Home » एकेकाळी दिवाळखोर झाला होता सिनेजगतातील सर्वाधिक मोठा फिल्म स्टुडिओ ‘मार्वल’

एकेकाळी दिवाळखोर झाला होता सिनेजगतातील सर्वाधिक मोठा फिल्म स्टुडिओ ‘मार्वल’

by Team Gajawaja
0 comment
Marvel Success Story
Share

जगाला आर्यन मॅन, कॅप्टन अमेरिका आणि ब्लॅक पँथर सारखे सुपरहिरो देणारे मार्वल जगातील सर्वाधिक मोठा स्टुडिओ आहे. सुपरहिरोजची सर्वाधिक मोठी फ्रेंचाइजी या स्टुडिओजवळ आहे. मार्वलची सुरुवात कॉमिक्स पासून झाली होती. याचा पाया १९३९ मध्ये मार्टिन गुडमॅन यांनी रचला. तुम्ही ८ व्या दशकाच्या प्रवासात मार्वलला अनेक चढउतार ही पहावे लागले. एक काळ असा ही आला होता, जेव्हा स्टुडिओ दिवाळखोर झाला होता. त्यांनी आपला वाईट काळ पाहिल्यानंतर मार्वलने पुन्हा एकदा यशाकडे वाटचाल केली. (Marvel Success Story)

जेव्हा पहिल्यांदा कॅप्टन अमेरिका आला
मार्वलने १९४१ मध्ये कॅप्टन अमेरिकेच्या कॅरेक्टरसह कॉमिक्सची सुरुवात केली होती. कॉमिक्सच्या पोस्टरमध्ये कॅप्टन अमेरिका हिटलरला पंच मारताना दिसून आला. त्यानंतर तो अत्यंत पसंद करण्यात आला. कंपनीचे मालक गुडमॅन यांनी एकामागोमाग एक कॅरेक्टर आणले, मात्र कॉमिक्सच्या प्रकरणी स्पर्धा अधिक वाढली गेली.

१९६० मध्ये मार्वलच्या टाइमली कॉमिक्सची थेट टक्कर डीसी कॉमिक्स सोबत होते. मार्वलने त्यांना मागे टाकण्यासाठी स्पाइडरमॅन आणि फँन्टास्टिक फोर सारखे कॅरेक्टर उतरवले. १९६३ मध्ये आपल्या टाइमली कॉमिक्सचे नाव मार्वल कॉमिक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या ब्रँन्डिंग कंपनीच्या नावावर ओळखू लागली.

Marvel Success Story
Marvel Success Story

सुरु झाला टीव्ही सीरिज आणि सिनेमांचा काळ
१९७३ मध्ये मोठा निर्णय घेत गुडमॅन यांनी मार्बल एंटरटेनमेंट ग्रुपचा पाया रचला. या ग्रुप अंतर्गत त्यांनी टीव्ही सीरिज आणि सिनेमा करण्यास सुरुवात केली. मार्वल एंटरटेनमेंटने आपल्या प्रवासात वाईट काळ ही पाहिला. १९८९ मध्ये न्यू वर्ल्ड एंटरटेनमेंट लिमिटेड यांनी मार्वला ६७० कोटी रुपयांत खरेदी केले. २ वर्षानंतर कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आली. बिझनेस डीलच्या कारणास्तव कंपनीला अधिक तोटा झाला.

आर्थिक संकटादरम्यान, कंपनीने २० व्या सेंचुरी फॉक्सला एक्स मॅन आणि फँन्टास्टिक फोरचे राइट्स विकले. सोनीला स्पाइडरमॅनचे राइट्स विक्री केले. बोर्ड मेंबर्समध्ये कायदेशीर वाद सुरु झाला. जवळजवळ एका दशकानंतर स्थिती हळूहळू बदलत होती. १९९८ मध्ये टॉय ब्रिजने मार्वला खरेदी केले आणि आपली कंपनी बिज ग्रुप आणि मार्वल एंटरनेटनेंटला एकत्रित केले. त्यानंतर सुद्धआ बोर्ड सदस्यांमध्ये कायद्याची लढाई सुरुच होती.(Marvel Success Story)

२००९ च्या अखेरीस वॉल्ट डिज्नीने मार्वला जवळजवळ ३२ हजार कोटी रुपयांत खरेदी केले. हा निर्णय डिज्नीसाठी फायदेशीर ठरला कारण, करार केल्यानंतर अवघ्या १३ वर्षातच मार्वलने डिज्नीला ६ पट अधिक नफा करुन दिला. आता पर्यंत मार्वलच्या माध्यमातून डिज्नीने २ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. ऐवढेच नव्हे तर मार्वलच्या कारणास्तव डिज्नी ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर त्यांचे एक कोटींच्या घरात नवे युजर्स जोडण्यास यशस्वी झाला आहे.

हे देखील वाचा- ‘या’ गोष्टीमुळे रणवीर ठरतोय फ्लॉप…

माइकल जॅक्सन यांना खरेदी करायचे होते मार्वल
१९८४ मध्ये मार्वल आपल्या यशाच्या शिखरावर होता आणि डीसी कॉमिक्सला खरेदी करण्याची ऑफर दिली होती. डील जवळजवळ पक्की झाली होती पण काही कारणास्तव ती झाली नाही. ९० च्या दशकात यांची कॉमिक्स ऐवढी प्रसिद्ध झाली की, पॉपस्टार माइकल जॅक्सन यांनी मार्वलला खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.