आपण एखाद्या लग्नसोहळ्याला जातो तेव्हा गिफ्ट म्हणून काहीतरी भेटवस्तू नक्कीच देतो. मात्र भारतातील काही समाजात लग्नात भेटवस्तू देण्यासंदर्भात काही विविध परंपरा आहेत. यापैकीच भारतातील एका समाजात मुलीकडून चक्क वराला साप हे हुंड्याच्या रुपात दिले जातात. तर छत्तीगढ मधील कोरबा जिल्ह्यात सोहागपुर गावाला सर्पलोक असे म्हटले जाते. येथे राहणाऱ्या सवरा समाजात एक अनोखी प्रथा आहे. परिवारातील मुलीचे लग्न असते तेव्हा हुंडा म्हणून २१ साप देण्याची प्रथा आहे. अशी मान्यता आहे की, यामुळे मुलीच्या सासरी भरभराट होते. (Marriage gift as snakes)
सवरा समाज जंगल फिरुन फिरुन विषारी साप पकडतात. त्यांचे विष काढून आपल्या पेटीत बंद करुन घरात ठेवतात. पण त्याचसोबत त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय त्यांच्याकडून केली जाते. अशातच कोरबा जिल्ह्यात सापांची संख्या यापूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. वन्य जीव संरक्षण कायदा आणि वन विभागाच्या सख्तीमुळे साप दाखवुन आपले आणि परिवाराचे पोट चालवणाऱ्या सवरा जातीच्या लोकांवर त्यामुळे संकट ओढावले आहे. काही वेळेस वन विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे सापांना सोडून द्यावे लागते. अशातच लग्नात २१ साप देण्याची परंपरा कमी होऊन आता ती ११ वर आली आहे.
सध्याच्या दिवसातच एखाद्याच्या घरी साप आढळल्याच्या बातम्या समोर येत राहतात. काही वेळा सर्पदंशामुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्यास जीव ही गमवावा लागतो. अशातच सवरा समाजातील लोकांची अशावेळी मदत घेतली जाते. काही वेळेस ते साप पकडून आपले पोट भरतात. मात्र शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना प्रत्येक दिवस जगणे सुद्धा कठीण जात आहे.
हे देखील वाचा- ‘या’ देशातील लोक आता किडे-मुंग्या सुद्धा आवडीने खाणार, सरकारकडून तयार केला जातोय नियम
गावातील सुनील याने असे सांगितले की, मदतीच्या रुपात राशन कार्ड तयार केले आणि राशन ही मिळते. मात्र कोणाकडे गी जमीन-प्रॉपर्टी नसल्याने समाजातील कोणालाही सदस्यचे जात प्रमाणपत्र बनवता आलेले नाही. स्वत:हून शिक्षण घेतले आहे. मात्र जात प्रमाणपत्र नसल्याने आरक्षणाचा कोणताही फायदा घेता आलेला नाही. (Marriage gift as snakes)
सोहागपुर गावात सर्पलोक जरुर आहेत. मात्र वन विभागाची सख्ती आणि जात प्रमाणपत्र नसल्याने सवरा समाजातील लोकांना शासकीय गोष्टीपासून ही वंचित रहावे लागत आहे. अशातच गरज आहे की, सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावे आणि आमचा समाज सुधारण्याकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी सवरा समाजातील लोकांची अपेक्षा आहे.