Matar Face Pack : हिरवा मटार हिवाळ्यात खूप प्रमाणात येतो. मटार खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण त्वचेसाठी देखील मटार अत्यंत फायदेशीर मानले जाते. मटारमुळे त्वचा ग्लो येतो. खरंतर हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचा अत्याधिक प्रमाणात कोरडी होण्याची समस्या बहुतांशजणांना होते. अशातच तुम्ही हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी मटारचा फेसपॅक तयार करू शकता.
मटारच्या फेसपॅकमुळे त्वचेवरील ड्रायनेसच्या समस्येपासून दूर रहाल. जाणून घेऊया मटार फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर….
मटार आणि पपई फेसपॅक
सामग्री
-दोन कप मटार
-एक कप पपई
-दोन चमचे गुलाब पाणी
-एक चमचा चंदन पावडर
कृती
-फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रमथ मटार आणि पपई मिक्सरला लावून वाटून घ्या
-आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेत यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चमचा चंदन पावडर मिक्स करा
-अशाप्रकारे तयार होईल मटार फेसपॅक
मटारचा फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी कच्च्या दूधाने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. आता फेस पॅक चेहरा आणि मानेवर व्यवस्थितीत लावा. आता डोळ्यांवर गुलाब पाण्यामध्ये भिजवलेला कॉटन ठेवा. 20 मिनिटांनंतर आता चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावा. या पॅकचा दररोज वापर केल्याने त्वचेवरील ड्रायनेसची समस्या दूर होईल आणि त्वचा ग्लो देखील होईल. (Matar Face Pack)
मटार आणि हळदीचा फेसपॅक
सामग्री
-दोन कप उकडलेला मटार
-एक चमचा हळद
-दोन चमचे मध
-दोन चमचे दही
-एक चमचा कोरफड
-अर्धी वाटी लिंबूचा रस
कृती
-फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम उकडलेला मटार मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा.
-आता ही पेस्ट एका वाटीत काढून घेऊन यामध्ये दोन चमचे मध, हळद आणि कोरफडीचा गर घेऊन सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करा.
-तयार केलेल्या हिरव्या मटारचा फेसपॅक तयार करू शकता.
फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुवा. आता हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावून 20 मिनिटे असाच ठेवा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर व्यवस्थितीत पुसून झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील ड्रायनेसची समस्या दूर होईल.