Home » Marathi : ‘मराठी भाषा गौरव दिना’चा इतिहास आणि माहिती

Marathi : ‘मराठी भाषा गौरव दिना’चा इतिहास आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Marathi
Share

“लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!!” सुरेश भट यांनी रचलेल्या मराठी अभिमान गीतातील या ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या भावना व्यक्त करतात. मराठीबद्दल काय आणि किती सांगावे हेच समजत नाही. अतिशय जुनी आणि समृद्ध भाषा म्हणून मराठी भाषेची ओळख आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध, प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली भाषा आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला आहे. शिवाय संत साहित्य, ऐतिहासिक परंपरा, विविधतापूर्ण बोलीभाषा, आणि आधुनिक साहित्य, कथा, नाटके आदींमुळे ही भाषा अधिक श्रीमंत झाली आहे. संस्कृतोद्भव असल्याने तिची शब्दसंपदा अफाट आहे आणि भाषेतील ढंगाचे शब्दप्रयोग तिचे सौंदर्य वाढवतात. (Marathi)

मराठी ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून, तिचा इतिहास सुमारे २००० वर्षांहून अधिक जुना आहे. मराठी भाषेतील सुमारे ५०% शब्द हे संस्कृतमधून आले आहेत, ज्यामुळे ती भाषिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आहे. शिवाय मराठी भाषेतील सुमारे ५०% शब्द हे संस्कृतमधून आले आहेत, ज्यामुळे ती भाषिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आहे. ऐतिहासिक काळात मराठी भाषा ‘मोडी’ लिपीत लिहिली जात असे, जी प्रशासकीय कामकाजासाठी वापरली जात असे. संस्कृत, फारसी, अरबी आणि पोर्तुगीज या भाषांमधून अनेक शब्द मराठीत आले आहेत, विशेषतः प्रशासकीय आणि ऐतिहासिक शब्दांमध्ये. आधुनिक काळात इंग्रजीचाही प्रभाव दिसतो. (Marathi Din)

Marathi

आज २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन. कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगादान आहे. त्यांच्या याच महान कार्यमुळे महाराष्ट्र शासानाने २१ जानेवारी २०१३ मध्ये या २७ फेब्रुवारा या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले. प्रमाणित मराठी ही शिक्षणतज्ज्ञ आणि मुद्रित माध्यमांद्वारे वापरल्या जाणाऱ्या बोलींवर आधारित आहे. भारतीय विद्वान बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या ४२ बोलींमध्ये फरक करतात. (Todays Marathi Headline)

मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटकं आणि सहा एकांकिका लिहिल्या आहेत. कुसुमाग्रजांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी मराठी भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुम हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव होते. कुसुमाग्रजांनी आपल्या बहिणीच्या नावावरूनच आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. (Latest Marathi Headline)

=======

Senior Citizen Law : आई­बापांची काळजी न घेतल्यास मुलाला घरातून काढता येईल?

=======

मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि जगभरातील ८३ दशलक्षाहून अधिक लोक ती बोलतात. तिचा इतिहास १० व्या शतकापासूनचा आहे आणि ती संस्कृत, प्राकृत आणि इतर भाषांच्या अद्वितीय मिश्रणासाठी ओळखली जाते. भारतात, ती सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. १९९९ मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने “मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे, देशात मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जगात मराठी भाषा ही १० व्या क्रमांकावर येते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.