केरळातील एका ख्रिस्ती समुदायाच्या परंपरेवर कोट्टायाम कोर्टाने बंदी घातली आहे. ती परंपरा अशी होती की, भाऊ-बहिण आपापसात लग्न करु शकतत. कोर्टाने असे म्हटले की, हा कोणताही धार्मिक मुद्दा नाही. त्यामुळे ती परंपरा बंद करावी. हे प्रकरण क्रॉस कजिन मॅरेज म्हणजेच चुलत भावंड किंवा एखाद्या दुरच्या नातेवाईकांपैकी कोणाशी तरी लग्न संबंधित नसून सख्ख्या भावाबहिणीशी संबंधित आहे. मर्यादित लोकसंख्या असलेला हा समुदाय या परंपरेमागील एक वेगळे कारण सुद्धा सांगतो. (Marriage in Christian Community)
सख्ख्या भावाबहिणीशी लग्न करण्यामागील यांचे कारण तुम्हाला हैराण करु शकते. खरंतर केरळात राहणारा एक ख्रिस्ती समुदाय असा आहे की, जो स्वत:ला जातिगत रुपात खुप शुद्ध मानतो. या समुदायात आपली शुद्धता कायम ठेवण्यासाठी सख्ख्या भावाबहिणीशी एकमेकांमध्ये लग्न लावून दिले जाते.

यहूदी-ख्रिस्ती परिवाराचे वंशज
हा समुदाय आहे- कनन्या कॅथलिक समुदाय. त्यांनी स्वत:ला ७२ यहूगी-ख्रिस्ती परिवाराचे वंशज मानले आहे, जे ३४२ ईसवी मध्ये थॉमस ऑफ किनाई व्यापाऱ्यांसह मोसोपोटामिया येथून आले होते. एका हिंदी वृत्तपत्राने आपल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले की, किनाई नंतर कनन्या झाले. केरळातील कोट्टायम आणि त्याजवळील परिसरातील जिल्ह्यांमध्ये या समुदायातील जवळजवळ १.६७ लाख लोक आहेत. यापैकी २१८ पादरी आणि नन आहेत.
समुदायाव्यतिरिक्त लग्न करण्यास बंदी
या समुदायातील लोक आपली जातिगत शुद्धता कायम ठेवण्यासाठी अमूमन समाजाबाहेर लग्न करु शकत नाहीत. जर एखाद्याने तसे केले तर त्याला बहिष्कृत केले जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांचे चर्च आणि कब्रच्या येथे जाण्यास ही बंदी घातली जाते. समाजाबाहेर लग्न करणाऱ्यांना लग्न आणि आयोजनांसह ते आपल्या नातेवाईकांकडे सुद्धा जाऊ शकत नाहीत.(Marriage in Christian Community)
समुदायात परतण्यासाठी काही नियम
समाजातून बहिष्कृत केल्यानंतर पुन्हा समाजात यायचे असेल तर काही नियम ही आहेत. या समुदायात एखाद्या मुलाने बाहेरच्या मुलीशी लग्न केले आणि त्या बाहेरच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तर तो समाजात पुन्हा येऊ शकतो. मात्र यासाठी सुद्धा काही नियम आहेत. अशी अट आहे की, त्या मुलाला पुन्हा आपल्या समुदायातील एखाद्या मुलीशी लग्न करावे लागते. दुसरी अट अशी की, जर पहिली पत्नी (बाहेरील व्यक्तीः ला मुल असेल तर त्याला समाजात घेऊन येता येत नाही. दरम्यान, महिलांसाठी असे कोणतेही प्रावधान नाही आहे. काही वेळेस परिवारातील लोक विविध पंथाचे अनुसरण करतात.
हे देखील वाचा- आपल्या मुलाला रस्त्यावर झोपण्यासाठी एकटे सोडते आई, कारण ऐकून व्हाल हैराण
कोर्टात पोहचले होते प्रकरण
नवऱ्याला समुदायातून बहिष्कृत केल्यानंतर महिला सांथा जोसेफ हिने कोर्टात संस्थेच्या माध्यमातून अपील दाखल केले होते. तिने असे म्हटले की, तिच्या नवऱ्याला समाजातून बेदखल करण्यात आले. कारण मी ख्रिस्ती होती पण कनन्या समुदायातील नव्हती. आता तिच्या नवऱ्याच्या त्या कब्रीच्या येथे सुद्धा जाण्यावर बंदी घातली गेली. जेथे त्यांच्या आई-वडिलांना दफन करण्यात आले होते.त्यांच्या नातेवाईकांनी लग्न आणि अन्य आयोजनांमध्ये सुद्धा जाण्याचा अधिकार नव्हता. त्यानंतर परंपरेमुळे पीडित लोकांनी कनन्या कॅथलिक नवीकरण समिती नावाची संस्था बनवली. तसेच अशा परंपरेच्या विरोधात कोर्टात अपील दाखल केले. त्यांना आता कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने सुनावणी करत असे म्हटले की, सख्ख्या भावंडांसोबत लग्न करण्याच्या परंपरेवर बंदी घालण्यात येत आहे.