Marriage tips- लग्न हे ठरवून केलेले असावे किंवा लव्ह मॅरेज पद्धतीने करायचे असेल तरीही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण प्रत्येक नात्यात काही अशा गोष्टी असतात त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नंतर पस्तावल्यासारखे होते. याच कारणामुळे लग्न हे विचारपूर्वक करायचे असते. आपल्या आय़ुष्यभराच्या साथीदारासोबत सात फेरे घेण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट केलेल्याच बऱ्या. नंतर पुढे जाऊन कोणतीही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या लग्नापूर्वी तुम्हाला पार्टनरसोबत स्पष्ट करायच्या आहेत.
-आपला पार्टनर अधिक खर्च तर करत नाही ना?
लग्नात नेहमीच ही गोष्ट लक्षात असू द्या की, आपला पार्टनर सेविंग्सकडे अधिक लक्ष देतोय का? कारण तुमच्या पार्टनरची सेविंग्स असेल तर दोघांचा संसार हा कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय सुरळीत सुरु राहिल. याउलट जर तुमचा पार्टनर उगाचच अतिरिक्त खर्च करत असेल आणि त्याची सेविंग्स ही खर्चापेंक्षा कमी असेल तर त्याला काय अर्थ. या स्थितीत तुम्हाला मनस्ताप होऊ शकतोच पण तुमच्या नात्यात पैशांवरुन ही भांडण होऊ शकतात हे लक्षात ठेवा.
-भविष्यातील काय करु इच्छिता याबद्दल बोला
प्रत्येक लग्न करणारा व्यक्ती हा आपल्या पार्टनरला सर्व काही सांगतोच पण भविष्यात आपल्याला काय करायचे आहे त्याबद्दल ही विचारा. एकमेकांसोबत भविष्यात आपण दोघे मिळून उत्तम पद्धतीने कसे आयुष्य जगू शकतो या गोष्टीवर अधिक बोला. कारण प्लॅनिंग करुन संसाराचा गाडा हाकल्यास तुम्हाला सुखी वैवाहिक आयुष्य जगता येईलच. पण एखादी समस्या उद्भवल्यास तुमचा पार्टनर ही तुम्हाला त्यावेळी पाठिंबा देईल.(Marriage tips)
हे देखील वाचा- वैवाहिक आयुष्यात आनंदी रहायचे असेल तर नवऱ्याला कधीच सांगू नका ‘या’ गोष्टी
-रिलेशनशिप्स किंवा एखादे सीक्रेट स्पष्टपणे सांगा
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत संपूर्ण आय़ुष्य जगण्याचे ठरवतो तेव्हा त्याच्या सोबत आपल्या आय़ुष्यात घडलेल्या सर्वकाही गोष्टींबद्दल खुलासा करा. जसे की, लग्नापूर्वी तुमचे असेलले प्रेमसंबंध किंवा एखादे सीक्रेट जे आजवर तुम्ही कोणाला सांगितले नाही ते, तुमच्या पार्टनर सोबत लग्नापूर्वीच उघड करा. कारण लग्नानंतर जर या गोष्टींमुळे वाद झाल्यास तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो.
-बेबी प्लॅनिंग बद्दल बोला
लग्न झालेल्या प्रत्येक कपलला आपल्याला एक गोंडस मुलं असावे असे वाटते. तसेच घरातील मंडळींना आपल्या घरात लहान मुल कधी खेळणार याची आशा असते. त्यामुळे लग्नापूर्वीच बेबी प्लॅनिंगबद्दलचे पार्टनरचे विचार काय आहेत हे समजून घ्या, तसेच लग्नानंतर ही तुम्ही या गोष्टीवर योग्य ती परिस्थिती पाहून बोलू शकता. कारण एकमेकांच्या भावनांना महत्व देणे आणि त्यांचा आदर करणे हे फार महत्वाचे असते. खासकरुन जेव्हा तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असता तेव्हा. कारण तुम्हाला लहान बाळ वाढवायचे असते. त्यामुळेच लग्नापूर्वी या काही गोष्टी आपल्या पार्टनर सोबत आधिच स्पष्ट करा.