Married life advice : सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइमुळे परिवाराची व्याख्याही बदलली गेली आहे. अशातच सासू-सासऱ्यांसोबत राहणाऱ्या कुटुंबात विवाहित कपलला काहीवेळेस अॅडजेस्ट करणे कठीण होते. यामुळे कधीकधी पारिवारिक वाद वाढले जातात. लहान-लहान गोष्टींवरूनही भांडण होतात. अशातच नात्यात फूट पडली जाते. तुमच्यासोबतही अशा काही गोष्टी घडतात का? तर तुम्ही अशा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ज्यामुळे वाद होतात.
चूक झाल्यास माफी मागून वाद मिटवा
प्रत्येक समस्येवर उपाय आहे. अशातच सासू-सासऱ्यांसोबत वाद झाल्यास आणि तुमची चूक असल्यास तुम्ही माफी मागून वाद मिटवा. जेणेकरून नात्यात गोडवा टिकून राहिल. याशिवाय पार्टनरही दुखावला जाणार नाही.
प्रत्येक लहान गोष्ट पार्टनरला सांगू नका
बहुतांश महिलांना सवय असते की, घरात थोडा जरी वाद झाल्यास त्याबद्दल लगेच नवऱ्याला सांगितले जाते. पण असे करू नका. यामुळे पार्टनरला तुमचा राग येऊ शकतो. त्याला वाटू शकते की, तुम्ही सातत्याने सासू-सासऱ्यांचा राग करतायत.
प्रत्येक गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये
मोठी माणस आपल्या भल्यासाठी काही गोष्टी सांगतात. केवळ त्यांची बोलण्याची पद्धत कठोर आणि थेट असते. जी काहींना पटत नाही. यामुळे सासू-सासरे असतील तर त्यांना आधी समजून घ्या. यानंतरच रिअॅक्ट करा. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये. (Married life advice)
थंड डोक्याने विचार करा
रागात काही गोष्टी बोलल्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. यामुळे वादही वाढला जातो. अशातच सासू-सासऱ्यांसोबत वाद होत असल्यास त्यावेळी डोक शांत ठेवा. विचारपूर्वक बोला. जेणेकरून तुम्ही जसे सासू-सासऱ्यांसोबत वागाल तसेच तुमचे मुलं त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करेल.