Home » Janmashtami : मथुरेमध्ये स्थित आहे कुब्जा मंदिर, जिथे दर्शन घेतल्याने दूर होतात त्वचाविकार

Janmashtami : मथुरेमध्ये स्थित आहे कुब्जा मंदिर, जिथे दर्शन घेतल्याने दूर होतात त्वचाविकार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Janmashtami
Share

येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा करणार आहोत. भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगात जन्म घेतला आणि दृष्ट प्रवृत्तीचा नाश करत जगाला सत्याचा मार्ग दाखवला. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बाल्यकाळात आणि तरुणपणात अनेक लीला केल्या. त्यांच्या सर्वच लीला आणि चमत्कार जगभरात प्रसिद्ध आहेत. यातल्याच काही लीला त्यांनी मथुरेत गेल्यावर केल्या होत्या. मथुरेतील त्यांची कुब्जा नावाच्या स्त्रीला बरे करण्याची लीला खूपच गाजली. आपल्याच मामाचा कंसाचा वध करण्याच्या हेतूने जेव्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेत आले तेव्हा ते कुब्जा नावाच्या एका विद्रुप स्त्रीला भेटले तिला पाहिल्यानंतर लगेच कृष्णाने तिला सौंदर्यवती बनवले. (Todays Marathi Headline)

कुब्जाची कथा श्रीमतभगवदगीतेमध्ये सांगितली आहे. कुब्जा ही मथुरेत कंसाच्या राजदरबारात काम करणारी एक दासी होती. तिच्यावर चंदनाचा लेप आणि सुगंधी तेल आणण्याची जबाबदारी होती. कुब्जा दिसायला विद्रुप होती. उंचीला कमी, पाठीत पोक असलेली, काळीसावळी अशी कुब्जा तिच्या दिसण्यामुळे जास्त ओळखली जायची. तिला तिच्या दिसण्यावरून लोकांच्या टोमण्यांचा देखील सामना करावा लागायचा. मात्र कुब्जा सतत देवाचे नामस्मरण करण्यात तिचा वेळ व्यतीत करण्याची. तिला देखील तिच्या दिसण्याचे वाईट वाटायचे, मात्र तिने कधीही देवाकडे याबद्दल तक्रार केली नाही. (Top Marathi Headline)

जेव्हा कृष्ण आणि बलराम पहिल्यांदाच मथुरेला आले, तेव्हा त्याचा मामा असलेल्या कंसाने त्यांना कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रण दिले. त्या दोघांनी याचा स्वीकार केला. तेव्हा कुब्जाने अतिशय प्रेमाने कृष्ण आणि बलराम यांना चंदनाचाच लेप देऊ केला. तिच्या या कृतीने कृष्ण प्रसन्न झाले. अतिशय प्रेमाने आणि आत्मयतीने श्रीकृष्णाने कुब्जाच्या पायाची बोटे आपल्या पायाने दाबली आणि बोटांनी तिची हनुवटी हळूवारपणे वर उचलली. त्याक्षणी तिच्या शरीरातील वाकडेपणा, पोक नाहीसे झाले आणि ती एक सुंदर, रूपवान स्त्री झाली. कृष्णाने तिला तिच्या निस्वार्थ भक्तीवर खुश होऊन तिला बरे केले. अशी ही कुब्जाची एक कथा आहे. याच कुब्जाचे मंदिर आपल्या भारतामध्ये आहे. अनेकांना याबद्दल माहिती नसेल, मात्र या कुब्जा मंदिराबद्दल अनेक मान्यता देखील प्रचलित असल्याचे पाहायला मिळते. (Top Marathi Stories)

Janmashtami

उत्तरप्रदेशमधील मथुरा शहरामध्ये प्राचीन असे मुरली मनोहर मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरात कृष्णासोबतच कंसाची दासी असलेल्या कुब्जाची पूजा केली जाते. जवळपास २५० वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरामध्ये श्रीकृष्ण राधेसोबतच विराजमान आहेत. सोबतच कुब्जाची मूर्ती देखील येथे आपल्याला पाहायला मिळते. कदाचित हे जगातील किंवा देशातील एकमेव मंदिर असावे जिथे श्रीकृष्णासोबतच कुब्जाची देखील पूजा होते आणि मूर्ती देखील पाहायला मिळते. (Marathi Latest News)

या मंदिरात राधा आणि कृष्णाची मूर्ती ही आकर्षक अशा संगमरवराच्या दगडाची असून कुब्जाची मूर्ती पितळीची आहे. कुब्जा ही कंसाची दासी होती, जी त्याच्यासाठी दररोज चंदनाचा लेप बनवायची. जेव्हा कृष्ण आणि बलराम मथुरेत आले तेव्हा त्यांना कुब्जा दिसली आणि त्यांनी तिला सुंदरी म्हणून हाक मारली. त्यांच्या मधुर वाणीतून आपले नाव ऐकून कुब्जा मोहित झाली आणि तिच्या हातात कंसासाठी असलेला चंदनाचा लेप तिने कृष्णाला लावला. यावर प्रसन्न होऊन कृष्णाने श्रपित कुब्जाला तिला क्षणात रूपवान केले आणि तिचे सर्व रोग नाहीसे केले. कुब्जाला देवाने त्यांच्या प्रिय अशा १००८ गोपिकांमध्ये स्थान दिले आहे. (Top Stories)

===================

हे देखील वाचा : Uttar Pradesh : देवराह बाबांच्या अखंड ज्योतीचे रहस्य !

===================

दरम्यान मान्यता आहे की, मथुरा येथील येथील या श्रीकृष्ण मंदिरात आजारी, शारीरिक रोगांनी जखडलेली, त्वचा विकार झालेली व्यक्ती गेली तर तिचे संपूर्ण रोग मुळासकट नाहीसे होतात. या श्रद्धेमुळे या मंदिरात अनेक आजारी, व्याधींनी ग्रस्त लोकं दूरदूर वरून दर्शनासाठी येतात. हे कृष्णमंदिर याच गोष्टीमुळे खूपच प्रसिद्ध आहे. या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या जल्लोषात साजरी होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.