Home » ‘या’ सिंड्रोममुळे रुममेट प्रमाणे वागू लागतात पती-पत्नी

‘या’ सिंड्रोममुळे रुममेट प्रमाणे वागू लागतात पती-पत्नी

लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतात. यादरम्यान, पती-पत्नीला एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी अगदी जवळून कळतात आणि नाते अधिक घट्ट होते.

by Team Gajawaja
0 comment
Life Lessons
Share

Married Life Problems : लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतात. यादरम्यान, पती-पत्नीला एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी अगदी जवळून कळतात आणि नाते अधिक घट्ट होते. प्रत्येक नात्यात चढ-उतार होत राहतात. पण अशा काही गोष्टी असतात ज्याबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नाही. यामुळे नात्यात वाद होणे स्वाभाविक बाब आबे. पण सध्या पती-पत्नीच्या नात्यात सातत्यने वाद आणि उदासीनता आल्याचे दिसून येते. यासाठी रुममेट टर्मचा वापर केला जातो.

एका खोलीत पती-पत्नी राहून एकमेकांसोबत अज्ञात व्यक्तीसारखे वागणे किंवा एकमेकांच्या भावनांची परवा न करणे. पार्टनर असूनही एकटेपणा वाटणे अशा काही गोष्टी होत असल्यास त्याला रुममेट सिंड्रोम असे नाव दिले जाते. जाणून घेऊया या स्थितीपासून कसे दूर राहिले पाहिजे याबद्दल अधिक….

रुममेट सिंड्रोमचा असा होतो नात्यावर परिणाम
रुममेट सिंड्रोमचा अत्यंत वाईट परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतोच. पण त्याचसोबत मुलांच्या पालपोषणावरही त्याचा प्रभाव पडतो. या सिंड्रोमच्या कारणास्तव तणावाखाली जाणे, एकटेपणा वाटणे आणि मानसिक आरोग्य बिघडे अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो.

रुममेट सिंड्रोमपासून असे राहा दूर
नात्यात संवाद महत्त्वाचा तुमच्या नात्यात रुममेट सिंड्रोमची लक्षणे दिसून येत असल्यास तुम्ही रिलेशनशिप बचावण्यासाठी काही मेहनत घेतली पाहिजे. जसे की, पार्टनरसोबत मनमोकळेपणाने संवाद साधणे. जेव्हा तुमच्यामधील संवाद उत्तम असेल तेव्हाच नाते दीर्घकाळ टिकू शकते.

एकमेकांसाठी काहीतरी स्पेशल करणे
नात्यातील उदासीनता कमी होण्यासाठी पार्टनरने एकमेकांसाठी काहीतरी केले पाहिजे. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासह बाहेर फिरायला जायला पाहिजे. (Married Life Problems)

एकमेकांची विचारपूस करणे
रुममेट सिंड्रोमपासून दूर राहायचे असल्यास तु्म्ही पार्टनरची विचारपूस केली पाहिजे. अधिक वेळ नसल्यास एखादा इमोजी पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता.


आणखी वाचा :
जपानमध्ये नेकेड फेस्टिवल अनोखा ठरणार…
रिलेशनशिपमध्ये पार्टनर खुश नसल्याचे हे आहेत संकेत
कंम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी या टिप्स येतील कामी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.