उत्तरप्रदेशच्या कानपूरमधील घाटमपूर येथे असलेले माँ कुष्मांडा देवीचे मंदिर नवरात्रौत्सवात भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख स्थान आहे. याला कारण आहे, ते माता कुष्मांडा देवीचे दर्शन घेतल्यावर होणारा चमत्कार. माता कुष्मांडा देवीचे दर्शन घेतल्यावर डोळ्यांचे आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देशभारातून मोठ्या संख्येनं भाविक या मंदिरात नवरात्रौत्सवात मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात. मुख्य म्हणजे, संपूर्ण देशात माता कुष्मांडा देवीचे हे एकमेव शक्तिपीठ आहे. या मंदिरात, देवीची मूर्ती पिंडीच्या रूपात विराजमान आहे. ही पिंडी जमिनीवर पडलेली दिसते आणि असे म्हटले जाते की, कोणीही तिचा आरंभ किंवा शेवट शोधू शकलेले नाही. याबाबत अनेक रहस्यमयी कथा सांगितल्या जातात. यात आणखी एक रहस्य म्हणजे, या पिंडीतून वर्षभर पाणी वाहत असते. हे पाणी डोळ्यांना लावल्याने डोळ्यांचे आजार बरे होतात, असे मानले जाते. या नवरात्रौत्सवातही माता कुष्मांडा देवीच्या दरबारात हजारो भाविक येत असून मातेच्या नावाचा जयजयकार होत आहे. (Uttar Pradesh)

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी, भक्त सुख, समृद्धी, आरोग्य आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी देवीच्या या रूपाची प्रार्थना करतात. माता कुष्मांडा देवीचे शक्तिपीठ उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथे आहे. घाटमपूर येथील या माता कुष्मांडा देवीमंदिरात अहोरात्र मातेच्या नावाचा मंत्र चालू आहे. या मंदिराचा इतिहास अनोखा आहे. असे सांगितले जाते की, फार वर्षापूर्वी या भागात घनदाट जंगल होते. या ठिकाणी एक गुराखी दररोज त्याच्या गायी चरायला घेऊन येत असे. (Social News)
त्याची एक गाय नियमितपणे एका झुडपात जाऊन दूध सांडत असे. गुराख्यानी उत्सुकतेनं या जागी खोदल्यावर त्याला येथे कुष्मांडा देवीची पिंडी सापडली. या पिंडीचा फक्त वरचा भाग गुराख्याला मिळाला. ही पिंडी संपूर्णपणे जमिनीबाहेर काढण्यासाठी त्यानं खोलवर खणले. पण या पिंडीचा शेवट त्याला सापडला नाही. त्यानंतर या पिंडीबाबत सर्वत्र चर्चा होऊ लागली. तेथील राजाच्या कानावर ही गोष्ट गेली. 1380 मध्ये राजा घटमपूर दर्शन यांनी देवीचे मंदिर उभारले. याच राजाच्या नावावरून शहराचे नाव घटमपूर ठेवण्यात आले. 1890 मध्ये चंडीदिन भुर्जी यांनी या प्राचीन मंदिराची पुनर्बांधणी केली. मेंढपाळाच्या नावावरून देवीचे नाव कुष्मांडा ठेवण्यात आले आहे. मराठा शैलीत बांधलेल्या या मंदिरातील मूर्ती दहाव्या शतकातील असल्याची माहिती आहे. 1783 मध्ये, भद्रास गावातील कवी उम्मेदराय खरे यांनी “ऐश अफजा” नावाची एक पर्शियन हस्तलिखित लिहिले. यामध्ये माता कुष्मांडा मंदिराचा उल्लेख आहे. (Uttar Pradesh)

माता कुष्मांडा देवीच्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. मात्र नवरात्रौत्सवात येथे देशभरातून भाविक येतात. या मातेच्या मंदिरात अखंडदीपही आहे. या दीपाचे दर्शन घेणेही पुण्याचे मानले जाते. मातेच्या मंदिरात सायंकाळी दीपदान समारंभ होतो. भाविक मातेच्या परिसरात रोज हे हजारो मातीचे दिवे लावतात. अशाच वातावरणात देवीची आरती होते, आणि देवीचा जयजयकार होतो. नवरातौत्सवाचे नऊ दिवसात असे दीप लावण्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार, देवीच्या प्रांगणात केलेल्या या प्रकाशाच्या उत्सवानं देवी तिच्या भक्तांना धन-धान्य आणि आरोग्याचा आशीर्वाद देते. माता कुष्मांडा देवीची पूजाही अनोख्या पद्धतीनं होते. येथे एक फुलवाटप करणारी महिला देवी कुष्मांडा देवीला सजवते आणि देवीचा नैवेद्यही हिच महिला करते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे. (Social News)
========
हे देखील वाचा :
Hinglaj Mata Temple : या मंदिरात आहे, पाकिस्तानमधून आलेली अखंड ज्योत !
=========
या नवरात्रौत्सवात भाविक देवीला लाल रंगाचे वस्त्रही अर्पण करतात. यातून देवी भाविकांना समृद्धीचा आशीर्वाद देते अशी धारणा आहे. अन्य दिवसात या मंदिर परिसरात मुंडन समारंभ आणि पवित्र धागा समारंभ होतात. कुष्मांडा माता ही विश्वाची निर्मिती करणारी देवी असल्याचे म्हटले जाते. देवीला आदिशक्ती आणि आदि स्वरूपा असेही म्हणतात. हिंदू धर्मग्रंथांमध्येही कुष्मांडा मातेची विहित पद्धतीने पूजा केल्याने अनेक आजार बरे होतात, असे सांगण्यात आले आहे. माता कुष्मांडा मंदिरात देवीची ज्या पिंडीच्या रुपात पूजा होते, त्या पिडींचा अभ्यास आणि शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यांना अपशय आले आहे. पिंडी जमिनीवर पडलेली दिसते आणि असे म्हटले जाते की, कोणीही तिचा आरंभ किंवा शेवट शोधू शकलेले नाही. (Uttar Pradesh)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
