Home » Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !

Mata Mahishasur Mardine : वाराणसीची माता स्वप्नेश्वरी !

by Team Gajawaja
0 comment
Mata Mahishasur Mardine
Share

उत्तरप्रदेशमधील वाराणसी या शहराचे नाव ऐकले की, समोर येते ते काशी विश्वनाथाचे भव्य मंदिर.  देशभरातूनच लाखो नागरिक काशी विश्वनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी वाराणसी, बनारस आणि काशी नगरीमध्ये दाखल होतात.  मात्र याच वाराणसीमध्ये अन्य काही मंदिरेही पौराणिक वारसा असलेली असून या मंदिरातही मोठे उत्सव साजरे होतात.  त्यापैकीच एक मंदिर म्हणजे, माता महिषासुर मर्दिनेचे प्राचीन मंदिर.  वाराणसी भदैनी येथील लोलार्क कुंडाजवळ असलेले माता महिषासुर मर्दिनेचे मंदिर अहोरात्र भक्तांनी गजबजलेले असते.  महिषासुराचा वध करणा-या या देवीला माता स्वप्नेश्वरी असेही म्हटले जाते.  या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरातील माता महिषासुर मर्दिनीचे रुप दिवसातून तीन वेळा बदलते.  मातेचा हा चमत्कार बघण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.  आता 30 मार्च पासून सुरु होणा-या चैत्र नवरात्रात या माता महिषासुर मर्दिनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  नवरात्रीमध्ये मातेचे मंदिर फुलांनी सजवले जाते.  तसेच पूर्ण नवरात्र माता मंदिरात रात्री जागरणही करण्यात येते.  यावेळी प्रत्यक्ष माता आशीर्वाद देण्यासाठी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Mata Mahishasur Mardine)

वाराणसीमधील माता महिषासुर मर्दिनीच्या मंदिरात चैत्र नवरात्रीसाठी मोठी तयारी सुरु आहे.  या मंदिराला फुलांनी सजवण्यात येत असून मोठ्या संख्यंने येणा-या भाविकांसाठी सुविधा करण्यात येत आहेत. माता महिषासुर मर्दिनेचे हे मंदिर अती प्राचीन म्हणून ओळखले जाते. काशी नगरीच्या भद्रा वनात म्हणजेच आताच्या भदैनी भागात असलेल्या माता महिषासुर मर्दिनी मंदिराचा उल्लेख पौराणिक ग्रंथातही आहे.  महिषासुराचा नाश करणाऱ्या देवीची वाराणसीमध्ये ‘स्वप्नेश्वरी’ या नावाने पूजा केली जाते. आता याच मंदिरात चैत्र नवरात्रीमध्ये मोठा सोहळा साजरा होतो.  30 तारखेपासून मंदिरात महिलांचे भजन आणि कीर्तन होते.  तसेच दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येते.  नऊ दिवस येथे मोठा भंडारा होतो यासाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनातर्फे तयारी सुरु झाली आहे. (Social News)

वाराणसीच्या प्रसिद्ध लोलार्क कुंडाजवळ असेलेल्या माता महिषासुर मर्दिनी मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. देवीने महिषासुराला मारण्यासाठी तिची तलवार फेकली तेव्हा ती तलवार ज्या घाटाजवळ पडली,  त्या घाटाला अस्सी घाट अशी ओळख मिळाली. महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देव-देवतांनी मातेला आवाहन केले.  त्यावेळी मातेनं आई महिषासुर मर्दिनीने अवतार घेतला.  महिषासुर मर्दिनीने शुंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांचा वध केला. दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायात महिषासुराच्या वधाचा आणि माता महिषासुर मर्दिनाचा उल्लेख आहे.  या मंदिरात येणा-या भाविकांची मनोकामना देवी पूर्ण करते.  काही भक्त श्रद्धेनं मातेच्या सायंकाळी होणा-या आरतीमध्ये सलग 41 दिवस सहभागी होतात.  अशा भक्तांना माता संपन्नतेचा आशीर्वाद देते अशी धारणा आहे. (Mata Mahishasur Mardine)

या मंदिराचे मुख्य वैशिष्ट म्हणजे, माता महिषासुर मर्दिनी दिवसातून आपले रुप तीनवेळा बदलते.  सकाळी बघितल्यावर माता तिच्या सौम्य आणि बालिश स्वरूपात दिसते. दुपारपर्यंत माता तिच्या तरुण स्वरूपात येते आणि संध्याकाळनंतर ती तिच्या उग्र स्वरूपात येते. मातेची ही तिन्ही रुपे बघण्यासाठी भाविक मंदिरात तीनवेळा येतात, आणि हा चमत्कार बघून मातेच्या चरणी लीन होतात.  माता महिषासुर मर्दिनीची मुर्दी ही काळ्या पाषाणातली असून ती स्वयंभू असल्याची माहिती आहे.  चैत्र नवरात्रीनिमित्त देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या आभुषणांनी सजवण्यात येते. (Social News)

==============

हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

महिषासुर मातेची काही भक्त पूर्ण दिवसभर सेवा करतात, तसेच रात्रीही मातेच्या मंदिराच्या आवारातच झोपतात.  या भक्तांच्या स्वप्नात माता स्वतः येऊन आशीर्वाद देते, असेही सांगितले जाते.  त्यामुळेच या मंदिराला ‘स्वप्नेश्वरी म्हटले जाते.  या मंदिर परिसरात भैरव बाबा आणि भगवान शंकर यांच्यासोबत हनुमान आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. ही मंदिरेही प्राचिन असून माता महिषासुर मर्दिनीचे दर्शन घेतल्यावर मग या परिसरातील भगवान शंकराच्या मंदिरात भाविक जातात. आता चैत्र नवरात्री निमित्त या संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.  तसेच येथे आत्तापासून भाविकंची संख्या वाढल्यानं भंडाराही चालू करण्यात आला आहे. (Mata Mahishasur Mardine)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.