Home » अभिनेत्री मेघा धाडेचे टीव्हीला उद्देशून भावनिक पत्र

अभिनेत्री मेघा धाडेचे टीव्हीला उद्देशून भावनिक पत्र

by Jyotsna Kulkarni
0 comment
Megha Dhade
Share

प्रत्येक घरामध्ये टीव्ही हा असतोच असतो. आजच्या मॉडर्न काळात मोबाईलवर सर्व काही अगदी टीव्ही देखील उपलब्ध असताना घरात टीव्ही हा असतो. किंबहुना अनेकांचा हा अट्टहासच असतो. टीव्ही हा मोबाईलवर नाही तर घरत सगळ्यांसोबत बसून पाहिला पाहिजे असे अनेकांचे म्हणणे असते. आज टीव्हीला ओटीटी या प्लँटफॉर्मचे सर्वत मोठे आणि तगडे आव्हान आहे. यातही टीव्हीने स्वतःचे स्थान मोठ्या जिद्दीने टिकवून ठेवले आहे. आपल्या समजतील एक मोठा वर्ग नियमित टीव्ही बघतो. मग त्यावर मालिका असो, बातम्या असो किंवा क्रिकेट टीव्ही हा बघितलाच जातो.

यातही टीव्हीवर मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. फक्त गृहिणीच नाही तर घातले सगळे सदस्य काही मालिका अगदी न चुकता बघतात. टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसाठी ‘जागतिक टेलिव्हिजन दिवस’ साजरा केला जातो. येत्या २१ नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री मेघा धाडेने टीव्हीला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या खूपच व्हायरल होत आहे. जाणून घेऊया नक्की मेघाने या पत्रामध्ये काय लिहिले आहे.

प्रिय टीव्ही,

नमस्कार! मी मेघा धाडे, तुझी एक छोटीशी चाहती आणि सखी. तू माझ्या घरातली एक वस्तू नाहीस, तर एक खास आणि महत्वाचा सदस्य आहेस. आज मी माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना तुला एक पत्र लिहित आहे. आपल्याला असं कधी बोलताच आलं नाही कारण, तू नेहमी माझ्या घरातल्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपलं जीव व्यतीत करत आला आहेस.

तुझ्यामुळे मला अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. माझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात उपस्थित राहिलास तू. तुझ्यामुळे मी घराघरांत पोहोचले, लहानपणी जिच्याजवळ एक कुटुंब होतं आज तेच कुटुंब शेकडो-करोडो लोकांचं झालंय. एका सामान्य कुटुंबातून आलेली मेघा आज तुझ्या साथीने सर्वांची लाडकी झाली. प्रेक्षकांचं प्रेम आणि समाजामध्ये सन्मान मिळत आहे. त्याच्यासाठी मी तुझी ऋणी आहे. आजही तुझ्या साथीने इतक्या वर्षानंतर जेव्हा मालिकांमध्ये परतायचं ठरवलं तेव्हा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेसारख्या उत्कृष्ट कलाकृतीतून तू मला पुन्हा घरोघरी पोहोचवलंस. तुझ्या माध्यमातून मी अनेक कथा पाहिल्या, विविध पात्रांमध्ये रंगले आणि त्या पात्रांच्या आनंदात, दु:खात, संघर्षात सहभागी झाले. एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी स्वतःला टेलिव्हिजन स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिलं होतं तो आनंद वेगळाच होता.

तुझ्या स्क्रीनवर जेव्हा मी उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलाकारांना, मालिका, चित्रपट बघते तेव्हा त्यातल्या कलाकारांची, अभिनयाची, प्रशंसा अनेकदा केली आहे. पण, तुझं कौतुक क्वचितच कधी केलं असावं. तुझ्या माध्यमातून मला प्रेक्षकांच्या प्रेमाची अनुभूती मिळते. कधी एकटेपणातही तुझीच साथ असते. तू घरात असताना, प्रत्येक क्षण खास असतो. आपण दोघांनी अनेक आठवणी तयार केल्या आहेत. तुला धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडतील कदाचित, पण तुझ्या उपस्थितीमुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे.

तुझी सखी,
मेघा धाडे.

दरम्यान, मेघा सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत भैरवी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले असून, ती मराठी बिग बॉस या शो ची देखील विजेती होती.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.