एक ब्रिटिश मर्चंट जहाज समुद्रातून जात होतं, तेव्हा त्यांना लांब एक जहाज दिसलं जे खवळलेल्या समुद्रात सुद्धा शांत उभं होतं. ते जहाज ना पुढे सरकत होतं, ना कोणत्या सिग्नल्संना उत्तर देत होतं. जेव्हा त्या ब्रिटिश मर्चंट जहाजावरचे क्रू मेंबर्स त्या शांत उभ्या असलेल्या जहाजवर केले. तर त्या जहाजावर कोणीच नव्हतं. हे जहाज असंच 10 दिवस समुद्रात भटकत होतं. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे हे जहाजावर सगळं समान व्यवस्थित होतं फक्त जहाजवर लोक नव्हते. ही आहे मेरी सिलेस्ट या जहाजाची गोष्ट ज्याला भुताने झपाटलेलं जहाज सुद्धा म्हणतात. ज्याचं रहस्य गेल्या 150 वर्षांपासून उलगडलेलं नाहीये. या रहस्यमयी जहाजाची गोष्ट जाणून घेऊ. (Mary Celeste)
तर सुरुवातीला मेरी सिलेस्ट हे जहाज अॅमेझॉन नावाने ओळखलं जायचं आणि या जहाजाने सुरुवातीपासूनच अनेक छोटे मोठे अपघात पाहिले होते. पण या जहाजाचा मोठा अपघात कधीच झाला नव्हता. मग तिचे Owner बदलत गेले आणि हे जहाज आलं कॅप्टन बेंजामिन ब्रिग्स यांच्याकडे, तेव्हा त्यांनी तिचं नाव मेरी सिलेस्ट ठेवलं. 7 नोव्हेंबर 1872 ला मेरी सिलेस्टवर 1700 बॅरल्स Alcohol लोड केल गेलं, जे पिण्यासाठी नव्हतं, तर इंडस्ट्रियल वापरासाठी होतं. ही सगळी बॅरल्स न्यूयॉर्कहून इटलीच्या जेनोवा शहरात अटलांटिक महासागरातून नेण्याची जबाबदारी या जहाजावर होती. जहाजत एकूण 10 लोक होते—कॅप्टन बेंजामिन ब्रिग्स, त्यांची बायको, त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि सात क्रू मेंबर्स. (Top Stories)
हा प्रवास सुरू होण्यापूर्वी जहाजात काहीच अडचण नव्हती. म्हणून मग हे जहाज न्यूयॉर्कहून इटलीच्या जेनोवाकडे 7500 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघालं. तेव्हा जीपीएस किंवा अॅडव्हान्स्ड कम्युनिकेशन डिव्हाइसेस नव्हती. मेरी सिलेस्ट न्यूयॉर्कहून निघून तीन आठवडे उलटले होते. दुरिकडे इटलीच्या जेनोवा बंदरात तिची वाट पाहिली जात होती, पण इतके आठवडे गेले तरी मेरी सिलेस्टचा काहीच पत्ता नव्हता. एवढंच काय, मेरी सिलेस्टनंतर न्यूयॉर्कहून निघालेली इतर जहाजं जेनोवाला पोहोचायला लागली होती. मेरी सिलेस्ट निघाल्याच्या 10 दिवसांनंतर आणखी एक ब्रिटिश जहाज डे ग्रेशिया, न्यूयॉर्कहून त्याचं रस्त्याने जिब्राल्टरकडे निघालं. 4 डिसेंबर 1872 ला डे ग्रेशियाच्या कॅप्टनला एक जहाज लांब समुद्रात दिसलं.
कॅप्टनने पाहिलं की ते जहाज पाण्यावर पुढे सरकत नव्हतं, फक्त एकाच जागी लाटांवर हेलकावे खात होतं. समुद्राच्या त्या भागात असं दृश्य पाहून कॅप्टनला संशय आला. त्यांनी दूरवरून या जहाजाला अनेक सिग्नल्स पाठवले, पण काहीच उत्तर आलं नाही. मग त्यांनी जवळ जायचं ठरवलं. जवळ गेल्यावर कळलं की हे कॅप्टन बेंजामिन ब्रिग्सची मेरी सिलेस्ट होतं! न्यूयॉर्कहून निघून आता एक पूर्ण महिना उलटला होता. मेरी सिलेस्ट जिब्राल्टरपासून 1800 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात एकटंचं उभं होतं. एक महिन्यापूर्वी न्यूयॉर्कहून 10 जणांसह निघालेली ती सगळी माणसं समुद्राच्या मधोमध कुठे गायब झाली? हा प्रश्न सगळ्यांना पडला. (Mary Celeste)
त्यांना वाटलं, कदाचित जहाजावर काही अपघात झाला असेल. पण जेव्हा त्यांनी मेरी सिलेस्ट तपासलं, तेव्हा जहाज अगदी नीट आणि सुरक्षित होतं. कॅप्टन आणि त्यांच्या कुटुंबाचं सगळं सामान, क्रू मेंबर्सचे कपडे, सगळं जसंच्या तसं होतं. एवढंच काय, जेनोवाला नेण्यासाठी लोड केलेला मालही अगदी व्यवस्थित होता. क्रूसाठी ठेवलेला खाण्याचा साठाही तसाच पडला होता. थोडं आणखी तपासलं, तेव्हा कॅप्टनच्या खोलीतून एक लॉग बुक सापडली. त्या काळात कॅप्टन अशा लॉग बुकमध्ये जहाजाच्या मेंटेनन्सची नोंद करायचे. मेरी सिलेस्टच्या कॅप्टनने शेवटची नोंद 25 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता केली होती. म्हणजे, ती शिप त्या अवस्थेत सापडली, त्या दिवसाच्या 10 दिवस आधीपासून ती समुद्रात अशीच भटकत होती. आणखी एक गोष्ट लक्षात आली—शिपची केबिन सगळीकडे ओली होती, आणि काही ठिकाणी दीड-दोन फूट पाणी साचलं होतं. पण इतकं पाणी त्या आकाराच्या शिपला नुकसान पोहोचवण्यासाठी पुरेसं नव्हतं. (Top Stories)
आता तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय सॅल्व्हेज लॉनुसार, कोणी एखादं जहाज वाचवलं, तर त्याला जहाजाच्या किंमतीनुसार बक्षीस मिळायचं. याच बक्षिसाचा फायदा घेण्यासाठी डे ग्रेशियाच्या कॅप्टनने मेरी सिलेस्ट जिब्राल्टरला नेलं. तिथं अधिकाऱ्यांनी ते जहाज कोर्टाची सुनावणी होईपर्यंत ताब्यात ठेवलं. पण कोर्टाला सुद्धा या जहाजाचं रहस्य उलगडता आलं नाही. तेव्हा सर्वांनी या जहाजाचा भूतकाळ उकरून काढायला सुरुवात केली आणि मग उत्तर की हे जहाजचं भुतांनी झपाटलेलं आहे. (Mary Celeste)
कारण हे जहाज बनल्यापासून जहाजासोबत बरेच अपघात झाले पण जहाजाला काहीच झालं नाही. एकदा हे जहाज दुसऱ्या जहाजाला धडकलं पण या जहाजाला काहीच न होता ते समोरचं जहाज बुडालं, मग मेरी सिलेस्टला दुरुस्तीसाठी बंदरात नेलं गेलं, पण दुरुस्तीआधीच त्या बंदराला आग लागली. आणि अनेकदा या जहाजाचे कॅप्टन प्रवास सुरू करण्यापूर्वी आजारी पडायचे एकदा तर एक कॅप्टन मेला सुद्धा होता. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना वाटायला लागलं की मेरी सिलेस्टल जहाज भुतं कंट्रोल करतात. तेव्हा पासून या जहाजाला घोस्ट शिप बोललं जाऊ लागलं.
===============
हे देखील वाचा : General Knowledge : कोहिनूर हिरा, तलवार.. इंग्रजांनी जगातून काय-काय लुटलं?
===============
पण खरंच काय घडलं असेल? एक थिअरी म्हणते की डे ग्रॅटियाच्या कॅप्टननेच सगळ्यांना मारलं आणि सेलव्हेज लॉचा फायदा घेण्यासाठी हे नाटक केलं. पण मग जहाजावर रक्ताचे डाग का नव्हते? दुसरी थिअरी म्हणते, इथेनॉलच्या बॅरल्समधून गॅस लीक झाला असेल आणि घाबरलेल्या क्रूने लाइफबोटमधून पळ काढला. पण बॅरल्सच्या जागी आगीचे किंवा स्फोटाचे कोणतेही निशान नव्हते. तिसरी थिअरी सांगते, कदाचित समुद्री वादळ आलं असेल, आणि कॅप्टनने जहाज सोडायचं ठरवलं. सगळे लाइफबोटमधून पळाले, पण ती छोटी बोट वादळात टिकली नसेल. ही थिअरी बऱ्यापैकी विश्वास ठेवण्यासारखी आहे. पण याचाही कोणताही ठोस पुरावा नाही. 150 वर्षांहून जास्त काळ लोटला, पण मेरी सेलेस्टचं गूढ आजही कायम आहे. कॅप्टन बेंजामिन ब्रिग्स आणि त्याच्या क्रू मेंबर्सबरोबर नेमकं काय घडलं? ते कुठे गेले? हे रहस्य फक्त समुद्रालाच माहीत आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics