Home » मंगळग्रहाच्या पोटात पाणी !

मंगळग्रहाच्या पोटात पाणी !

by Team Gajawaja
0 comment
Mars Planet
Share

मंगळ ग्रहाच्या पोटात पाण्याचा साठा असल्याचं नासाच्या संशोधनात समोर आलं आहे. हे ऐकून एलोन मस्क यांनी ‘आनंद पोटात माझ्या माइना’ हे गाणं लावून जल्लोष केला असेलच! कारण राशीतून मंगळ काढण्यासाठी लोकं जेवढे उपास, तापस, नवस वगैरे करत नाहीत त्यापेक्षा जास्त मेहनत मंगळावर माणसाला नेण्यासाठी एलोन मस्क करत आहेत. या माणसाचं एक स्वप्नवतं मिशन आहे मंगळावर माणसांची वसाहत निर्माण करण्याचं. ते कधी ना कधी पूर्ण होईल, पण त्याआधी नासाला मंगळावर पाणी सापडल्याच्या माहितीचा आढवा घेऊया. हे पाणी त्यांना कसं सापडलं? आणि मंगळावर पाणी सापडलय तर त्याचा माणसांसाठी काय उपयोग आहे? जाणून घेऊया. (Mars Planet)

नासाचं मार्स ईनसाईट लँडर हे ५ मे २०१८ रोजी लॉंच करण्यात आलं होतं. मंगळाच्या पोटाचा म्हणजे जमिनी खाली खोल भागांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. २१ डिसेंबर २०२२ रोजी हे मिशन बंद करण्यात आलं. पण, बंद होण्याआधी इनसाईट लँडरने मंगळाच्या आतल्या भागाची आणि जमिनी खाली होणाऱ्या हालचालींची  महत्त्वपूर्ण माहिती जमा केली. या लँडरवर सेस्मोमीटर म्हणजे भूकंप मोजण्याचं मशीन होतं. या मशीनने १३०० हून अधिक मार्सक्वेक म्हणजेच मंगळावरच्या भूकंपाची नोंद केली. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्राध्यापक मायकल मांगा सांगतात, “ही तीच पद्धत आहे, जी वापरून पृथ्वीवर पाण्याचा शोध घेतला जातो. किंवा तेल आणि गॅसचा शोध घेतला जातो.” आता मंगळाच्या जमिनीखालच्या भूकंपाचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना जमिनीखाली Liquid Water असल्याचं आढळून आलं. आता तुम्ही म्हणालं वॉटर लिकुइडच असत ना हे काय इश्कवाला लव सारख प्रकरण आहे का? तर कसं आहे, याआधी मंगळावर पाणी गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरूपात असल्याचे पुरावे आढळून आले होते. आता मात्र द्रव स्वरूपात पाणी आढळून आलं आहे म्हणून Liquid वॉटर हा शब्द वापरला आहे. (International News)

हे पाणी जमिनीखालच्या खडकांच्या भेगांमध्ये लपलेलं आहे. शिवाय, हे पाणी ११ ते २० किलोमीटर खोल खाली असल्याचं मानलं जात आहे. या संशोधनाचे प्रमुख वाशन राईट यांच्या मते, कोट्यावधी वर्षांपूर्वी मंगळावर नद्या, तलाव, आणि महासागर होते. आणि मंगळाच्या ध्रुवावर अजूनही गोठलेल्या पाण्याव्यतिरिक्त द्रवरूप पाणी असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे, असं ते म्हणाले. शास्त्रज्ञांच्या मते, या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी जर बाहेर काढलं, तर एक ते दोन किलोमीटर खोल महासागर भरू शकेलं इतकं हे पाणी आहे. मार्स ईनसाईट लँडरच्या डेटामुळे इतकं तर स्पष्ट झालं की, मंगळग्रह आज जसा आहे तसा तो ३ अब्ज वर्षांपूर्वी नव्हता. ३ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर माणूस निर्माण होण्यासाठी सूक्ष्मजीव जीवनही अस्तित्वात आलं नव्हतं. पण, तेव्हा मंगळग्रह हा पाण्याने भरलेला होता. मग आता हा ग्रह पूर्ण वाळवंट कसा झाला? या बद्दल बोलताना, संशोधनात सहभागी असणारे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक मायकल मांगा म्हणाले, “या ग्रहाच्या उत्क्रांतीमध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. (Mars Planet)

=================

हे देखील वाचा : या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !

================

जेव्हा मंगळाचं वातावरण नष्ट झालं, तेव्हा यातलं काही पाणी अवकाशात हरवलं” म्हणजेच त्याची वाफ झाली “पृथ्वीवर बहुतेक पाणी हे जमिनीखाली आहे. असचं मंगळावर असण्याचीही शक्यता आहे.” या पाण्याच्या शोधामुळे मंगळावर जीवसृष्टी होती की नाही, आणि मंगळाचा भौगोलिक इतिहास जाणून घेणं सोप होईल. ग्रहावर जीवनाचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं प्राध्यापक मांगा यांनी स्पष्ट केलं आहे. पण माणसांसाठी पाणी हेच जीवन आहे, आणि सध्या ते तरी सापडलं आहे. आता पृथ्वी सोडून माणूस मंगळावरही राहू शकेलं का ? या शक्यतेला आता नाकारता येणारं नाही. पण त्यासाठी आणखी बरीच वर्ष लागतील. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.