शारदीय नवरात्रौत्सवामध्ये भगवान शंकराची नगरी असलेल्या वाराणसीमधील कालरात्री मंदिरात देश-विदेशातील भाविक दिवसरात्र मातेच्या जागरणात मग्न आहेत. वाराणसीमध्ये अनेक प्रसिद्ध आणि पौराणिक वारसा असलेली मंदिरे आहेत. त्यातच माता कालरात्री मंदिराचा समावेश होतो. या मंदिराबाबत अनेक गुढ कथा सांगण्यात येतात. मातेच्या या मंदिरात अनेक चमत्कार होतात, त्याच्याही कथा भाविक सांगतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात अहोरात्र या मंदिरात भाविकांची गर्दी असते. वाराणसीच्या चौक परिसरातील या माता कालरात्रीचे दर्शन घेतल्यावर अकाल मृत्युचे संकट दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच माता कालरात्रीचे दर्शन घेतल्याने घरातील सर्व वाईट शक्ती दूर होऊन कुटुंबाची प्रगती सुरु होते, अशीही भावना आहे. त्यातच नवरात्रीमध्ये मातेचे दर्शन घेणे हे अधिक शुभ मानले जाते. त्यामुळे या मंदिरात सध्या देशविदेशातील हजारो भक्त रोज मातेचे दर्शन घेत आहेत. (Kalratri Mata)

भगवान शंकराची नगरी असलेल्या वाराणसीच्या चौक परिसरातील माता कालरात्री मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. येथे देवीची पूजा करून अकाली मृत्युच्या भीतीपासून मुक्तता मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येते. वाराणसीमधील बाबा विश्वनाथांच्या मंदिरानंतर माता कालरात्रीचे मंदिर हे सर्वात अद्वितीय मंदिर म्हणून ओळखले जाते. येथेच भगवान शंकरावर नाराज होऊन देवी पार्वतीने शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या केली होती, अशी आख्यायिका आहे. हे मंदिर सिद्ध असून त्यातील दिव्यत्व आणि आध्यात्मिक उर्जा मोठी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिरात आणि मंदिर परिसरातही अनेक भाविक ध्यानधारणेमध्ये बसलेले दिसून येतात. नवरात्र व्यतिरिक्तही या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक येतात, आणि ध्यानधारणा करतात. माता कालरात्रीचे दर्शन घेऊन पूजा केल्यावर सर्व भय, दुःस्वप्न, त्रास आणि भ्रामक प्रभावांपासून मुक्त मिळते, असेही सांगितले जाते. (Social News)
वाराणसी येथील कालिका गली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अरुंद गल्लीत हे मंदिर आहे. या माता कालरात्री मंदिरात गेल्यावर देवीचे रुप हे काहीसे उग्र वाटते. मात्र देवीचे रुप जितके उग्र तितकीच देवी प्रेमळ आणि करुणामय असल्याचे भाविक सांगतात. मंदिरात माता कालरात्रीचे स्वरूप अत्यंत प्रभावी आहे. काळ्यारंगात मातेची प्रतिमा आहे. हा काळा रंग अंधार आणि अज्ञानावर विजयाचे प्रतिक मानण्यात येतो. देवीचे चार हात असून एका हाताने देवी आशीर्वाद देतो आणि दुस-या हातानं देवी भाविकांना आधार देते. देवीच्या उर्वरित दोन्ही हातात शस्त्रे आहेत. (Kalratri Mata)

देवीच्या गळ्यात विद्युत ज्योत असून देवीच्या अंगावर तेल लावले आहे आणि तिच्या गळ्यात माळ आहे. काशीतील या मंदिराच्या अनेक परंपरा प्राचीन काळापासून करण्यात येत आहेत. विशेष प्रसंगी येथे मंत्रोच्चार, हवन आणि विशेष आरती केली जाते. देवीची पूजा केल्यानं मानसिक शक्ती, आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात अनेक चमत्कारिक अनुभव भाविंकाना येतात. त्यामुळे मंदिराबाबत अनेक गुढ कथाही प्रचलीत आहेत. नवरात्रीचा उत्सव या मंदिरात विशेष थाटात साजरा करण्यात येतो. नवरात्रीला देवीच्या मंदिराची फुलांनी सजावट करण्यात येते. तसेच नवरात्र सप्तमीला येथे विशेष पूजा होते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करणे विशेष मानले जाते. नवरात्रीचा सर्वात खास दिवस हा सप्तमी असतो. यावेळी माता कालरात्रीच्या रुपात असते. (Social News)
========
हे देखील वाचा : Harsiddhi Mata : माता हरसिद्धी मंदिराचे रहस्य !
========
हे रूप अत्यंत दयाळू असते. पण यासोबत मातेला विविध शस्त्रेही देण्यात येतात. मातेचे हे अनोखे रुप बघण्यासाठी आणि तिच्या चरणी लीन होण्यासाठी या मंदिरात पहाटेपासून भाविक रांगा लावतात. देवीला लाल रंगाचे जास्वंदीचे फुल विशेष पसंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिरात सप्तमीला जास्वंदीच्या फुलांचा मोठा डोंगरच उभा रहातो. सप्तमीला देवीचे दर्शन घेतल्यानं तांत्रिक मंत्र, जादूटोणा आणि भूतबाधाही होत नाही, असा भाविकांचा विश्वास आहे. सप्तमीला मातेच्या दर्शनासाठी आणि नंतर अष्टमीला मातेच्या दरबारात होणा-या होमसाठी येथे भाविक जमतात. माता कालरात्री ही देवी पार्वतीचा अवतार म्हणून येथे पुजली जाते. (Kalratri Mata)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
