिना आता उघडला जाणार आहे. हा खजिना खोलताना दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, मंदिरातील पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा खजिना उघडला गेला आहे. खजिना उघडण्याच्या पूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले गेले आहे. (Todays Marathi Headline)

५४ वर्षांपासून सीलबंद असलेला मथुरा येथील बांके बिहारी मंदिराचा खजिना यंदाच्या दिवाळीत अर्थात धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अतिशय कडेकोट सुरक्षेत उघडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या १४ सदस्यांच्या उच्च-शक्ती समितीने मंदिराच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्याच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या खजिन्यात दुर्मिळ रत्ने, मोर-आकाराचा पाचू हार, चांदीचा शेषनाग, नवरत्नांनी जडलेला सोन्याचा कलश, भरतपूर, करौली आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्यांकडून आलेल्या भेटी, जुनी जमीनपत्रे, सीलबंद पत्रे आणि १९ व्या शतकातील मंदिराला मिळालेल्या अनेक भेटी असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)
१८६४ मध्ये बांधलेला हा खजिना असलेला कक्ष मंदिराच्या गर्भगृहा शेजारीच आहे. ब्रिटिश राजवटीत १९२६ आणि १९३६ मध्ये दोन मोठ्या चोऱ्यांनंतर याचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला होता. मात्र १९७१ मध्ये या मंदिरात असलेले दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी हे कक्ष शेवटचे उघडण्यात आले होते. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या “खजिन्यात मौल्यवान वस्तू काहीही सापडल्या नाहीत. फक्त काही पितळी भांडी आणि लाकडी वस्तू मिळाल्या आहेत.” (Top Trending News)
========
Religious : देवाजवळ दररोज तेलाचा की तुपाचा कोणता दिवा लावावा?
========
बांके बिहारी मंदिरात आधी झालेल्या चोरीमध्ये अनेक मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती. त्यामुळे यावेळेस हा खजिना उघडल्यानंतर त्यात अजून काही वेगळे सापडेल याबद्दल साशंकताच होती. आणि झालेही तसेच हा खजिना उघडल्यानांतर त्यात जास्त काहीच सापडले नसल्याचे सांगितले जात आहे. या खजिन्याच्या रूममध्ये चार मोठ्या लोखंडी पेट्या मिळाल्या आहेत. तर एक लाकडी तुटलेली पेटी देखील इथे मिळाली. या मोठ्या पेट्यांमध्ये पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या, कांस्याच्या, पितळेच्या भांडे सापडले आहेत. याशिवाय थोडे चांदी आणि सोन्याचे दागिने देखील मिळाले आहेत. मात्र अजून दोन पेट्या उघडणे बाकी आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
