प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठा आणि खास क्षण असतो तो म्हणजे लग्नं. कारण यावेळी तुम्ही एखाद्या नव्या व्यक्तीसोबत पुन्हा तुमच्या आयुष्याची सुरुवात करता. मात्र तुम्ही कधी एकाच व्यक्तीने एकापेक्षा अधिक लग्न केल्याचे ऐकले असेलच पण तब्बल ५३ लग्न केल्याचे कधी ऐकले आहे का? पण हे खरंय. कारण सौदी अरेबियातील एका व्यक्तीने आपल्या आयुष्याच्या ४३ वर्षात तब्बल ५३ वेळा लग्न करत एक वेगळाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. व्यक्तीने या लग्नामागील कारण ही सांगितली. त्याने असे म्हटले की, शांती आणि स्थायित्व मिळवण्यासाठी ही लग्न केली. लग्न केल्याच्या या रेकॉर्डनंतर ६३ वर्षीय व्यक्तीने ऐवढी लग्न केल्याचे कारण सांगितले त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. व्यक्तीचे असे म्हणणे आहे की, त्याने ही लग्न खरंतर अशा मुलींच्या शोधात केली ज्या त्याला खुश ठेवतील.(Marriage 53 times in life)
गल्फ न्यूजच्या एका बातमीनुसार, व्यक्तीचे नाव अबदुल्लाह आहे. अबुने आपल्याबद्दल असे म्हटले की, जेव्हा मी पहिल्यांदा लग्न केले तेव्हा दुसरे लग्न करण्याबद्दल कोणताही विचार नव्हता. मात्र तेव्हा मी खुश होते आणि आम्हाला एक मुलं सुद्धा झाले. त्यानंतर व्यक्तीने वयाच्या २३ व्या वर्षात पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण तो आपल्या वैवाहिक आयुष्यात काही समस्यांचा सामना करत होता. व्यक्तीने असे म्हटले की, त्याने आपल्या सर्व बायकांसोबत ईमानदारीने राहण्याचा प्रयत्न केला आहे.

भांडणांमुळे केली लग्नं
व्यक्तीने असे म्हटले की, त्याचे आणि पत्नीमध्ये काही समस्या आल्या. हेच कारण त्याला वारंवार लग्न करण्यास उकसवत होते. त्याने पुढे असे सांगितले मी खुप दीर्घ काळात ५३ महिलांसोबत लग्न केले. जेव्हा मी केवळ २० वर्षांचा होतो तेव्हा माझे पहिले लग्न झाले आणि माझी पत्नी माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी होती. हे लग्न करण्यासंदर्भात कोणताही प्लॅन करण्यात आलेला नव्हता. आपल्या बायकांना कंटाळून त्याने वेळोवेळी हा निर्णय मजबूरीने घेतला.(Marriage 53 times in life)
हे देखील वाचा- तुम्ही पार्टनरपासून इमोशनली दूर होत असल्याचे ‘हे’ आहेत संकेत
अब्दुल्लाह याने सांगितले त्याचे लग्न करण्याची कमी वेळ ही एक रात्रच होती. तर बहुतांश लग्न केलेल्या महिला या सौदी मधीलच होत्या. पण मी काही परदेशी महिलांसोबत सुद्धा लग्न केल्याचे त्याने म्हटले आहे. हे करण्यामागील सुद्धा त्याने कारण सांगितले. कारण विदेशात असलेल्या जमीनींवर कायदेशीर समस्यांपासून बचाव करण्यासाठी केले होते. मात्र आता अब्दुल्लाह याचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही.