एका नात्यातील कपल्स मध्ये किती ही प्रेम का असे ना मात्र अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला कधीच सांगितल्या जात नाहीत. लग्नानंतर खासकरुन मुली आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ही नवऱ्यासोबत शेअर करु लागते पण नंतर कधीकधी आपण ती गोष्ट उगाचच सांगितली असे ही त्यांना वाटते. लग्नानंतर महिलांना एक नव्हे तर दोन घरांची काळजी घ्यावी लागत असते. या जबाबदारीचा अर्थ असा होतो की, काही गोष्टी तुम्हाला हाताळाव्या लागतात ज्या अगदी समजुतदारपणे तुम्ही करता की नाही हे सुद्धा फार महत्वाचे असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या नवऱ्याला कधीच सांगू नका.(Married life secretes)
-नवऱ्याच्या घरातील मंडळी आवडत नाहीत
कोणत्याही व्यक्तीला आपल्या परिवाराबद्दल वाईट बोलले आवडत नाही. त्यामुळे तो असे काही ऐकून घेण्यास तयार होत नाही जरी त्याच्या घरी समस्या असल्या तरीही.. अशातच तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या परिवाराबद्दलच्या कोणत्या गोष्टी खटकत असतील त्या नवऱ्याला सांगा. परंतु घऱातील मंडळींबद्दल काहीच बोलू नका. कारण नवरा-बायको मध्ये आपल्या परिवाराची सीमा रेषा नेहमीच टिकून राहिली पाहिजे असे सांगितले जाते.
हे देखील वाचा- कधीही न मावळणारं फुल दीपिकाला देण्यासाठी रणवीरने केलं भलतंच साहस…
-एक्स पार्टनर संबंधित सर्व गोष्टी
जसे तुम्ही तुमच्या एक्स पार्टनर बद्दल बोलणे टाळता त्याच प्रमाणे त्याच्या सोबतच्या खासगी आयुष्यातील क्षणांचा सुद्धा उल्लेख करणे नवऱ्यासमोर टाळा. कारण कधी नव्हे तर अचानक भांडण झाल्यास तुम्हालाच नवऱ्याकडून एक्स पार्टनर संदर्भात ऐकून घ्यावे लागेल. या व्यतिरिक्त जुन्या नात्यांमुळे तुमचे आजचे संबंध तुटू शकतात. तसेच तुमच्यावर अविश्वास ही दाखवला जाऊ शकतो.
-पैशांसंदर्भात अधिक खुलासा करु नका
आर्थिक गोष्टींबद्दल नवऱ्यासोबत बोला आणि एक महिन्याभरचे बजेट तयार करा. मात्र पैसे हे तुमच्या नात्यात फूट पाडणार नाहीत ना याकडे सुद्धा लक्ष द्या. पण प्रत्येकवेळी नवऱ्यासमोर पैशांसंदर्भात बोलणे ही टाळा. त्याबद्दल काही गुप्तता ही ठेवा. नवऱ्याला सर्व गोष्टी सांगाव्यात असे सांगितले जाते. मात्र पुढे जाऊन तुम्हाला पैशांची गरज भासल्यास नवऱ्याकडे तुम्ही हात पसरता कामा नये.(Married life secretes)
-मित्र आणि परिवारातील मंडळींचे विचार सांगू नका
मित्र आणि परिवारासंदर्भात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन तुम्ही बदलू शकत नाही. अशातच आपल्या मित्राने किंवा घरातील मंडळींनी आपल्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल काय कमेंट केली हे प्रत्येकवेळी सांगणे टाळा. त्यांच्या बोलण्यावरुन तुमच्यात भांडण होऊ शकते. अगदीच वाद टोकाला गेला तर तुम्ही वेगळे सुद्धा होऊ शकतात. कारण प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीचे विचार पटतील असे नसते. त्यामुळे या गोष्टी तरी नवऱ्याला सांगणे टाळा जेणेकरुन तुम्ही वैवाहिक आयुष्यात आनंदी राहू शकता.