Home » ‘या’ कारणास्तव मॅरेज काउंसिलरची गरज भासते

‘या’ कारणास्तव मॅरेज काउंसिलरची गरज भासते

नाते मजबूत करण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा कपल्समध्ये भावनात्मक दूरावा येऊ लागतो तेव्हा नाते दीर्घकाळ टिकवणे फार मुश्किल होते.

by Team Gajawaja
0 comment
marriage counselling
Share

नाते मजबूत करण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा कपल्समध्ये भावनात्मक दूरावा येऊ लागतो तेव्हा नाते दीर्घकाळ टिकवणे फार मुश्किल होते. भावनात्मक दूरावा येण्याचे मुख्य कारण असे की, नात्यात संवाद न होणे. याच कारणास्तव कपल्स एकमेकांच्या भावना समजून घेऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त रोमांन्स सुद्धा कधीकधी भावनात्मक दूरा वाढवण्यासाठी जबाबदार असतो. यामुळे अशा एखाद्या काउंसिलरची मदत घ्यावी जो तुम्हाला नात्याचे महत्त्व सांगेलच पण कपल्समधील दूरावा कमी करण्यास मदत करेल. (Marriage Counselling)

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, पार्टनरमध्ये लैंगिक संबंध असणे किंवा नसणे हे सुद्धा फार महत्त्वाचे असते. जर पार्टनरमध्ये अधिक लैंगिक संबंध प्रस्थापित होत नसतील तर नात्यात दूरावा येऊ शकतो. त्याचसोबत या कारणास्तव पार्टनर हा दूरावला ही जाऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंधांबद्दल जेव्हा पार्टनरशी खुल्यापणाने बोलू शकत नाही तेव्हा मॅरेज काउंसलरची मदत घेऊ शकता. त्यांच्यासोबत तुम्ही या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलू शकता.

या व्यतिरिक्त बहुतांश कपल्स एकमेकांच्या लहान-मोठ्या गोष्टी शेअर करतात. मात्र अचानक काही गोष्टी लपवतात. यामुळे नातेसंबंध बिघडू लागतात. खरंतर प्रत्येकाला प्रायव्हेसी दिली असते. पण त्यांच्यापासून काही गोष्टी लपवल्या तर पार्टनरला वाईट वाटू शकते. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही मॅरेज काउंसिलरची मदत घ्या. यामुळे काही मुद्द्यांवर तोडगा काढण्यास मदत होईल. तसेच काउंसिलरसोबत तुम्ही तुमच्या काही गोष्टी स्पष्टपणे बोलू शकता.

तसेच कधीकधी नात्यात कपल्समध्ये संवाद हा अचानक बंद होतो. एकमेकांशी बोलावेसे वाटत नाही. ज्या मुद्द्यावर तोडगा काढायचा आहे तो राहतो बाजूला आणि नात्यावर त्याचा परिणाम होतो. अशातच मॅरेज काउंसिलर तुमच्या दोघांचे ऐकून घेऊन तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात.

नाते हे मजबूत बनवण्यासाठी भावना व्यक्त करणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा कपल्समध्ये भावनात्मक दूरावा येऊ लागतो तेव्हा नाते वाचवणे कठीण होते. भावनात्मक दूराव्याचे मुख्य कारण म्हणजे कम्युनिकेशन गॅप. याच कारणास्तव कपल्समध्ये गैरसमज निर्माण होऊन वाद ही होऊ शकतात. त्यामुळे नाते टिकवायचे असेल तर नक्कीच मॅरेज काउंसिलरची मदत घ्या. (Marriage Counselling)

हेही वाचा- पार्टनरचा तुमच्यावर विश्वास नाही? ‘या’ ट्रिक्स वापरा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपल्सपैकी एका पार्टनरला वाईट सवयी लागल्या असतील तर नात्यात वाद वाढू लागतात. जर तुम्ही प्रयत्न करून ही पार्टनरची वाईट सवय दूर होत नसेल तर मॅरेज काउंसिलरची मदत घेऊ शकता. जसे की, अल्कोहोलचे अधिक सेवन करणे तुमच्या नात्यावर प्रभाव टाकू शकते. यापासून दूर राहण्यासाठी काउंसिलर मदत करू शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.