Home » अमेरिकेत आता गांजा ठेवणे आता अपराध नाही, जो बायडेन यांचा हजारो दोषींना मोठा दिलासा

अमेरिकेत आता गांजा ठेवणे आता अपराध नाही, जो बायडेन यांचा हजारो दोषींना मोठा दिलासा

by Team Gajawaja
0 comment
Marijuana in America
Share

अमेरिेकेत आता गांजा ठेवणे किंवा वापरण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अमेरिकेच्या फेडरल कायद्यानुसार गांजा ठेवण्यासंबंधित आढळलेल्या दोषींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठा दिलासा दिला आहे. जो बाइडेन यांनी आरोपींना या दोषातून आता मुक्त केले आहे. बायडेन यांनी असे ही म्हटले आहे की, प्रशासनाकडून या गोष्टीचा आढावा घेणार आहे की, गांजा आता सुद्धा हेरॉइन आणि एलएसडी प्रमाणे वैध कॅटेगरीत ठेवायचा की नाही. अमेरिकेतील काही राज्यांनी आधीपासूनच गांजा ठेवणाऱ्या आरोपींची शिक्षा कमी केली आहे. अशाच आता ही पूर्णपणे संपली आहे. (Marijuana in America)

अमेरिकेत गांजा ठेवण्यासंदर्भात १९७० मध्ये गुन्हा असल्याचे मानण्यात आले होते. या कायाद्याअंतर्गत हजारो लोकांना दोषी म्हणून घोषित करण्यात आले होते. आकडेवारीनुसार वर्ष १९९२ ते २०२१ दरम्यान जवळजवळ ६५०० लोकांना या अंतर्गत दोषी ठरवले होते. जो बायडेन यांनी आता जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार आता या अपराधातील सर्व आरोपी दोषमुक्त होणार आहेत. तर अमेरिकेतील काही राज्यांना गांजा ठेवण्यासंदर्भातील शिक्षा कमी किंवा संपवली आहे. आता जो बाइडेन यांनी अटॉर्नी जनरल यांना असे म्हटले आहे की, या गोष्टीचा आढावा घ्यावा की गांजाचे कोणत्या प्रकारात वर्गीकरण करावे, त्याचसोबत त्यावर कोणत्या बंदी घातल्या जातील.

Marijuana in America
Marijuana in America

गांजा विक्री करण्यांना सूट नाही
दरम्यान, दोषमुक्त लोकांमध्ये अशांचा समावेश नाही ज्यांनी गांजाची विक्री किंवा वाटप करताना पडकले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या गांजा ठेवल्यासंबंधित कोणताही आरोपी तुरुंगात नाही. यामुळे अशा लोकांना दिलासा मिळणार आहे जे शासकीय नोकरी, घराचा शोध, कॉलेज प्रवेश किंवा अन्य शासकीय सुविधांच्या लाभांपासून वंचित राहिले होते. जो बाइडेन यांनी राज्यातील राज्यपालांना अपील केली आहे की, त्यांनी राज्याच्या कायद्याअंतर्गत अशा प्रकरणातील दोषींना मुक्त करावे. सध्या अमेरिकेत गांजाला हेरॉइन आणि एलएसडी सारख्या अंमली पदार्थांसह शेड्यूल-१ कॅटेगरीत ठेवले जातेय. (Marijuana in America)

हे देखील वाचा- कॅनडात नोकरीसाठी बंदी, भारतीय विद्यार्थ्यांना ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

दुसऱ्या बाजूला विरोधकांनी बायडेन यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय आर्थव्यवस्था मंदावण्यासह गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ यामुळे त्यांचे वाईट नेतृत्व दर्शवते. दरम्यान, २०१७ मध्ये गांजा ठेवणाऱ्या जवळजवळ २० हजार लोकांच्या विरोधात अमेरिकेतील केंद्रीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी फक्त९२ लोकांना शिक्षा दिली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.